Monday, May 27, 2024

वृत्त क्र. 447

 जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त

जिल्हा रुग्णालयात स्वाक्षरी मोहीम

नांदेड दि. 27 :-  आज जिल्हा रुग्णालयात ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती होण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी व रुग्ण यांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेवून तंबाखू सोडण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी  डॉ. हनुमंत पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच.के. साखरे, डॉ.पुष्पा गायकवाड, डॉ. अभय अनुरकर, मेट्रेन राठोड तसेच इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी व रुग्ण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे मंगेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...