अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान
टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 9 :- पावसाळाच्या कालावधीत अतिवृष्टीच्या काळात जीवित व वित्तहानी होणाच्या घटना घडणार नाहीत यासाठी सर्व तलाव / लघुसिचंन / धरणे / को.प. बंधारे या कामांवर जबाबदार अभियंत्याची नियुक्ती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. .
जलसंपदा व जलसंधारण अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या बैठकीत चालू वर्षी राज्यात सरासरी एवढा पाऊस होणार असल्याचे भारतीय हवामान खाते यांचे अनुमान आहे. संबंधीत विभागांनी त्यांच्या कामांवरील अभियंत्याचे संपर्क नंबर संबधीत ग्रामपंचायत व तहसीलदार यांना देण्यात यावेत. कमकुवत कामांचे तात्काळ डागडुजी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डोंगरे यांनी दिले.
0000
No comments:
Post a Comment