Monday, February 26, 2024

 सुधारित वृत्त क्रमांक 170 

आज मराठी भाषा गौरव दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

 

यावर्षीच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधूनछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर मराठी मनात व्हावा म्हणून 350 वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचाउत्सव मराठी भाषा गौरव दिनाचा या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचेसाहित्याचे अभिवाचन व्याख्यानपरिसंवादचर्चासत्र अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा गौरव दिन साजरा करताना मराठी भाषेचा प्रचार व्हावा हा उद्देश आहे. या धोरणाची अमंलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी सर्व कार्यालयात मराठी भाषा प्रतिज्ञा  घेतली जाईल. यासाठी स्थानिक प्रशासनाव्दारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 170 

27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन 

 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून  वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी  हा जन्मदिन  मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना 29 डिसेंबर 2023 व 14 फेब्रुवारी 2020 च्या परिपत्रकान्वये निर्गमित केल्या आहेत. 

 

या वर्षीच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधूनछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर मराठी मनात व्हावा म्हणून 350 वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचाउत्सव मराठी भाषा गौरव दिनाचा या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचेसाहित्याचे अभिवाचनव्याख्यानपरिसंवादचर्चासत्र अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

हा गौरव दिन साजरा करताना मराठी भाषेचा प्रचार व्हावा हा उद्देश आहे. या धोरणाची अमंलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात  विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी सर्व कार्यालयात मराठी भाषा प्रतिज्ञा  घेतली जाईल.  यासाठी स्थानिक प्रशासनाव्दारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. 

00000

 वृत्त क्रमांक 169 

मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :-  मध्यप्रदेशचे वित्तव्यावसायिक कर योजनाअर्थ व सांख्यिकी मंत्री तथा मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा हे नांदेड जिल्ह्याच्या  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.  

 

मंगळवार 27 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1.30 वा. हिंगोली येथून कळमनुरीबाळापूरमालेगाव मार्गे नांदेड येथे आगमन. दुपारी 3 वा. नांदेड लोकसभा मतदारसंघ बूथ कार्यकर्ता संमेलनास उपस्थिती. रात्री वेळेनुसार आराम. बुधवार 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वा. नांदेडहून परभणीकडे प्रयाण करतील.

00000

वृत्त क्रमांक 168

 नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध

नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेड जिल्ह्यात व श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळाच्या 10 कि.मी परिघ क्षेत्रात 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार ड्रोन कॅमेराड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केला आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या हवाई वाहतुकीची शक्यता आहे. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टिने जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतचा आदेश 25 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमीत केला आहे.

0000

 वृत्त क्रमांक 167

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 26 :-  जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जिल्हयातील उद्योजकांसाठीउद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूकीला चालना देण्यासाठी गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.   ही गुंतवणूक परिषद माहे मार्च 2024 च्या पहिल्या आठवडयात घेण्यात येणार आहे. या परिषदेसाठी  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.  जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनानामांकित उद्योजकऔद्योगिक समुहसनदी लेखापालउद्योग व्यवसायाशी संबंधित सर्व शासकिय विभाग यांचा समावेश राहणार आहेअसे जिल्हा उद्योग केंद्राने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

या परिषदेचा उद्देश जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणेजिल्हास्तरीय गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणेजिल्हयाना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्हयाच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे असा आहे.

या गुंतवणूक परिषदेतंर्गत नांदेड जिल्हयातील प्रमुख उद्योग क्षेत्र असलेल्या कृषी क्षेत्रातील उद्योगांमध्ये तसेच इतर उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या उद्योगांना गुंतवणूकीच्या संधीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.  यातंर्गत ‍ एक खिडकी योजना प्रस्तावित असून त्याअतंर्गत सेवावैद्यकीय सेवा,  शैक्षणिक प्रकल्प इ.  पायाभूत सुविधा देण्याबाबत तसेच गुंतवणूकदारांना उद्योगांसाठी लागणारे विविध परवानेअनुदान इ.अनुषंगिक बाबी  उद्योगास प्राधान्याने दिल्या जातील. 

तरी जिल्ह्यातील होतकरु व उत्सुक उद्योजक संघटनाऔद्योगिक समुहातील उद्योग घटक व इतर उद्योग व्यवसायाशी संबंधीत सर्व संस्था यांनी जिल्हयात  उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीसाठी येणाऱ्या अडचणी व संधी इ. बाबींच्या माहितीबाबत व चर्चेसाठी जिल्हा उद्योग केंद्रउद्योग भवनपहिला मजलासहकारी औद्योगिक वसाहतशिवाजीनगरनांदेड येथे संपर्क साधावाअसे आवाहन  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 166

 व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना

वसतिगृहात प्रवेशासाठी 10 मार्च पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :-  इयत्ता 12 वी नंतरच्या उच्चशिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याना वसतिगृहामध्ये विनामुल्य प्रवेश ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.  गरजु विद्यार्थी व विद्यार्थीनीनी वसतिगृहातील प्रवेशाबाबतचे अर्ज सहाय्यक संचालकइतर मागास बहुजन कल्याणनांदेड   डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनजाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे वरील बाजुस, नांदेड या ठिकाणी संपर्क साधून विनामूल्य अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. सदरचे अर्ज 10 मार्च 2024 पुर्वी कार्यालयात सादर करावेतअसे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालकशिवानंद मिनगीरे यांनी केले आहे. 

 

एकविसावे शतक हे स्पर्धात्मक युग असून त्यामध्ये इतर मागासप्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्याना टिकूण राहणेइतर प्रवर्गातील विद्यार्थ्याशी स्पर्धा करणे तसेच आवश्यक ते कौशल्य व गुणवत्ताधारण करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी, विद्यार्थीनीना आर्थिकसामाजिक व शैक्षणिक दृष्टया विविध क्षेत्रात स्पर्धेला तोंड देता यावे आणि शैक्षणिकद्ष्टया उन्नती होण्याच्य यादृष्टीकोणातून व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जिल्हयाच्या ठिकाणी वसतिगृहाची सुविधा नसल्याने शासनाने मुलांसाठी-व मुलींसाठी-अशी दोन वसतिगृहे नांदेड जिल्हयासाठी मंजुर केलेली आहेत.

 

राज्यातील इतर मागास प्रवर्गविमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जिल्हानिहाय दोन याप्रमाणे शासकीय वसतिगृह सुरु करण्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय 29 नोव्हेबर 2022 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये नांदेड जिल्हयात  मुलांसाठी- व मुलींसाठी-अशा दोन वसतिगृहाचा समावेश आहे. हे वसतिगृहे तातडीने सुरु करावीत. त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागसप्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानी प्रवेश घ्यावा असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे असे इतर मागास बहुजन कल्याण नांदेड विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 00000 

 वृत्त क्रमांक 165

 

नांदेड डाकघर विभागाच्यावतीने जिल्ह्यात

आधार शिला 2.0 विशेष मोहिमेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेड शहरातील सर्व नागरिकांना आधार संबधी सर्व सुविधा देण्यासाठी नांदेड डाक विभाग मार्फत 14 मार्च 2024 पर्यत आधार शिला 2.0 नावाची विशेष मोहिम सुरु केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड शहरातील पुढील टपाल कार्यालयात आधार नोंदणी व आधार अद्यातीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

 

ही सुविधा नांदेड प्रधान डाक घर, शिवाजीनगर उप डाक घरसिडको उप डाकघर, इतवारा उप डाक घर, तरोडा रोड उप डाक घर या व्यतिरिक्त नांदेड जिल्ह्यात तालुकास्तरावरील पुढील कार्यालायात आधार नोंदणी व आधार अद्यातीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात किनवट उप डाकघर, माहूर उप डाकघरभोकर उप डाकघर, हदगाव उप डाकघरदेगलूर उप डाकघर, कंधार उप डाकघर, बिलोली उप डाकघरलोहा उप डाकघरधर्माबाद उप डाकघरमुखेड उप डाकघर व नायगाव उप डाकघर समावेश आहे.

 

सर्व नागरिकांनी या निमित्ताने या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त संख्येने आधार नोंदणी व अद्यातीकरण करून या संधीचा लाभ घ्यावा. तसेच ज्यांना कुणाला आपल्या प्रभागामध्ये विशेष आधार कॅम्पचे आयोजन करावयाचे असेल त्यांनी अधीक्षक डाकघर नांदेड कार्यालय नांदेड मो. 8668633396 येथे संपर्क साधावा,  असे आवाहन नांदेड विभाग नांदेडचे अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.   

 

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरीकासाठी अत्यंत आवश्यक असलेले ओळखपत्र आहे. या दस्तऐवजामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेणे शक्य होते. शिवाय पेंशनबँक खातेडीजिटल नोंदणी अशा अनेक सुविधा मिळतात. जर एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्या व्यक्तीला शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार नाही. तो व्यक्ती या योजनेपासून वंचित राहतो. अशा या महत्वाच्या दस्तऐवजामध्ये व्यक्तीचे नावपत्तावयलिंगजन्म तारीख आदी माहितीमध्ये काही कारणास्तव बऱ्याच वेळा बदल करावा लागतो व त्यासाठी तासान तास आधार केंद्रावर रांगेत थांबावे लागते. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले आहेअसेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...