वृत्त क्र. 1209
आजपासून सुशासन सप्ताह नागरिक दाखल करू शकतात आपल्या तक्रारी
नांदेड दि. 18 डिसेंबर :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसंदर्भात सामान्य नागरिकांना माहिती व्हावी तसेच यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण व निवृत्तीवेतन विभागामार्फत उद्यापासून सुशासन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करणे, त्यांना सुलभ सेवा पुरविणे, जिल्हा, उपविभाग, तहसिल स्तरावरील योजनांची कालबद्ध अंमलबजावणी करणे. याबाबत शिबीर आयोजित करण्याचे केंद्रीय विभागाने सुचविले असून जिल्ह्यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सदर शिबिरामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, आपले सरकारसह विविध पोर्टलवर प्राप्त तक्रारीचे निराकरण, ऑनलाईन देण्यात येणाऱ्या सेवांचा वेळेत निपटारा करणे, सेवा देण्याकरीता ऑनलाईन प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करणे आदी निर्देश देण्यात आले आहेत.
त्यामुळे 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात आयोजित विविध शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्यासंख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment