Friday, February 17, 2023

 *मराठवाडा विभागाच्या माहिती संचालकपदाचा किशोर गांगुर्डे यांनी स्वीकारला कार्यभार*

*शासकीय प्रसिद्धी व जनसंपर्कासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन*
औरंगाबाद, दि.17, (वि.मा.का.) – बदलती माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा अंगीकार करुन शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी तसेच शासकीय योजना, उपक्रमांच्या प्रसारासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक म्हणून किशोर गांगुर्डे यांनी आज येथे (दि.17) रोजी कार्यभार स्वीकारला.
मराठवाडा विभागाच्या माहिती संचालक पदाची सूत्रे यापूर्वी श्री. हेमराज बागुल यांच्याकडे होती. खडकेश्वर येथील संचालक (माहिती) कार्यालयात आज श्री. किशोर गांगुर्डे यांचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक संचालक गणेश फुंदे, माहिती अधिकारी मीरा ढास यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री.गांगुर्डे यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला. आज माध्यम क्षेत्रातील बदल ओळखून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन कामकाज करण्यासोबतच समाजमाध्यमांच्या प्रभावीपणे वापरावर भर देण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण देण्यात येईल, असेही श्री.गांगुर्डे यांनी सांगितले.
मराठवाडा विभागात शासकीय माहिती प्रचार-प्रसिद्धी व जनसंपर्काचे काम करताना संघभावनेने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात २००६ मध्ये सरळसेवेने सहायक संचालक (माहिती) या पदावर निवड झालेल्या श्री. किशोर गांगुर्डे यांनी विविध शाखांमध्ये काम केले आहे. २००८ मध्ये पुन्हा सरळसेवेने वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)- गट अ पदावर त्यांची निवड झाली. विभागीय संपर्क कक्ष, वृत्त, समाजमाध्यम, महान्यूज, माध्यम प्रतिसाद केंद्र आदी विविध शाख़ांमध्ये त्यांनी काम केले आहे. गृहमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. उत्कृष्ट लिखाणाबद्दल श्री. गांगुर्डे यांना २००७ च्या राज्य शासनाच्या ‘यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट विकासवार्ता पुरस्कारा’ ने देखील तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे समाजमाध्यमांवर प्रतिनिधीत्व आणण्यात आणि अद्ययावत अशा माध्यम प्रतिसाद केंद्राच्या उभारणीत योगदान दिल्याबद्दल श्री. गांगुर्डे यांचा २०१७ मध्ये नागरी सेवा दिनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. १९९७ मध्ये पत्रकारितेला सुरुवात केलेल्या श्री. गांगुर्डे यांनी २००४ मध्ये चंद्रपूर येथे जाग़तिक बॅंक अर्थसहाय्यित प्रकल्पात ‘माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ’ म्हणून काम पाहिले आहे. २०१४ मध्ये जळगाव जिल्हा माहिती अधिकारी आणि नाशिक येथे २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर येथील प्रसारमाध्यम केंद्राचे नियंत्रण अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून श्री. गांगुर्डे हे मंत्रालयात कार्यरत होते. नुकतीच त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे संचालक (माहिती) पदावर सरळसेवेने थेट निवड झाली आहे, या पदावर थेट निवड झालेले श्री.गांगुर्डे हे विभागातील दुसरे संचालक आहेत.
*****


वृत्त क्रमांक 75

 ग्रामीण महिला व मुलींनी

वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागा मार्फत ग्रामीण महिला व मुलींसाठी वैयक्तिक लाभाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतर्गंत 90 टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन पुरवण्यात  येतील. इच्छूक लाभार्थ्यांनी त्यांचा परिपूर्ण प्रस्ताव मार्च 2023 पर्यंत तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर  सादर केलेले अथवा अपूर्ण  असलेले प्रस्ताव मंजूर करण्यांत येणार नाहीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी केले आहे.

या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.


विहित नमुन्यातील अर्ज (लाभार्थी फोटोसह), नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी असावे. (ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र), मागासवर्गीय असल्यास सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे. सदर महिला ही दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील किंवा त्यांचे सन 2021- 22 चे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपयांच्या आत असावे, यापूर्वी या योजनेचा लाभ घेतले नसल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे, लाभ धारकांकडे शिलाई मशीनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे, शिलाई मशिन विक्री / हस्तांतर न करण्याचे हमीपत्र असावे, लाभधारकांस 90 टक्के अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल (पाच हजार रुपयांच्या मर्यादेत), आधार कार्ड सत्यप्रत, बँक पासबुकाची ठळक छायांकित प्रत,  वस्तू खरेदीची जीएसटीसह पावती, शिलाई मशीन सह लाभार्थींचा पोस्टकार्ड रंगीत साईज फोटो, लाभार्थी निवडीबाबत ग्रामपंचायत ठरावाची प्रत,  प्राप्त सर्व प्रस्ताव सन 2022- 23 या आर्थिक वर्षापूरतेच तसेच उपलब्ध निधीच्या मर्यादेत राहतील, लाभार्थी निवड करण्याचा अधिकार कार्यालयाने राखून ठेवला आहे  असे महिला बाल विकास विभागाच्या वतीने कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 74

 शिवजयंती निमित्त वाहतूक मार्गात बदल 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- रविवार 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंती निमित्त शहरात मिरवणूका काढण्याची शक्यता आहे. या कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी. राष्‍ट्रीय एकात्‍मता जोपासणे व सर्व सामान्‍य नागरीकांचे हित लक्षात घेवून रविवार 19 फेब्रुवारी  रोजी सकाळी 11 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पुढील मार्गावरील वाहतूक बंद ठेवून, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची अधिसूचना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी निर्गमीत केली आहे. 

  

वाहतूकीसाठी बंद असलेले मार्ग जुना मोंढादेना बँकमहावीर चौकतरोडेकर मार्केटवजीराबाद चौककलामंदिरशिवाजीनगर ते आय.टी.आय चौकापर्यंत जाण्या-येण्यास बंदराज कार्नर कडून आय.टी.आय कडे येण्यासाठी राज कार्नरवर्कशॉप टी पॉईटश्रीनगर ते आय.टी.आय पर्यत डावी बाजू बंद. राज कार्नर ते तरोडा नाकाकडे जाण्यासाठी डावी बाजू बंदबर्की चौक ते जूना मोंढाकडे येण्यासाठी बंदसिडको/ हडको ते जुना मोंढयाकडे येण्यासाठी बंद. 

वाहतूकी करीता पर्यायी मार्ग-  बर्की चौकाकडून जुना मोंढयाकडे येणारी वाहतूक महम्मंद अली (गणेश टॉकीज) रोडचा जाण्या-येण्यासाठी वापर करतीलवजीराबाद चौकाकडून श्रीनगरवर्कशॉपकडे जाणारी वाहतूक वजिराबाद चौकपोलीस मुख्यालय कॉर्नरलालवाडी अंडरब्रिजशिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्या-येण्यासाठी वापर करतीलराज कार्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक राज कार्नरवर्कशॉप कार्नरभाग्यनगरआनंदनगरनागाजुर्ना टी पॉईटअण्णाभाऊ साठे चौकयात्री निवास पोलीस चौकीअबचलनगर ते पुढे जाण्या-येण्यासाठी वापर करतीलगोवर्धन घाट पुलावरुन नांदेड शहरात येणारी वाहतूक पोलीस मुख्यालय कॉर्नरलालवाडी अंडरब्रीजशिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्यासाठी वापर करतीलसिडको/हडको कडून येणारी वाहतूक साई कमानगोवर्धन घाट नवीन पुलतिरंगा चौकपोलीस मुख्यालय कॉर्नरलालवाडी अंडरब्रीजशिवाजीनगर (पिवळी गिरणी) ते गणेश नगर वाय पॉईटकडे जाण्यासाठी वापर करतील.

0000

वृत्त क्रमांक 73

 नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून

ग्रामपंचायत समिती सदस्यावर गुन्हा दाखल

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- बिलोली तालुक्यातील संगरोळी ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्या शेख मेहताबी लालशा  (माहेर) शेख मेहताबी मियॉसाब (सासर) व इतर यांचे विरुध्द जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड येथे फौजदारी गुन्हा क्रमांक 0057/2023 नोंद झाला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सतेंद्र आऊलवार यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

             

शेख मेहताबी लालशा (माहेर) शेख मेहताबी मियॉसाब (सासर) यांनी पिंजारी-177 (इतर मागास वर्ग) या जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे दाखल केले होते. या प्रकरणात समितीने पोलीस दक्षता पथकामार्फत सखोल चौकशी केली असता शेख मेहताबी लालशा (माहेर) यांनी त्यांचे माहेर मौ. आळंदी ता. बिलोली जि. नांदेड येथील नसताना बनावटखोटे कागदपत्रेप्रमाणपत्रे सादर करुन तेथील मुळ रहिवासी (माहेर) असल्याचे दर्शविले. दक्षता पथकाच्या चौकशी दरम्यान मौ. आळंदी ता. बिलोली जि. नांदेड येथील ज्येष्ठ नागरीकांनी ग्रामपंचायत सदस्या शेख मेहताबी लालशा (माहेर) ह्या तेथील रहिवासी नसल्याचा जवाब दिला.  दक्षता पथक चौकशीनुसार मौजे आळंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक नागनाथ रामचंद्र चौंडे यांनी शेख मेहताबी लालशा  (माहेर) शेख मेहताबी मियॉसाब (सासर) यांना आळंदी गावातील रहिवासी दर्शविण्यासाठी व जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी बनावटखोटे मृत्यू प्रमाणपत्रजात प्रमाणपत्रशिधापत्रिकाओळखपत्ररहिवास प्रमाणपत्र व जन्म-मृत्यु अनुउपलब्धता प्रमाणपत्र सादर केले असल्यामुळे ग्रामसेवक नागनाथ रामचंद्र चोंडे यांनी त्यांच्या स्वाक्षरीने शेख मेहताबी लालशा (माहेर) यांना खोटे व बनावट प्रमाणपत्र निर्गमित केल्याबाबत समितीच्या दक्षता पथकास  लेखी जबाब दिला. 

 

शेख मेहताबी लालशा  (माहेर) यांचा मुलगा शेख मुर्तुजा मियॉसाब व ग्रामसेवक नागनाथ रामचंद्र चोंडे यांनी वरील नमुद खोटी व बनावट कागदपत्रेप्रमाणपत्रे आधारे उपविभागीय अधिकारी बिलोली जि.नांदेड येथून पिंजारी (इ.मा.व.) जात प्रमाणपत्र प्राप्त केले. सदर जात प्रमाणपत्र आधारे त्यांनी सगरोळी ता.बिलोलीजि.नांदेड येथील ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 राखीव जागेवर लढविली. त्या सदस्य पदावर दिनांक 29 जानेवारी 2021 रोजी निवडून आल्या. जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्यांचा प्रस्ताव समितीस दि. 26 डिसेंबर 2020 दाखल केला होता. समितीच्या निदर्शनास वरील वस्तुस्थिती निदर्शनास आल्याने समितीने त्यांचे पिंजारी जात प्रमाणपत्र दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशान्वये अवैध ठरविले आहे.   शेख मेहताबी लालशा (माहेर) व त्यांचा मुलगा शेख मुर्तुजा मियॉसाब व ग्रामसेवक नागनाथ रामचंद्र चोंडे व इतर विरुध्द भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यास समितीच्या पोलीस निरीक्षक पक्षता पथकास आदेशीत करण्यात आले.  या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दक्षता पथक यांनी समितीतर्फे फिर्यादी देऊन दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड येथे गुन्हा नोंदविला. या गुन्हयाचा तपास विमानतळ पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.जाधवपोलीस उपनिरीक्षक व इतर हे अधिक तपास करीत आहेत.

000000 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...