Wednesday, February 16, 2022

 आव्हानात्मक काळातील संपूर्ण कसोट्यांना

खरे उतरलेल्या जिल्हा प्रशासनाची दोन वर्षपूर्ती   

·  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या कार्यकाळास दोन वर्ष पूर्ण 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  बरोबर दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात सर्व सीमा सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद होत्या. ठिकठिकाणी तपासणी नाके लागलेले. अत्यावश्यक व जीवनावश्यक वाहतुकी शिवाय रस्त्यावर एकाही वाहनांची वर्दळ नाही. जी वर्दळ होती ती आरोग्य आणि दवाखान्याशी संबंधित. अशा काळात नांदेड सारख्या विस्तीर्ण जिल्ह्याच्या प्रशासनाची, जिल्हादंडाधिकारी या नात्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी स्विकारून अत्यंत धैर्याने रोज येईल ती परिस्थिती सावरण्याची जबाबदारी डॉ. विपीन इटनकर यांच्यावर आली. जिल्हा नवीन. जिल्ह्याच्या सीमा नवीन. प्रत्येक तालुक्यातील आरोग्याचे आव्हाने नवीन. अशा स्थितीत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींशी समन्वय साधत शासन, पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याला सावरणे सोपे झाले. 

वाढती रुग्णांची संख्या, त्यानुरूप लागणाऱ्या बेडची संख्या, औषधांचा पुरवठा, लोकांच्या मानसिकतेला सावरत लोकसहभागातून मदतीचे न्याय्य वाटप, स्वस्त धान्य दुकानातील अन्न-धान्याचा खेड्यापाड्यापर्यंत, दुर्गम आदिवासी भागात शाश्वत व सातत्यपूर्ण पुरवठा याचे नियोजन हे आव्हानात्मक होते. याच्या जोडीला वाढत्या रुग्णांच्या गरजेप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा व त्याच्या वाहतुकीचे नियोजन हेही कसरतीचे होते. ही सारी आव्हाने नांदेड जिल्हा प्रशासनाने यशस्वीरीत्या पेलून दाखविले. याला महत्वाचे कारण म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व विभाग प्रमुखांत जागविलेले आत्मविश्वास आणि एक टिम म्हणून सतत पर्याय ठेवलेली फळी याला द्यावे लागेल. 

जिल्हा प्रशासनातील केवळ आरोग्याच्या सेवेपुरतेच ही आव्हाने मर्यादीत नव्हती. जिल्ह्यातील अतिवृष्टीने, शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या कापसाने, बियाणाच्या वेळेवर उपलब्धतेच्या धास्तीने शेतकरी चिंतेत होता. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपासून ते ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिला आहे त्यांचा घरोघर जाऊन सर्वे करणे, संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीसाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करणे हे एका चांगल्या नेतृत्वाचे आणि संघटन कौशल्य असल्याचे द्योतक ठरले आहे. याचबरोबर सामाजिक न्यायासाठी, दिव्यांगापासून सुनो प्रकल्पापर्यंत लॉयन्स क्लब, नांदेड मधील खाजगी सेवा देणारी हॉस्पिटल्स यांच्या मार्फत झालेले काम मोलाचे आहे. एक महानगर म्हणून एखादा हेरीटेज मार्ग असावा यासाठी त्याचबरोबर चांगल्या क्रीडाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने शासकीय कार्यालयातील जागेसह टेनीस कोर्ट पासून ज्येष्ठांना सहज व्यायाम करता येईल अशा जिमची उपलब्धी करून देणे हे कार्य दोन वर्षात झाले असे सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही.

00000

 

 मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट )

जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न 

 नांदेड (जिमाका) दि. 16 :-  मा. बाळासाहेब ठाकरे  कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट ) प्रकल्पा अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आत्मा सभागृह नांदेड येथे करण्यात आले होते. यावेळी प्रकल्प संचालक (आत्मा) रविशंकर चलवदे यांनी नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या 8 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्राथमिक स्तरावर सादर केलेल्या आराखडा विषयी माहिती दिली. तसेच दुसऱ्या टप्प्यातील 19 शेतकरी उत्पादक कपन्यांना प्राथमिक स्तरावर आराखडा तयार करण्यासाठी मान्यता देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

आत्माच्या प्रकल्प  उपसंचालक माधुरी सोनवणे यांनी प्रकल्प आराखडे कसे तयार करायचे याविषयी सविस्तर माहिती दिली. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत विविध प्रकल्प आराखडे तयार करण्याबाबत सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे मंडळ कृषी अधिकारी संजय चातरमल यांनी दिली. कार्यशाळेमध्ये प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील 19 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अध्यक्ष, सचिव, संबंधित नोडल अधिकारी, सीए, सीएस तालुका तंत्रज्ञन व्यवस्थापक उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी श्रीहरी बिरादार, सतीश कांबळे यांनी परिश्रम घेतले.

00000


 

 नांदेड जिल्ह्यात 15 व्यक्ती कोरोना बाधित

तर 23 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 901 अहवालापैकी 15 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 13 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 596 एवढी झाली असून यातील 99 हजार 775 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 133 रुग्ण उपचार घेत असून यात 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 688 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 8, हदगाव 1, नांदेड ग्रामीण 1, मुखेड 1, नायगाव 2,  तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, कंधार 1 असे एकुण 15 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 10 असे एकुण 23 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 9, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरणा 54, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 60, खाजगी रुग्णालय 10 असे एकुण 133 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 65 हजार 326

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 45 हजार 947

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 596

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 775

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 688

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.25 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-01

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-133

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-5. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 

संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोनव्दारे चित्रिकरण करण्यास प्रतिबंध 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  संवेदनशील व महत्वाच्या  ठिकाणी ड्रोनव्दारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ड्रोन चित्रिकरण करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत 16 फेब्रुवारी ते 16 एप्रिल 2022 रात्री 12 वाजेपर्यत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी  डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहे. 

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन आवश्यक  असलेले जिल्ह्यातील मर्मस्थळे, आस्थापना, मंदिरे व महत्वाचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहेत. डॉ.शंकराराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प नांदेड अ वर्गवारी, आकाशवाणी केंद्र वरसणी नांदेड  वर्गवारी, 220 के.व्ही.उपकेंद्र वाघाळा, नांदेड ब वर्गवारी, दुरदर्शन केंद्र वसरणी नांदेड क वर्गवारी  यांचा समावेश आहे. 

महत्वाच्या आस्थापना - श्री गुरू गोंविदसिंघजी विमानतळ नांदेड, डॉ.शंकराराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी,  नांदेड, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड,  रेल्वे स्टेशन नांदेड,  मध्यवर्ती बसस्थानक नांदेड, पी.व्ही.आर मॉल लातूर फाटा नांदेड,  डी मार्ट कॅनाल रोड नांदेड, 400 के.व्ही.विद्युत केंद्र आय.एस.डिव्हीजन, मारतळा-कुंभारगाव ता. लोहा

महत्वाची धार्मिक स्थळे  सचखंड गुरूव्दारा नांदेड, रेणुकामाता मंदिर, संस्थान  माहूर, ता.माहुर जि.नांदेड, दत्तशिखर मंदिर, संस्थान माहूर ता. माहूर जि. नांदेड, हेमाडपंथी महादेव मंदिर होटल ता.देगलूर जि. नांदेड या धार्मिक स्थळे यांची सुरक्षा लक्षात घेवून संभाव्य हल्ले रोखण्याच्या अनुषंगाने वरील ठिकाण प्रतिबंध क्षेत्र घोषित म्हणून चित्रिकरणास मनाई करण्यात आली असून ड्रोण उडविणे यावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अतंर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू  करण्यात आले आहेत.

00000

 


 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश 18 फेब्रुवारीपासून लागू 

नांदेड (जिमाका) दि. 16  :- नांदेड जिल्ह्यात 18 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 4 मार्च 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शुक्रवार 18 फेब्रुवारी  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 4 मार्च 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अत्यंयात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

 जिल्ह्यात शनिवारी दारु विक्री बंद 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात शनिवार 19 फेब्रुवारी 2022 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साजरा होणार आहे. या दरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी शनिवार 19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील दारु विक्रीचे व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. 

मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  19 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-3, एफएल-2, एफएल/बिआर-2 व सिएलएफएलटिओडी-3 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

000000

सुधारित वृत्त

हमीभावाने चणा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी

नांदेड (जिमाका) दि. 16 :- किमान आधारभूत किंमत खरेदीअंतर्गत हंगाम 2020-21 मध्ये हमीभावाने 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटल चणा खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात नांदेड  (अर्धापूर), मुखेड, हदगाव, लोहा, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, जाहूर  (ता. मुखेड), किनवट (गणेशपूर) याठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत चणा ऑनलाईन शेतकरी नोंदणी 16 फेब्रुवारीपासून  सुरु झाली आहे.   

शेतकरी बांधवानी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील चणा या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकपासबूक इत्यादी कागदपत्रे तालुक्यातील खरेदी केंद्रावर देवून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000


 शिवजयंती निमित्त वाहतूक मार्गात बदल 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- शनिवार 19 फेब्रुवारी 2022 रोजी शिवजयंती निमित्त शहरात मिरवणूका काढण्याची शक्यता आहे. या कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी. राष्‍ट्रीय एकात्‍मता जोपासणे व सर्व सामान्‍य नागरीकांचे हित लक्षात घेवून शनिवार 19 फेब्रुवारी  रोजी सकाळी 11 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पुढील मार्गावरील वाहतूक बंद ठेवून, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची अधिसूचना पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी निर्गमीत केली आहे.   

वाहतूकीसाठी बंद असलेले मार्ग जुना मोंढा, देना बँक, महावीर चौक, तरोडेकर मार्केट, वजीराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आय.टी .आय चौकापर्यत जाण्या-येण्यास बंद, राज कार्नर कडून आय.टी.आय कडे येण्यासाठी राज कार्नर, वर्कशॉप टी पॉईट, श्रीनगर ते आय.टी.आय पर्यत डावी बाजू बंद. राज कार्नर ते तरोडा नाकाकडे जाण्यासाठी डावी बाजू बंद, बर्की चौक ते जूना मोंढाकडे येण्यासाठी बंद, सिडको/ हडको ते जुना मोंढयाकडे येण्यासाठी बंद. 

वाहतूकी करीता पर्यायी मार्ग-  बर्की चौकाकडून जुना मोंढयाकडे येणारी वाहतूक महम्मंद अली (गणेश टॉकीज) रोडचा जाण्या-येण्यासाठी वापर करतील, वजीराबाद चौकाकडून श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक वजिराबाद चौक, पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रिज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्या-येण्यासाठी वापर करतील, राज कार्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक राज कार्नर, वर्कशॉप कार्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागाजुर्ना टी पॉईट, अण्णाभाऊ साठे चौक, यात्री निवास पोलीस चौकी, अबचलनगर ते पुढे जाण्या-येण्यासाठी वापर करतील, गोवर्धन घाट पुलावरुन नांदेड शहरात येणारी वाहतूक पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्यासाठी वापर करतील, सिडको/हडको कडून येणारी वाहतूक साई कमान, गोवर्धन घाट नवीन पुल, तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्यासाठी वापर करतील.

0000

 लोकसेवा आयोगाच्या सन 2022 च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी खालील प्रमाणे अंदाजित वेळापत्रक आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी दिली आहे.  

लोकसेवा आयोगाच्या सन 2022 च्या परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील. 

राज्य सेवा परीक्षा-2021 साठी जाहिरात ऑक्टोबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी घेण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल मार्च 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 7, 8  9 मे 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होणार आहे. 

दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मे 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होईल. 

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी जाहिरात ऑक्टोबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली आहे. या पदासाठी पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल एप्रिल 2022 मध्ये जाहीर होईल.   

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-1 या पदासाठी मुख्य परीक्षा 9 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल. 

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-2, पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 17 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.   

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-2, राज्य कर निरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 24 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.   

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-2, सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी मुख्य परीक्षा 31 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.   

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 3 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मे 2022 मध्ये लागेल.  

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्र.1 या पदासाठी मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्र.2 लिपिक-टंकलेखक या पदासाठी मुख्य परीक्षा 13 ऑगस्ट 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी मुख्य परीक्षा 20 ऑगस्ट 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 कर सहाय्यक या पदासाठी मुख्य परीक्षा 27 ऑगस्ट 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 तांत्रिक सहाय्यक या पदासाठी मुख्य परीक्षा 10 सप्टेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 उद्योग निरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 17 सप्टेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल ऑक्टोंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल जुन 2022 मध्ये लागेल.  

 

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021 या पदासाठी मुख्य परीक्षा 29 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021  या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 16 एप्रिल 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल मे 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 3 जुलै 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021 या पदासाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध झाली असून या पदासाठी पूर्व परीक्षा 6 मार्च 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल एप्रिल 2022 मध्ये जाहीर होईल.  

 

राज्यसेवा परीक्षा-2022 या पदासाठी जाहिरात एप्रिल 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा 19 जून 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 15, 16 व 17 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल जानेवारी 2023 मध्ये जाहीर होईल.

  

दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2022 या पदासाठी जाहिरात मार्च 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा 7 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल सप्टेंबर 2022 मध्ये लागेल. या पदासाठी मुख्य परीक्षा 20 नोव्हेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल जानेवारी 2023 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपित्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 या पदासाठी जाहिरात जून 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा 8 ऑक्टोंबर 2022 रोजी होणार असून परीक्षेचा निकाल नोव्हेंबर 2022 मध्ये लागेल.  

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 संयुक्त पेपर क्रमांक-1 या पदासाठी मुख्य परीक्षा 24 ऑक्टोंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर होईल.  

 


महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022
 संयुक्त पेपर क्रमांक-2, पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 31 डिसेंबर 2022 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर होईल.

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 पेपर क्रमांक-2, राज्य कर निरीक्षक या पदासाठी मुख्य परीक्षा 7 जानेवारी 2023 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 पेपर क्रमांक-2, सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी मुख्य परीक्षा 14 जानेवारी 2023 रोजी घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर होईल.  

 

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2022  या पदासाठी जाहिरात 2 जून 2022 मध्ये प्रसिद्ध होईल. या पदासाठी पूर्व परीक्षा 5 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...