Monday, May 17, 2021

 

खावटी अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 17 :- आदिवासी समाजातील गरजू कुटूंबाना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने खावटी अनुदान योजना पुन्हा नव्याने कार्यान्वित केली आहे. या योजनेसाठी पूर्वी अर्ज न भरलेल्या तसेच अटी व निकषात बसणाऱ्या पात्र आदिवासी समाजातील कुटुंबानी नवीन अर्ज भरावेत.  नवीन अर्ज संबंधीत कार्यक्षेत्रातील मुख्याध्यापक शासकीय, अनुदानित आश्रमशाळा यांच्याकडे उपलब्ध होतील. लाभार्थ्यांनी अर्जासोबत आधारकार्ड झेरॉक्स प्रत, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकचे झेरॉक्स किंवा पोस्टाचे पासबुकचे झेरॉक्स, उपविभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच.पुजार यांनी केले आहे.

0000 

 

महात्‍मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत

कार्य करण्‍यास इच्‍छुक स्‍वयंसेवी संस्‍थांनी 31 मे पर्यंत अर्ज करावेत

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-  ज्‍या स्‍वयंसेवी संस्‍था जिल्‍हास्‍तरावर किंवा तालुकास्‍तरावर प्रशिक्षण, संवाद, श्रमदान, नियोजनात सहयोग, सामाजिक अंकेक्षण, गुणवत्‍ता मोजमापाच्‍या कामात सहकार्य करण्‍यास इच्‍छुक आहेत. त्या स्वयंसेवी संस्थेने कार्यालयीन वेळेत सोमवार 31 मे 2021 पर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयात समक्ष अथवा टपालाने आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्‍त होणाऱ्या अर्जांचा विचार करण्‍यात येणार नाही. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्‍या संस्‍थांनी देखील आवश्‍यक कागदपत्रांसह नव्‍याने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा मग्रारोहयोचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे मृद व जलसंधारण, वृक्ष संगोपन, सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्थापन वैयक्‍तीक लाभाच्‍या योजना व अभिसरण व मुलभूत सुविधांचा विकास अंतर्गत कामे केली जातात.  योजनेच्‍या कामाची अंमलबजावणी करताना अशासकीय संस्‍थांची व इतर सेवाभावी संस्‍थांची मदत घेतल्यास योजना प्रभावीपणे राबवून लोकांचे जीवनमान उंचावणे शक्‍य होईल. योजनेमध्‍ये सीएसओ, एफपीओ, सीबीओ, एनजीओची अ‍खर्चित भागीदारी साठी स्‍वयंसेवी संस्‍थांचा सहभाग घेण्‍याबाबत निर्णय घेण्‍यात आला आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्‍याचे अनुषंगाने मगाराग्रारोहयोची सहयोगी संस्‍था म्‍हणून स्‍वयंसेवी संस्‍थांची निवड करण्‍यात येणार आहे.

 

स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. विना आर्थिक सहाय्याचे काम करण्‍याची तयारी असावी. शासकीय क्षेत्रात काम करण्‍याचा अनुभव असावा. जलसंधारण किंवा सामुदायिक विकासाचे नियोजन क्षेत्रात काम करण्‍याचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. अशा स्‍वयंसेवी संस्‍थांचे प्रशासकीय संघटन आवश्‍यक त्‍या जिल्‍ह्यात, तालुक्‍यात असावे. सदर स्‍वयंसेवी संस्‍था निती आयोगाच्‍या एनजीओ पीएस पोर्टलवर नोंदणीकृत असावी. अर्ज सादर केलेल्‍या पात्र स्‍वयंसेवी संस्‍थांची ज्‍या भौगोलिक क्षेत्रात आणि ज्‍या कार्यक्षेत्रात काम करण्‍यास तयारी असेल, त्‍यांचे कामाचा अनुभव आणि गुणवत्‍ता पाहता त्‍याकरीता काम करण्‍यास रितसर परवानगी देण्‍यात येईल. हे कार्य विनामुल्‍य करावयाचे असून कामाचा कोणताही मोबदला अनुज्ञेय असणार नाही. अधिक माहितीसाठी नियोजन विभाग (रोहयो) शासन परिपत्रक क्रमांक मग्रारो-2020/प्र.क्र.97/रोहयो-10अ दिनांक 13 जानेवारी 2021 चे अवलोकन करावे असेही कळविले आहे.  

00000

 

379 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 154 व्यक्ती कोरोना बाधित

12 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 641 अहवालापैकी 154अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 123 तर अँटिजेन तपासणीद्वारे 31 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 103 एवढी झाली असून यातील 81 हजार 918 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 991 रुग्ण उपचार घेत असून 123 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 16 व 17 मे 2021 या दोन दिवसांच्या कालावधीत 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 816 एवढी झाली आहे. दिनांक 16 मे 2021 रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे शिवशंकरनगर किनवट येथील 80 वर्षाचा पुरुष, मुदखेड येथील 45 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड नांदेड येथे लोहा येथील 60 वर्षाची महिला, हदगाव तालुक्यातील आष्टी येथील 58 वर्षाचा पुरुष, मुदखेड तालुक्यातील जवळा येथील 60 वर्षाची महिला, आश्विनी कोविड रुग्णालयात शारदानगर नांदेड येथील 71 वर्षाचा पुरुष, यशोसाई कोविड रुग्णालयात फत्तेपूर नांदेड येथील 35 वर्षाचा पुरुष, लोटस कोविड रुग्णालयात नायगाव तालुक्यातील नरसी येथील 35 वर्षाचा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णालयात भोकर येथील 58 वर्षाची महिला, डेल्टा कोविड रुग्णालयात देगलूर तालुक्यातील टाकळी येथील 66 वर्षाचा पुरुष तर 17 मे रोजी भगवती कोविड रुग्णालयात पुरुषार्थनगर नांदेड येथील 70 वर्षाची महिला, नायगाव तालुक्यातील राहेर येथील 65 वर्षाच्या पुरुष यांचा समावेश आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 61, देगलूर 6, किनवट 5, मुखेड 4, लातूर 1, नांदेड ग्रामीण 15, हदगाव 4, लोहा 2, नायगाव 2, परभणी 2, अर्धापूर 4, हिमायतनगर 2, माहूर 4, यवतमाळ 1, बिलोली 2, कंधार 3, मुदखेड 1, हिंगोली 2, औरंगाबाद 1 बाधित आढळले तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 3, कंधर 1, मुदखेड 2, लातूर 1, भोकर 1, किनवट 2, मुखेड 3, हिंगोली 1, देगलूर 6, लोहा 1, नायगाव 1, हदगाव 2, माहूर 6, यवतमाळ 1 असे एकूण 154 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 379 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 7, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 196, मालेगाव टिसीयू कोविड रुग्णालय 1, धर्माबाद तालुक्यातंर्गत 7, अर्धापूर तालुक्यातंर्गत 3, मांडवी कोविड केअर सेंटर 3, खाजगी रुग्णलय 78, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 14, किनवट कोविड रुग्णालय 19, मुदखेड कोविड केअर सेंटर 13, माहूर तालुक्यांतर्गत 2, बिलोली तालुक्यांतर्गत 1, उमरी तालुक्यांतर्गत 2, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 2, नायगाव तालुक्यातंर्गत 1, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 9, हदगाव 12, लोहा तालुक्यांतर्गत 3, मुखेड कोविड रुग्णालय 6 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 2 हजार 991 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 95, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 56, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 60, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 17, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 40, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 43, देगलूर कोविड रुग्णालय 6, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 19, बिलोली कोविड केअर सेंटर 85, नायगाव कोविड केअर सेंटर 9, उमरी कोविड केअर सेंटर 13, माहूर कोविड केअर सेंटर 11, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 21, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 17, कंधार कोविड केअर सेंटर 1, धर्माबाद कोविड केअर सेंटर 26, मुदखेड कोविड केअर सेंटर 2, अर्धापूर कोविड केअर सेंटर 10, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11, बारड कोविड केअर सेंटर 16, मांडवी कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 3, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 583, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 313, खाजगी रुग्णालय 525 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 66, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 88, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 67, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 99 हजार 757

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 2 हजार 347

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 103

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 81 हजार 918

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 816

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-17

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-228

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 991

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-123.

00000

 

 कोरोना लसीचा दुसरा डोस 45 वर्षावरील नागरिकांसाठीच  

या प्राधान्यक्रमानेच नांदेड जिल्ह्यातील लसीकरण मोहिम

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यातील लसीकरणाच्या दुसऱ्या डोसबाबत 45 वर्षावरील नागरिकांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यांनाच लस देण्याचा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. टप्याटप्याने ज्येष्ठांना प्राधान्य देत लसीकरणाची ही मोहिम भविष्यातील डोसची उपलब्धता लक्षात घेऊन गतीने पूर्ण करु असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी व्यक्त केला.

 

लस ज्या प्रमाणात उपलब्ध होत आहे त्याप्रमाणात जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर लसींचा पुरवठा केला जात आहे. यात कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लसींचा समावेश आहे. नागरिकांची अधिकाधिक सोय व्हावी यासाठी आरोग्य विभागातील कर्मचारी कटिबद्ध असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

दिनांक 18 मे रोजी होणाऱ्या लसीकरणासाठी नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण असा सर्व 91 लसीकरण केंद्रांना प्रत्येकी 100 व 50 डोसची मात्रा उपलब्ध झाल्याप्रमाणे वितरीत करण्यात येत आहे. यात मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, जंगमवाडी, कौठा, सिडको या 7 केंद्रावर कोविशील्डचे शंभर डोस प्रत्येकी देण्यात आले आहेत. श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शहरी दवाखाना जंगमवाडी असा एकुण 3 केंद्रावर कोव्हॅक्सिनचे 100 डोस प्रत्येकी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. स्त्री रुग्णालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना शिवाजीनगर, सिडको, कौठा असा 5 केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

शहरी क्षेत्रात मोडणाऱ्या  उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, उजिरू मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी, कंधार या 14 केंद्रांवर कोविशील्डचे 100 डोस प्रत्येकी दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, माहूर, नायगाव, भोकर असा एकुण 7 लसीकरण केंद्रांना प्रत्येकी 50 याप्रमाणे कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

कोविशील्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस घेणे वैज्ञानिकांनी अधिक हितावह असल्याचे स्पष्ट केले आहे. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण तुर्तास थांबविण्यात आले आहे. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल.

0000

 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा नांदेड दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा  दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल.

 

मंगळवार 18 मे 2021 रोजी लातूर येथून मोटारीने सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.45 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण. 

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...