Thursday, March 14, 2024

 वृत्त क्र. 243  

किनवट तालुक्यातील भंडारवाडी "मधाचे गाव" घोषित

 

नांदेड दि. 14 :- किनवट तालुक्यातील भंडारवाडी हे गाव मराठवाड्यातील पहिले व महाराष्ट्रातील चौथे मधाचे गाव म्हणून नावलौकिकास आले आहे.  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांनी दिनांक 12 मार्च 2024 रोजी ही घोषणा केली. मंडळाचा उपक्रम शेती आणि पर्यावरणपूरक असून किनवट तालुक्यातील मौजे भंडारवाडी हे मराठवाड्यातील पहिले मधाचे गाव निर्माण होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने येथे जाहीर केले आहे.

 

भंडारवाडी ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने मधाचे गाव या कार्याक्रमाचे शुभारंभ सोहळा 12 मार्च 2024 रोजी झाला. या गावातील ग्रामपंचायत आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मंडळाचे सभापती रविंद्र साठे व किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती कावली मेघणाउपमुख्य कार्यकारी अधिकारी (उद्योग) बिपीन जगतापतहसिलदार श्रीमती शारदा चौडेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, तालुका कृषी अधिकारी बालाजी मुळेजिल्हा ग्रामोद्योग अधिकारी संजय सारंगधर, भंडारवाडीचे सरपंच अभिमन्यु गादेवाड व उपसरपंच अमोल केंद्रे, निरीक्षक (मध योजना) डी. व्ही. सुत्रावे, त्याबरोबर ग्रामसेवक तुपकर व मंडळाचे इतर कर्मचारी आणि ज्ञानेश्वर जेवलेवाड, समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

 

पंतप्रधानाच्या मधक्रांती आवाहनाला सकरात्मक प्रतिसा देत भंडारवाडी या गावाला मधाचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील एका गावाची निवड तसेच गाव येथे मधपेटीची गरज मंडळाचे सभापती रविंद्रजी साठे यांनी यावेळी सांगितले. या व्यवसायातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारेन तर मधमाशी वाचविण्याच्या चळवळीची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

 

राज्यात मधाचे गाव ही संकल्पना मोठ्याप्रमाणात राबविण्यात येत आहे. मधाचे गाव म्हणून भंडारवाडी या गावाची ओळख निर्माण होणार आहे. या गावात मधुबन आणि मधाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी बिपीज जगतात यांनी दिली. सदरील मधाचे गाव ही संकल्पना   रवींद्र साठे सभापतीआणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर विमला, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.

00000





 वृत्त क्र. 242  

लिडकॉम आपल्या दारी कार्यशाळा संपन्न

 

नांदेड दि. 14 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड यांच्यावतीने शासन आपल्या दारी या संकल्पनेतुन लिडकॉम आपल्या दारी ही कार्यशाळा  सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे तसेच लिडकॉम मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनातू नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात लिडकॉम आपल्या दारी कार्यशाळा सोमवार 11 मार्च 2024 रोजी संपन्न झाली. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.

 

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे, समतादूत बार्टी श्रीमती सुजाता पोहरे, रा.च. महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड, अ.भा.गुरू रविदास समता परिषद संस्थापक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, लिडकॉम जिल्हा व्यवस्थापक रूण राऊत, कर्मचारी सुनिल गोवंदे, दिपाली स्वामी, सुरेखा कांबळे यांची उपस्थिती होती.

 

मोठया प्रमाणात महामंडळ स्वरोजगारासाठी कर्ज पुरवठा व शैक्षणीक कर्ज उपलब्ध आहे. महामंडळ स्वरोजगारासाठी कर्ज पुरवठा व शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देत असल्याने चर्मकार समाजाने पुरेपुर लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. तसेच तरूण पिढीला व्यवसायाकडे वळविण्यासाठी मार्गदर्शन केले. महामंडळ व समाज बांधवांना सुवर्ण जयंती वर्षानिमित्त व संत रोहिदास महाराज यांच्या 647 व्या जयंती निमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

जिल्हा व्यवस्थापक अरूण रा यांनी प्रास्ताविकात महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती चर्मकार बांधवाना दिली. हे वर्ष महामंडळाचे सुवर्ण महोत्सवी सुरू असल्याने यामध्ये लाभार्थ्यांना व्याज दरात कपात झाली असून मोठया संख्यने योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरुण राऊत यांनी केले. महामंडळाची उत्पादन केंद्र विक्री केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विका केंद्र प्रशिक्षण याबाबत सविस्तर माहिती दिली.

 

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे शंकर पवार यांनी शुभेच्छा देत महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त चांभार, मोची, ढोर, होलार युवक-युवती उमेदवारांनी मिळवून घ्यावा, असे सांगीतले.

 

यानंतर महामंडळामार्फत कर्ज योजनेचे माहिती पत्रक व महामंडळाच्या दिनदर्शिका सर्व चर्मकार बांधवांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन आणि महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश हराळे यांनी केले. अरुण राउत यांनी सर्व प्रमुख पाहुण्याचे व चर्मकार बांधवाचे आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने चर्मकार महिला व पुरूष उपस्थित होते.

00000

 वृत्त क्र. 241

 वृत्त क्र. 240  

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...