Thursday, September 15, 2016

जिल्ह्यात दिवसभरात
सरासरी 24.55 मि.मी. पाऊस   
           नांदेड, दि. 16 :- जिल्ह्यात  शुक्रवार 16 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 392.77 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 24.55 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 776.07 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने) लोहा- 104.36, अर्धापुर- 96.90, भोकर- 96.10,  नांदेड- 94.45, हदगाव-92.42, माहूर- 84.92, कंधार- 82.48, बिलोली- 81.89, मुखेड- 81.70, हिमायतनगर- 79.54, नायगाव- 75.47, धर्माबाद- 71.00, मुदखेड- 69.12, किनवट- 69.01, देगलूर- 63.20, उमरी- 61.51. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची  टक्केवारी  81.22 इतकी झाली आहे.   
जिल्ह्यात शुक्रवार 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 33.38 (861.25), मुदखेड- 13.67 (590.02), अर्धापूर- 49.00 (842.66) , भोकर- 44.25 (957.50), उमरी- 39.33 (612.93), कंधार- 25.17 (665.31), लोहा- 29.83 (869.87), किनवट- 26.57 (856.74), माहूर- 16.50 (1053.00), हदगाव- 18.86 (903.26), हिमायतनगर- 19.00 (777.32), देगलूर- 12.00 (569.01), बिलोली- 10.00 (792.80), धर्माबाद- 0.67 (650.04), नायगाव- 16.40 (691.00), मुखेड- 38.14 (724.55) आज  अखेर  पावसाची सरासरी 776.07  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 12417.06) मिलीमीटर आहे. 

00000
सैनिक कल्याण विभागामध्ये
विविध पदांसाठी सरळसेवेने भरती
नांदेड, दि. 16 :- सैनिक कल्याण विभागाच्या कार्यालया गट-क पदे सरळसेवेने भरण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने गुरुवार 13 ऑक्टोंबर पर्यंत सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.com या संकेतस्थळावर जिल्हयातील माजी सैनिकांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी केले आहे.
यामध्ये लिपीक टंकलेखक-8, कल्याण संघटक-4 व वसतीगृह अधिक्षक-1  पदांसाठी अर्ज करण्याकरिता सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर पहिल्या पानाच्या (Home Page) उजव्याबाजुस सेवाभरती यावर क्लीक केल्यानंतर ऑनलाईन अर्ज उपलब्ध्‍ा होईल. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड यांचेशी संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शनिवारी
विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ
नांदेड, दि. 15 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त शनिवार 17 सप्टेंबर 2016 रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. तसेच सकाळी 8.30 वाजता हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानंवदना व पुष्पचक्र अर्पणाचा कार्यक्रम होणार आहे.  या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे. 
या समारंभासाठी निमंत्रीतांनी राष्ट्रीय, समारंभीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्यादृष्टिने बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान , या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.15 पूर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000000
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
फग्गनसिंह कुलास्ते यांचा दौरा
   नांदेड, दि. 15 :-  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गनसिंह कुलास्ते हे रविवार 17 सप्टेंबर 2016 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
 शनिवार 17 सप्टेंबर 2016 रोजी नागपूर येथून मोटारीने दुपारी 12 वा. किनवट येथे आगमन व स्थानीक कार्यक्रमांना उपस्थिती. दुपारी 2 वा. किनवट येथून मोटारीने अदिलाबाद ( तेलंगणा) कडे प्रयाण करतील.

000000
सहकार पुरस्कारासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन   
           नांदेड, दि. 15 :-  सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना शासनाकडून सहकार पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला जातो. इच्छूक संस्थांनी सन 2015-16 चा प्रस्ताव संबंधीत तालुक्यातील सहाय्यक निबंधक, उपनिबंधक यांच्या कार्यालयात शुक्रवार 7 ऑक्टोंबर 2016 पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन सहकार विभागामार्फत करण्यात आले आहे. 

00000
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी
रविवारी मतदान केंद्रावर अर्ज स्विकारणार
  नांदेड, दि. 15 :- निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम 16 सप्टेंबर ते 24 ऑक्टोंबर 2016 पर्यंत जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 1 जानेवारी 2017 या आर्हता दिनांकावर ज्या नागरिकाचे वय 18 वर्षे पूर्ण होईल त्यांनी मतदार विहित नमुन्यातील नोंदणी अर्ज संबंधित मतदान केंद्राच्या बीएलओकडे आवश्यक कागदपत्रासह सादर करावा, असे आवाहन तहसिलदार धर्माबाद यांनी केले आहे.  
या मोहिमेत मतदारांची नोंदणी, दुबार, मयत, स्थलांतरीत मतदारांची वगळणी करणे, छायाचित्रे नसलेल्या मतदारांचे छायाचित्रे अपलोड करण्याचे काम होणार आहे. रविवार 18 सप्टेंबर व 19 ऑक्टोंबर 2016 रोजी मतदान केंद्रावर बीलओ उपस्थित राहून अर्ज स्विकारणार आहेत. या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमासाठी धर्माबाद तालुक्यातील बीएलओंची बैठक शुक्रवार 16 सप्टेंबर  रोजी तहसिल कार्यालय धर्माबाद येथे आयोजित केली आहे. या मोहिमेत जास्तीतजास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन धर्माबाद तहसिलचे प्रभारी तहलिसदार सुनिल माचेवाड यांनी केले आहे. 

000000
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 26.80 मि.मी. पाऊस   
लोहा तालुक्यात हंगामातील सरासरी पूर्ण
  
           नांदेड, दि. 15 :- जिल्ह्यात  गुरुवार 15 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 428.77 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 26.80 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 751.52 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने) लोहा- 100.78, भोकर- 91.65,  अर्धापुर- 91.27, नांदेड- 90.79, हदगाव- 90.49, माहूर- 83.59, बिलोली- 80.86, कंधार- 79.36, हिमायतनगर- 77.59,  मुखेड- 77.40, नायगाव- 73.68, धर्माबाद- 70.92, मुदखेड- 67.52, किनवट- 66.95, देगलूर- 61.87, उमरी- 57.57. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची  टक्केवारी  78.65 इतकी झाली आहे.   
जिल्ह्यात गुरुवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 45.13 (827.87), मुदखेड- 17.00 (576.35), अर्धापूर- 49.33 (793.66) , भोकर- 21.75 (913.25), उमरी- 45.00 (573.60), कंधार- 24.33 (640.14), लोहा- 32.00 (839.84), किनवट- 10.14 (830.17), माहूर- 31.75 (1036.50), हदगाव- 29.14 (884.40), हिमायतनगर- निरंक (758.32), देगलूर- 17.83 (557.01), बिलोली- 21.80 (782.80), धर्माबाद- 14.00 (649.37), नायगाव- 26.00 (674.60), मुखेड- 43.57 (686.41) आज  अखेर  पावसाची सरासरी 751.52  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 12024.29) मिलीमीटर आहे. 

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...