Saturday, September 16, 2023

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन

                          मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त

                              मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन

·         बास्केटबॉल स्पर्धेस सुरुवात

·         विविध जिल्ह्यातील स्पर्धकाचा सहभाग

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त खुले मॅरेथॉन स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

 

यावेळी सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, मराठवाडा शासकीय पुनोनित माजी सैनिक संघटनेचे अध्यक्षजिल्हा व मंडळ अधिकारी महसुल श्री. पठाण, अथलेटिक्स संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी आदी उपस्थीत होते.




 

ही मॅरेथॉन रॅली महात्मा फुले पुतळा (आयटीआय चौकयेथून  शिवाजीनगर मार्गे बस स्टॅन्ड कलामंदीर छशिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, चिखलवाडी कॉर्नर, ओव्हर ब्रीज, अण्णाभाऊ साठे चौक, व्ही.आय.पी.रोड, कुसुमताई सभागृह (आयटीएम कॉलेज), स्टेडीयम मार्ग, विसावा उद्यान हुतात्मा स्मारक येथे समाप्त करण्यात आली.

या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे.

खुले मॅरेथॉन पुरुष गटासाठी – प्रथम क्रमांक सगरोळी येथील छगण मारोती बोंबले, द्वितीय विष्णु विठठलराव लव्हाळे (सगरोळी), तृतीय-प्रदीप उदयसिंह राजपूत (संभाजीनगर), चौथा रोहित शिवाजी बिन्नर (नाशिक) , पाचवा सचिन रोहीदास पवार (परभणी) व सहावा विनय बालासाहेब ढोबळे (परभणी) यांनी प्राविण्य संपादन केले.







तर खुले मॅरेथॉन महिला गटात - प्रथम निकीता विठ्ठल मात्रे (परभणी), द्वितीय परिमाला बालासाहेब बाबर (परभणी), तृतीय वैष्णवी विनोद दुधमल (नांदेड), चौथा आरती बाळगीर गोस्वामी (एकनाथ पाटील अकॅडमी,नांदेड), पाचवा मंजुषा पुंडलिक राठोड (एकनाथ पाटील अकॅडमी,नांदेड), सहावा- सारीका अशोक भालेराव (एकनाथ पाटील अकॅडमी,नांदेड) यांनी प्राविण्य संपादन केले आहे.  पुरुष व महिला प्राविण्य स्पर्धकांना प्रथम क्रमांक 11 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 9 हजार रुपये, तृतीय क्रमांक 7 हजार रुपये, चौथा क्रमांक 6 हजार रुपये, पाचवा क्रमांक 5 हजार रुपये व सहावा क्रमांक 4 हजार रुपये असे एकुण 84 हजार रुपये रोख, मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.  या खुले मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर, परभणी, यवतमाळ, बुलढाणा, जालना, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद व इतर जिल्हयातील स्पर्धक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी खेळाडूंना मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाल्याबददल शुभेच्छा दिल्यानिरोगी शरीर राहण्यासाठी मैदानावर खेळ खेळणे महत्वाचे असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी सांगीतले.


यासाठी पंच प्रमुख म्हणुन प्रलोभ कुलकर्णी व  बंटी सोनसळे यांनी काम पाहीले. त्यांचे सोबत पंच व रॅडर म्हणुन  वैभव दमकोंडवार, गोविंद पांचाळ, प्रभु धुमाळ, सिध्दोधन नरवाडे, अजय राठोड, अन्वर महमद, शिवाणी कापसे, वैभव अंभोरे, राजर्षी पुयड, विशाखा, शेख आमेर, अरविंद कोकाटे, बुध्दभुषग गायकवाड, कांचन मस्के आदीनी काम पाहिले. याप्रसंगी गजानन फुलारी (जिम्नॅस्टिक्स संघटना), चंद्रकांत आढाव (शिकई मार्शल आर्ट संघटना) व जिल्हयातील विविध क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रलोभ कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन बालाजी शिरसीकर यांनी मानले.

 

ही मॅराथॉन स्पर्धा यशस्वी करणेसाठी क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोयर तर कार्यालयातील मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, ज्ञानेश्वर रोठे, सोनबा ओव्हाळ आदींनी परिश्रम घेतले.

 

तसेच जिल्हास्तर क्रीडा महोत्सव अंतर्गत बास्केटबॉल, बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेपैकी आज सायं 4 वा. बास्केटबॉल स्पर्धेस सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हयातील क्रीडाप्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी केले आहे.

00000      

 आदराची भावना यातच

ज्येष्ठांच्या आनंदी जीवनाचा मार्ग

-         सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे

 

·         मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

55 ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी व सत्कार

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  ज्येष्ठ नागरिक हा समाजातील महत्वाचा घटक आहे. त्यांच्या कष्टावरच कुटूंब उभे राहिले यांची सतत जाणीव ठेवून तरुण पिढीने ज्येष्ठांना आदर व सन्मानाने वागविले पाहिजे. तसेच त्यांच्या आनंददायी जीवनासाठी त्यांना अत्यावश्यक असलेल्या सुविधा वेळेत मिळतील यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त  शिवानंद मिनगीरे यांनी केले. 15 सप्टेंबर रोजी संध्याछाया वृध्दाश्रमात ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी व सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय चिकित्सक डॉ. साहेबराव मोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पी. डी.जोशी पाटोदेकर हे होते. तर प्रमुख अतिथी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी बापू दासरी,  फेस्कॉम अध्यक्ष अशोक तेरकर, संध्याछाया वृद्धाश्रमाच्या सचिव सुरेखा पाटणी  यांची उपस्थिती होती. 


 

या कार्यक्रमात विशेष कार्य केलेल्या श्रीमती काडगेॲड.सिध्दीकीडॉ. काप्रतवार व इतर जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. वृध्दाश्रमातील 55 ज्येष्ठ नागरिकांची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील 12 वैद्यकिय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली . 

 


वृध्दाश्रमातील प्रवेशीत ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यमान भारत  कार्ड काढून देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे सहाय्यक आयुक्त  शिवानंद मिनगीरे यांनी सांगितले. जेष्ठ नागरीकांसाठीच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.  नागरिकांच्या समस्या वरचेवर  गंभीर बनत आहेत. समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येवून काम करण्याची गरज असल्याचे समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी  सांगितले.   तसेच आपण वृद्धांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही डॉ. साहेबराव मोरे यांनी दिली. यावेळी पी.डी. जोशी पाटोदकर यांनी जेष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मागील तीस वर्षाचा आढावा घेतला.


 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अंजली नरवाडे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती गंगातीर यांनी केले. हा कार्यकम यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एम.पी.राठोड झंपलवाडजेटलावार यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदशनाखाली संपन्न झाला. 

0000

 

 

 

 वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास 

महामंडळाच्या विविध योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रर्वगातील लोकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील इच्छूक लाभार्थ्यांनी www.vjnt.in   या संकेतस्थळावर अर्ज करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड यांचा दूरध्वनी क्रमांक (02462) 202044 येथे संपर्क करावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवडे  यांनी केले आहे.

 

योजनेची माहिती पुढील प्रमाणे आहे.

 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेची कर्ज व्याज परतावा मर्यादा 10 लाख पर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन असून यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल व इतर कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

 

 गट कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेसाठी कर्जाची मर्यादा 10 ते 50  लाख रुपये पर्यत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. गटातील सदस्याचे वय 18 ते 45 वर्षा पर्यंत असावे. गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते हे आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. गटातील सर्व सदस्यांचे सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमीनल करीता 8 लाख रुपयाची मर्यादा असावी. ही योजना ऑनलाईन असून याकरिता सदस्यांचे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, वयाचा पुरावा संबंधित व्यवसायाचे कोटेशन प्रकल्प अहवाल सोबत सर्व मूळ कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

 

रुपये 1 लाख थेट कर्ज योजना : या योजनेत महामंडळाकडून रुपये 1 लाख थेट  कर्ज दिले जाते. योजनेसाठी दोन जामिनदार व गहाणखत, बोझा नोंद करून देणे आवश्यक आहे. याकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला 1 लाख रुपया पर्यंत मर्यादा, रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचा परवाना इत्यादी कागदपत्रांसह संबंधित व्यवसायानुसार कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज महामंडळाकडून जातीचा मूळ दाखला व आधार कार्ड दाखवून रितसर नोंद करून अर्जदारास मिळेल.

 

बीज भांडवल योजना : बीज भांडवल योजना ही बँकेमार्फत राबविली जाते. अर्जदाराने महामंडळाकडून जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (1 लाखापर्यंत), रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, संबंधीत व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून कार्यालयात दाखल करावेत. यापूर्वी लाभार्थ्यांनी कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.

 

वरील योजना सन 2022- 2023 या आर्थिक वर्षाकरिता राबविण्यात येत आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे  50, गट कर्ज व्याज परतावा योजनेचे 02,  बीज भांडवल कर्ज योजना 50, रुपये 1 लाख थेट कर्ज योजना 100 असे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. वरील योजनेचा जास्तीत-जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000000

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

नांदेड, (जिमाका)दि. 16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार 17 सप्टेंबर 2023 रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल. यानंतर  सकाळी  9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होईल.  या समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.   

 

समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये.  या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालयेसंस्थाआदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना व आदेश दिले आहेत.

 

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...