वीर
पुत्र शहीद जवान संभाजी कदम
यांच्या
कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन
राज्य
शासनाच्यावतीने 15 लाख रुपयाची आर्थिक मदत
नांदेड, दि. 11 :- जिल्ह्यातील लोहा
तालुक्यातील जानापुरी येथील वीर पुत्र शहीद जवान संभाजी यशवंत कदम यांच्या कुटुंबियांची
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरी जावून आस्थेवाईकपणे
विचारपूस करुन सांत्वन केले. राज्य शासनाच्यावतीने आ
र्थीक मदतीचा 15 लाख रुपयाचा
धनादेश त्यांच्या पत्नी शीतल कदम यांच्याकडे सुपूर्द केला.
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आपल्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी असून शासन तुमच्या पाठीशी
खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात कुटुंबियांना त्यांनी धीर दिला. यावेळी शहीद संभाजी
कदम यांचे
वडील यशवंत, आई
लताबाई, पत्नी
शीतल, मुलगी तेजस्वनी, नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी राज्याचे कौशल्य
विकास व उद्योजकता, कामगार , भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी
पाटील-निलंगेकर, खासदार सुनिल गायकवाड,
आमदार हेमंत पाटील, उपसरपंच बळीराम कदम, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, प्रभारी उपविभागीय
अधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर व्ही. व्ही. पटवारी,
अधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
0000000