Monday, May 27, 2024

वृत्त क्र. 448

 मान्‍सून पूर्वतयारीची आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रंगीत तालीम


नांदेड दि. 27 :-  जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्यावतीने आज सकाळी १० वाजता काळेश्वर घाटविष्णुपूरी येथे जिल्हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांच्‍या आदेशानुसार व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली मान्‍सून-२०२४ पूर्वतयारी-पूर परिस्‍थिती शोध व बचावाबाबत रंगीत तालीम संपन्‍न झाली.
 
माहे जूनमध्‍ये मान्‍सूनचे आगमन होणार आहे. 
 मान्‍सूनच्‍या काळात अतिवृष्टी होऊ शकते. नदीकाठच्‍या गावात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा पूर परिस्‍थ‍ितीच्‍या वेळी जिवीत व वित्त हानी कशी टाळता येऊ शकते. यासाठी पूर परीस्‍थ‍ितीत शोध व बचाव कसा करावा याबाबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणाचे प्रशिक्षण काळेश्‍वर घाट विष्णुपूरी येथे संपन्‍न झाले. यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकाअग्‍नीशमन दलशीघ्र प्रतिसाद दलगृहरक्षक दलउपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयपंचायत समिती नांदेड व इतर अधिकारीकर्मचारी यांची उपस्थिती होती.
 
 या रंगीत तालीमेस उपविभागीय अधिकारी विकास मानेतहसिलदार संजय वारकडजिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी किशोर कुऱ्हेअग्‍नीशमन अधिकारी केरोजी दासरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सूत्रसंचालन  जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे बारकुजी मोरे यांनी केले तर आभार तहसिल कार्यालयाचे रवि दोंतेवार यांनी मानले. यावेळी मंडळ अधिकारी पी.व्‍ही.खंडागळेए.एम. धुळगुंडेएस.डी.देवापुरकरप्रमोद बडवणेगृहरक्षक दलाचे एम.बी.शेखप्रवीण हंबर्डेबालाजी सोनटक्‍केमंडगीलवार आर.बी.गौरव ति‍वारीकोमल नागरगोजे आदींनी परीश्रम घेतले. तर मनपा नांदेडपोलीस क्‍यु.आर.टी.होम गार्ड,जिल्हा शल्‍य चिकित्सक कार्यालयाचे आरोग्‍य पथकमंडळ अधिकारीतलाठीग्रामसेवक पोलीस पाटील कोतवालासह विविध यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्‍थ‍ित होते.








0000

वृत्त क्र. 447

 जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त

जिल्हा रुग्णालयात स्वाक्षरी मोहीम

नांदेड दि. 27 :-  आज जिल्हा रुग्णालयात ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती होण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी व रुग्ण यांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेवून तंबाखू सोडण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी  डॉ. हनुमंत पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच.के. साखरे, डॉ.पुष्पा गायकवाड, डॉ. अभय अनुरकर, मेट्रेन राठोड तसेच इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी व रुग्ण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे मंगेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

0000

वृत्त क्र. 446

 दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता संकेतस्थळावर उपलब्ध 

नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या सोमवार 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

https://mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://sscresult.mahahsscboard.inhttps://results.digilocker.gov.in,  https://results.targetpublications.orghttps://www.tv9marathi.com माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी मार्च 2024 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. सदर माहितीचे प्रिंट आऊट घेता येईल. https://mahresult.nic.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

निकालाबाबत अन्य तपशील

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत: च्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रतीपुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://verification.mh-ssc.ac.in स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रती साठी मंगळवार 28 मे 2024 ते मंगळवार 11 जून 2024 पर्यत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येतील. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क डेबिट कार्ड/क्रेडीट कार्डयूपीआयनेट बँकिंग याद्वारे भरता येतील.

मार्च 2024 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्याकंनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

मार्च 2024 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी जुलै-ऑगस्ट 2024 व मार्च 2025 श्रेणी/गुण सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहील.

जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी पुरवणी परीक्षेसाठी पुनपरिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यासाठी शुक्रवार 31 मे 2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहे. याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक निर्गमित करण्यात येणार असल्याचे मंडळाच्यावतीने कळविले आहे.

0000

वृत्त क्र. 445

 कपाशीच्या वाणांची बियाणे जादा दराने विक्री

 केल्यास कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 25:- आगामी खरीप हंगामासाठी शासनाने हायब्रीड कपाशी बीजी वाणाचे दर जाहीर केले आहेत. प्रति पाकीट 864 रुपयाने विक्री करण्याचे निर्देश शासनाकडून मिळाले आहेत. कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून अधिक दराने कोणत्याही वाणाच्या कपाशी बियाण्याची विक्री होत असल्याचे आढळल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत केले आहे .

 

आगामी खरीप हंगामात कपाशीची लागवड सोयीचे होण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. परंतु गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी 1 जूननंतरच चांगल्या पावसानंतर जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा निर्माण झाल्यावर लागवड करावी . तसेच शेतकऱ्यांनी देखील विशिष्ठ वाणांचा आग्रह न धरता निविष्ठा जादा दराने खरेदी करू नये असे आवाहन कृषि विभागाकडुन करण्यात आले आहे. विविध बियाणे उत्पादक कंपन्यांकडूनही तालुक्यात ठोक विक्रेत्याकडे आणि त्यांचेमार्फत किरकोळ विक्रेत्याकडे सध्या कपाशी बियाणे पुरवठा होत आहे. आता शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्देशानुसार कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी प्रति पाकिट ८६४ रुपये दरापेक्षा अधिक दराने बियाणे विक्री होत असल्यास तालुका स्तरावरील तक्रार निवारण कक्ष तालुका स्तरावरील भरारी पथकाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

खबरदारीचा उपाय म्हणून अधिक मागणी असलेल्या कपाशी वाणांची बियाणांची विक्री ही कृषी सहाय्यक यांचे निगराणीखाली होणार आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्रावर कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी पुढील प्रमाणे कृषी विभागांचे अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत दूरध्वनी क्रमांक-9158417482, नांदेड तालुका कृषी अधिकारी मोकळे दूरध्वनी क्रमांक-9422140047, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी देवकांबळे  दूरध्वनी क्रमांक-9923135036, मुदखेड तालुका कृषी अधिकारी श्रीमती गच्चे दूरध्वनी क्रमांक-9403108216, तालुका कृषी अधिकारी लोहा पोटपल्लेवार दूरध्वनी क्रमांक-9527620807, कंधार तालुका कृषी अधिकारी गीते दूरध्वनी क्रमांक-9890450217 कपाशी बियाण्याची अधिक दराने विक्री होत असल्याचे आढळल्यास शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी वरील दिलेल्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधावा. संबंधिताचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि वाढीव दराने विक्री करीत असलेल्या कृषी सेवा केंद्रविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येईल असेही उपविभागीय कृषी अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

0000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...