Tuesday, February 21, 2017

स्पर्धा परीक्षेत सामान्य विज्ञान विषयाचे
अनन्यसाधारण महत्व - डॉ. सचिन भस्के
नांदेड दि. 21 :-  सामान्य विज्ञान विषय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याविद्यार्थ्यांसाठी महत्वाचा विषय आहे. पूर्व परीक्षामध्ये वाढत असलेली  प्रश्नाची सखोलता , ठिण्य पातळी आणि प्रश्न संख्या याचा मेळ घालण्यासाठी विशिष्ट अशी मर्यादा नसणाऱ्या विज्ञान या विषयाचा अभ्यास करताना इयत्ता पाचवी ते दहावीची क्रम पुस्तके तसेच  एनसीआरटीची पुस्तकांचा वापर करणे फायदेशीर ठरेल , असे प्रतिपादन पुणे येथील स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक वक्ते डॉ. सचिन भस्के यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू मिती, नांदेड मनपा, नांदेड जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने आयोजीत ज्ज्व नांदेड मोहिमेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरा डॅा. भस्के सामान्य विज्ञान या विषयावर व्याख्यान देत होते.
          

  कार्यक्रमास नायब तहसीलदार सुधाकर लेंडवे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. भस्के यांचे ग्रामगीता देऊन नायब तहसिलदार श्री. लेंडवे  यांनी स्वागत केले. शिबिराची सुरुवात प्रेरणा गीताने झाली.
            नायब तहसिलदार श्री. लेंडवे यांनी ज्ज्व नांदेड या माहिमेचे ध्येय सांगून या मोहिमेस विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाबद्द आभार व्यक्त केले. डॉ. भस्के यांनी व्हीडीओ, पीपीटीद्वारे सामान्य विज्ञान या विषयातील क्लीष्ट संकल्पना सहज सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगीतल्या. शेवटी त्यांनी विद्यार्थ्याच्या शंकाचेही समाधान केले.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक व्याख्यात्याचा परिचय जिल्हा ग्रंथालय अधिकारी  सुनील हुसे यांनी तर सुत्रसंचालन आरती कोकूलवार यांनी केले. कार्यक्रम संयोजनासाठी मीना सोलापूरे, प्रताप सुर्यंवशी, अजय वटमवार, कोंडिबा गाडेवाड, बाळू पावडे, रघुवीर श्रीरामवार, विठ्ठ यनगुलवाड, लक्ष्मण शेनेवाड, सोपान यनगुलवाड, अभिजीत पवार, मनदीपसिंह पुजारी, राजकुमार बोडके  आदीने सहकार्य केले.

0000000
 महिला मतदार जनजागृती अभियानात
जास्तीत नोंदणी करण्यात यावी - प्र. जिल्हाधिकारी पाटील

नांदेड दि. 21 :-  जागतिक महिला दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या महिला मतदार जागृती अभियानांतर्गत जास्तीत जास्त महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज येथे दिले.
 आंतरराष्‍ट्रीय महिला दिन निमित्‍ताने महिला मतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्‍यात येत आहे. या कार्यक्रमाच्या पुर्वतयारीसाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. पाटील बोलत होते.
बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे,  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. व्ही. शिंगणे, बालविकास प्रकल्प अधिकारी डॅा. विजय खोमणे,  माविमचे चंदनसिंग राठोड आदींची उपस्थिती होती.
बैठकीत जिल्ह्यातील महिला मतदारांमध्ये जागृतीसाठीचे विविध उपक्रम तसेच प्रत्यक्ष गावस्तरीय नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली.  महिला मतदार जागृती संदर्भात भारत निवडणूक आयोगाने स्‍वीप SVEEP (Systematic Voters Education and Elector Participation) अंतर्गत निर्देश दिले आहेत. त्यानुसार महिलांच्‍या लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात महिला मतदारांची नोंदणी  कमी आहे. ही तफावत महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांद्वारे दूर करण्‍याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी महिला वसतीगृह, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्‍था इत्‍यादिंच्‍या मदतीने महिला मतदारांची नोंदणी वाढविणे. उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्‍या माध्‍यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहित करणे. वि‍वाहित महिलांची पूर्वीची नोंदणी रद्द करून नवीन ठिकाणी त्‍यांची मतदार म्‍हणून नोंदणी करणे. महिलांची मतदार नोंदणी वाढविणे यासाठी बीएलओ यांना विशेष प्रशिक्षण / सूचना देणे. याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
जिल्ह्यात 89- नायगाव मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघात महिला मतदार नोंदणी गुणोत्तर प्रमाण खूपच कमी आहे. त्‍यामुळे मतदान नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासाठी कार्यक्रमही आखण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे – गावनिहाय संपर्क अधिकारी नियुक्‍त करणे (20 फेब्रुवारी). संपर्क अधिकारी, अंगणवाडी सेविका / आशा वर्कर, तालुकास्‍तरावरील अधिकारी यांच्‍या बैठक घेणे (28 फेब्रुवारी). बीएलओ  यांची  बैठक घेउन त्‍यांना Form 6 / 8 A देणे ( 28 फेब्रुवारी). महाविद्यालयांचे प्राचार्य / Campus ambassador यांची बैठक घेणे (28 फेब्रुवारी). BLO / Campus Ambassador यांनी पात्र महिला मतदारांचे नोंदणीसाठी अर्ज भरून घेणे (28 फेब्रुवारी ते 6 मार्च 2017). यादीत नाव न नोंदविलेल्‍या सर्व महिला मतदारांचे नमूना 6 किंवा नमूना 8 अ BLO यांनी तहसिल कार्यालयात जमा करणे (6 मार्च). गावात / वार्डात / तालुकास्‍तरावर महिला मेळावे आयोजित करून नवीन नोंदणी झालेल्‍या महिलांना EPIC वाटप करणे ( 8 मार्च 2017).

जिल्ह्याची दि. 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित प्रसिध्‍द मतदार यादीनुसार मतदारसंघ निहाय महिलांचे दर हजारी प्रमाणे खालील प्रमाणे आहे.  

महिला मतदार नोंदणीचे गुणोत्तर (दि. 1 जानेवारी 2017 पर्यंतच्या आधारावर)
विधानसभा मतदार संघ
पुरूष
स्त्रिया
अन्य
एकूण
गुणोत्तर
83- किनवट
126446
115881
2
242329
914
84- हदगाव
137641
122238
2
259881
885
85- भोकर
135562
124232
5
259799
915
86-नांदेड दक्षिण
145955
132344
40
278339
908
87-नांदेड उत्तर
137586
125361
1
262948
913
88- लोहा
135610
124225
1
259836
915
89- नायगाव
138794
128885
1
267680
937
90- देगलूर
142006
130810
0
272816
922
91- मुखेड
141870
128804
1
270675
914
एकूण
1241470
1132780
53
2374303
914

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...