वृत्त क्र. 1210
लोकसभा उमेदवारांची आज खर्चाच्या पुनर्मेमेळाची बैठक
नांदेड दि. 18 डिसेंबर :- लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना खर्चाचा पुनर्मेमेळ बैठकीसाठी उद्या जिल्हा प्रशासनाने अंमत्रित केले आहे. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात उद्या 19 डिसेंबर रोजी यासंदर्भात बैठक होत असून उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या सकाळी 10 ते 12 याकालावधीत ही बैठक होणार असून अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवार हे भारत निवडणूक आयोगाने निर्गमीत केलेल्या परिपत्रकानुसार निर्धारीत कार्यवाहीस पात्र असतील याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. खर्चासंदर्भातील आवश्यक अनुपालन न करणाऱ्या उमेदवार 1951 च्या लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील कलमानुसार 3 वर्षाच्या कालावधीसाठी अपात्र ठरू शकतात. त्यामुळे जबाबदारीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
0000