दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता संकेतस्थळावर उपलब्ध
नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या सोमवार 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
https://mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://sscresult.
निकालाबाबत अन्य तपशील
ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत: च्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://
मार्च 2024 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्याकंनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
मार्च 2024 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी जुलै-ऑगस्ट 2024 व मार्च 2025 श्रेणी/गुण सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहील.
जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी पुरवणी परीक्षेसाठी पुनपरिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यासाठी शुक्रवार 31 मे 2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहे. याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक निर्गमित करण्यात येणार असल्याचे मंडळाच्यावतीने कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment