Tuesday, February 13, 2024

 वृत्त क्र. 128 

महासंस्कृती महोत्सवाच्या अनुषंगाने

नांदेडवासियांना मिळणार सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

 

· महोत्सवात विविध खेळस्पर्धा व लोकोत्सवाचा समावेश

· आदिवासीचे पारंपारिक नृत्य व कलेचे होणार सादरीकरण

· स्थानिक कलाकांरासोबत सुप्रसिध्द सिने व नाट्य कलावंताचे सादरीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- नांदेड येथे 15 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने विविध शिवकालिन खेळस्पर्धा व महाराष्ट्राचा लोकोत्सव अशा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने नांदेडवासियांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी मिळणार असून या कार्यक्रमात नांदेडवासियांनी सहकुटूंब सहभाग घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकारनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

 

महासंस्कृती महोत्सवादरम्यान 15 ते 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते या कालावधीत शिवकालिन विविध मैदानी खेळांचे आयोजन पोलीस कवायत मैदानपोलीस अधिक्षक कार्यालयाच्या मागे करण्यात आले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मैदाननवामोंढानांदेड येथील मैदानावर 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते रात्री 10 या कालावधीत महाराष्ट्राचा लोकोत्सव या कार्यक्रमात सुप्रसिध्द सिने व नाट्य कलावंताचा बहारदार कार्यक्रम तसेच प्रथीतयश स्थानिक कलावंताचे लोककलेचे सादरीकरण होणार आहे.

 

17 फेब्रुवारी रोजी सायं. ते रात्री 10 या कालावधीत 'आदि माया आदि शक्ती या कार्यक्रमात सुप्रसिध्द सिने व नाट्य कलावंताच्या बहारदार कार्यक्रमाचे तसेच प्रथीतयश स्थानिक कलावंताचे लोकसंगीताचे कार्यक्रम होणार आहेत. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते रात्री 10 या कालावधीत लोकनृत्यावर आधारित जल्लोष 2024 या बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. 16 ते 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या कालावधीत प्रदर्शनिय दालने यात जिल्हा व जिल्हा बाहेरील विविध स्टॉल लावण्यात येणार आहेत. 18 व 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी या कालावधीत आयटीआय येथे शिवचरित्रारवर आधारित रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दि. 17 व 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायं. या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील विविध घटनाठिकाणनिसर्गपर्यटन इत्यादी बाबीवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन नंदगिरी किल्लाहोळी परिसर नांदेड येथे करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद नांदेडवासियांनी सहकुटूंब घ्यावाअसेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्राचा लोकोत्सव’ या कार्यक्रमात निवेदन संदीप पाठक तर नृत्य माधुरी पवारअभिजीत केळकर हे करतील तर गायन मनीष राजगिरेज्ञानेश्वर मेश्रामपद्यनाभ गायकवाड यासोबत 45 कलाकारांचा संच असणार आहे. दि. 17 फेब्रुवारी रोजी आदिमाया आदि शक्ती या कार्यक्रमात निवेदन पूर्वी भावेकौस्तुभ दिवाण हे तर नृत्य सुकन्या काळणराजेश्वरी खरातआरती शिंदेश्वेता खरात आणि प्रार्थना बेहेरे हे करणार आहेत. तर गायन आनंदी जोशीचेतन लोखंडे यासोबत 25 कलाकारांचा संच असणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी जल्लोष या कार्यक्रमात निवेदन ज्ञानदा रामतीर्थकर तर नृत्य नेहा खानगौरी कुलकर्णीजुई बेंडखळेविदिशा म्हसकर तर गायन सावनी रविंद्रमयुर सुकाळे हे करतील. तर स्किट अंशुमन विचारे आणि किशोरी अंबिये यासोबत 25 कलाकारांचा संच सहभागी असणार आहे. या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम व किनवट येथील पारंपारिक नृत्याचे कलाप्रकार सादर होणार आहेत. या महोत्सवात माध्यम प्रतिनिधी व कुटुंबियांसाठी विशेष आसन व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावाअसे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

00000






वृत्त क्र. 127

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील

16 फेब्रुवारी पर्यंत त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 13 :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना असे त्रुटीची पूर्तता करण्याबाबतचे संदेश आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी 16 फेब्रुवारीपर्यत कार्यालयीन वेळेत सदर त्रुटीची पूर्तता करावी. दिलेल्या विहित कालावधीनंतर त्रुटीची पूर्तता करुन घेतली जाणार नाही याबाबत विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजननिवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यात येते. दिनांक  १३ जुन २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. 

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...