Wednesday, December 8, 2021

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 19 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 499 एवढी झाली असून यातील 87 हजार 827 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 18 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 654 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे किनवट 2, कंधार 1 लोहा 1 असे एकुण 4 बाधित आढळला आहे. आज जिल्ह्यातील 4  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 4 असे एकूण 4 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 18 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 अशा एकूण 18 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 82 हजार 139

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 78 हजार 144

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 499

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 827

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-18

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 जिल्हा न्यायालय लोकअदालतद्वारे

ई-चालनाचा निपटारा   

नांदेड (जिमाका) दि. 8 :- प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वायुवेग पथकामार्फत मोटार वाहन कायद्याअंतर्गत दोषी वाहनांवर केलेल्या कार्यवाही संदर्भातील ई-चालनाचा निपटारा 11 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा न्यायालय लोक अदालतद्वारे करण्यात येणार आहे. प्रलंबित वाहनधारकांनी राष्ट्रीय लोकअदालतीत  उपस्थित राहून ई-चालनाचा निपटारा करावा, असे आवाहन नांदेड प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

00000

 राज्यस्तरीय महा रोजगार मेळाव्याचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- महाराष्ट्रातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागाच्यावतीने 12 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत india@75_मिशन आपुलकी व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्यात नांदेड जिल्ह्यातील सर्व आस्थापना-उद्योजकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन  त्यांच्याकडे असलेले रिक्तपदे जागा या कार्यालयास 10 डिसेंबर पर्यंत https://rogar.mahaswayam.gov.in या वेबसाईड नोंदणी करावी. यामुळे बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगाराची संधी प्राप्त होईल,  असे आवाहन जिल्हा कौशल्य व रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास 02462-251674 या दूरध्वनी क्रमाकांशी किंवा nandedroj@gmail.com  संपर्क साधावा.  

000000

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

1 कोटीपर्यंत निधी संकलन करण्याचा निर्धार 

दिनांक (जिमाका) दि. 8 :- जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021-22 च्या संकलनाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावर्षी जिल्हयाला निधी संकलनाचे 45 लाख 30 हजार एवढे उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट 1 कोटीपर्यंत करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हयातील वीरनारी, वीरपिता यांचा सत्कार तसेच विशेष गौरव पुरस्काराच्या 20 हजार रुपयाच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अपर जिल्हाधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली.    

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे यांनी माजी सैनिक व त्यांच्या महिला बचतगटास सर्वोतोपरी मदत केली जाईल. ध्वजनिधी जमा करण्यासाठी "हाच संकल्प हिच सिद्वी" हा उपक्रम राबवितांना प्रत्येक अधिकारी-कर्मचारी व नागरिकांना आवाहन करुन निधी जमा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

सन 2020-21 साठी शासनाने जिल्हयाला 35 लाख 50 हजार एवढे उद्दिष्ट दिले होते. नांदेड जिल्हयाने 85 लाख 27 हजार 971 एवढा निधी जमा करुन 241 टक्के उद्दिष्ट पुर्ण केले आहे. तसेच सन 2021-22 साठी शासनाकडुन 45 लाख 30 हजार एवढे उद्दिष्ट मिळालेले आहे. नांदेड जिल्ह्याने आता 1 कोटीपर्यंत निधी जमा करुन ते पूर्ण करू असे अपर जिल्हाधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे यांनी सांगितले. दिलेले उद्दिष्ट वेळेच्या आत पूर्ण करुन निधी शासनास जमा केल्याबद्दल शासनाने नांदेड जिल्ह्याचा गौरव प्रित्यर्थ स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला आहे. 

ध्वन निधी संकलनात शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचाही सत्कार अपर जिल्हाधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तु देवून करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी प्रास्ताविकात ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलित झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती दिली. माजी सैनिकांसाठी सीएसडी कॅण्टीन, महिलांसाठी बचतगट व पूर्व प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे सुरु करण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना केली. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन त्र्यंबक मगरे यांनी केले तर कल्याण संघटक अर्जुन जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हयातील जवळपास 200 माजी सैनिक, विधवा, अवलंबित उपस्थित होते. माजी सैनिक संघटनांचे अध्यक्ष रामराव थडके, पठाण हयुन, बालाजी चुगुलवार व प्रकाश कस्तुरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यालयाचे बुध सिंग शिसोदे, बालाजी भेारगे, सुर्यकांत कदम व गंगाधर हटकर यांनी विशेष प्रयत्न केले.

0000


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...