Tuesday, July 9, 2019

अतिवृष्‍टीमुळे होणारे नुकसान
टाळण्‍यासाठी उपाययोजना कराव्यात
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 9 :- पावसाळाच्‍या कालावधीत अतिवृष्‍टीच्‍या काळात जीवित व वित्‍तहानी होणाच्‍या घटना घडणार नाहीत यासाठी सर्व तलाव / लघुसिचंन / धरणे / को.प. बंधारे या कामांवर जबाबदार अभियंत्‍याची नियुक्‍ती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. .
जलसंपदा व जलसंधारण अधिकारी यांची बैठक जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्‍यक्षतेखाली आज घेण्‍यात आली. या बैठकीत चालू वर्षी राज्‍यात सरासरी एवढा पाऊस होणार असल्‍याचे भारतीय हवामान खाते यांचे अनुमान आहे. संबंधीत विभागांनी त्यांच्या कामांवरील अभियंत्‍याचे संपर्क नंबर संबधीत ग्रामपंचायत व तहसीलदार यांना देण्यात यावेत. कमकुवत कामांचे तात्‍काळ डागडुजी करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी डोंगरे यांनी दिले.
0000

स्कूल बसेसची रविवारी तपासणी



नांदेड,दि. 9 :- प्रादेशिक परिवहन कार्यायाच्यावतीने रविवार 14 जुलै 2019 रोजी नांदेड मौजे वाघी येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे स्कूल बसेसची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी केलेल्या वाहनातून विद्यार्थ्याची वाहतूक होत असल्यास संबंधीतांच्या विरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठकीत जिल्हयातील सर्व शालेय विद्यार्थ्याची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. त्यानुसार रविवार 14 जुलै 2019 रोजी स्कूल बसचे वैद्य कागदपत्रासह तपासणीसाठी उपस्थित रहावे. ज्या स्कुल बसेसचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाची मुदत संपली असल्यास वेळ घेऊन तात्काळ योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे. योग्यता प्रमाणपत्राची वैद्यता संपलेल्या वाहनातून विद्यार्थ्याची वाहतूक करु नये. याबाबत जिल्हयातील सर्व स्कूल बस चालक, मालकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...