लोकराज्य जानेवारी
2017 चा अंक प्रसिद्ध

महाराष्ट्रातील विविध किल्ले, जलदुर्ग, वस्तुसंग्रहालये, लेण्या, प्रार्थनास्थळे, महाराष्ट्रातील वने इत्यादी
बाबींची तसेच जिल्हानिहाय पर्यटन स्थळे, तिथे कसे पोहचावे
याची माहिती हे या अंकाचे वैशिष्ट्ये आहे.
निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर
बदललेल्या महाराष्ट्राचे चित्रणदेखील या अंकात आहे. निश्चलनीकरणानंतर नागरिकांनी
मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहारांकडे वळावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत
केले जाणारे प्रयत्न, शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना यांची माहिती या अंकात आहे.
कॅशलेस इंडिया समजून घेण्यासाठी आणि पर्यटनाच्या वाटेवरील मार्गदर्शक म्हणून हा
अंक निश्चितरीत्या उपयुक्त ठरणार आहे.
०००००