Friday, February 17, 2023

वृत्त क्रमांक 75

 ग्रामीण महिला व मुलींनी

वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागा मार्फत ग्रामीण महिला व मुलींसाठी वैयक्तिक लाभाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतर्गंत 90 टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन पुरवण्यात  येतील. इच्छूक लाभार्थ्यांनी त्यांचा परिपूर्ण प्रस्ताव मार्च 2023 पर्यंत तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर  सादर केलेले अथवा अपूर्ण  असलेले प्रस्ताव मंजूर करण्यांत येणार नाहीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी केले आहे.

या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.


विहित नमुन्यातील अर्ज (लाभार्थी फोटोसह), नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी असावे. (ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र), मागासवर्गीय असल्यास सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र असावे. सदर महिला ही दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील किंवा त्यांचे सन 2021- 22 चे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपयांच्या आत असावे, यापूर्वी या योजनेचा लाभ घेतले नसल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे, लाभ धारकांकडे शिलाई मशीनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे, शिलाई मशिन विक्री / हस्तांतर न करण्याचे हमीपत्र असावे, लाभधारकांस 90 टक्के अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल (पाच हजार रुपयांच्या मर्यादेत), आधार कार्ड सत्यप्रत, बँक पासबुकाची ठळक छायांकित प्रत,  वस्तू खरेदीची जीएसटीसह पावती, शिलाई मशीन सह लाभार्थींचा पोस्टकार्ड रंगीत साईज फोटो, लाभार्थी निवडीबाबत ग्रामपंचायत ठरावाची प्रत,  प्राप्त सर्व प्रस्ताव सन 2022- 23 या आर्थिक वर्षापूरतेच तसेच उपलब्ध निधीच्या मर्यादेत राहतील, लाभार्थी निवड करण्याचा अधिकार कार्यालयाने राखून ठेवला आहे  असे महिला बाल विकास विभागाच्या वतीने कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...