Tuesday, February 13, 2024

वृत्त क्र. 127

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील

16 फेब्रुवारी पर्यंत त्रुटीची पूर्तता करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 13 :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना असे त्रुटीची पूर्तता करण्याबाबतचे संदेश आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी 16 फेब्रुवारीपर्यत कार्यालयीन वेळेत सदर त्रुटीची पूर्तता करावी. दिलेल्या विहित कालावधीनंतर त्रुटीची पूर्तता करुन घेतली जाणार नाही याबाबत विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजननिवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यात येते. दिनांक  १३ जुन २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...