Tuesday, February 21, 2017

स्पर्धा परीक्षेत सामान्य विज्ञान विषयाचे
अनन्यसाधारण महत्व - डॉ. सचिन भस्के
नांदेड दि. 21 :-  सामान्य विज्ञान विषय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याविद्यार्थ्यांसाठी महत्वाचा विषय आहे. पूर्व परीक्षामध्ये वाढत असलेली  प्रश्नाची सखोलता , ठिण्य पातळी आणि प्रश्न संख्या याचा मेळ घालण्यासाठी विशिष्ट अशी मर्यादा नसणाऱ्या विज्ञान या विषयाचा अभ्यास करताना इयत्ता पाचवी ते दहावीची क्रम पुस्तके तसेच  एनसीआरटीची पुस्तकांचा वापर करणे फायदेशीर ठरेल , असे प्रतिपादन पुणे येथील स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक वक्ते डॉ. सचिन भस्के यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू मिती, नांदेड मनपा, नांदेड जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने आयोजीत ज्ज्व नांदेड मोहिमेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरा डॅा. भस्के सामान्य विज्ञान या विषयावर व्याख्यान देत होते.
          

  कार्यक्रमास नायब तहसीलदार सुधाकर लेंडवे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. भस्के यांचे ग्रामगीता देऊन नायब तहसिलदार श्री. लेंडवे  यांनी स्वागत केले. शिबिराची सुरुवात प्रेरणा गीताने झाली.
            नायब तहसिलदार श्री. लेंडवे यांनी ज्ज्व नांदेड या माहिमेचे ध्येय सांगून या मोहिमेस विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाबद्द आभार व्यक्त केले. डॉ. भस्के यांनी व्हीडीओ, पीपीटीद्वारे सामान्य विज्ञान या विषयातील क्लीष्ट संकल्पना सहज सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगीतल्या. शेवटी त्यांनी विद्यार्थ्याच्या शंकाचेही समाधान केले.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक व्याख्यात्याचा परिचय जिल्हा ग्रंथालय अधिकारी  सुनील हुसे यांनी तर सुत्रसंचालन आरती कोकूलवार यांनी केले. कार्यक्रम संयोजनासाठी मीना सोलापूरे, प्रताप सुर्यंवशी, अजय वटमवार, कोंडिबा गाडेवाड, बाळू पावडे, रघुवीर श्रीरामवार, विठ्ठ यनगुलवाड, लक्ष्मण शेनेवाड, सोपान यनगुलवाड, अभिजीत पवार, मनदीपसिंह पुजारी, राजकुमार बोडके  आदीने सहकार्य केले.

0000000

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...