Monday, February 26, 2024

 सुधारित वृत्त क्रमांक 170 

आज मराठी भाषा गौरव दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

 

यावर्षीच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधूनछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर मराठी मनात व्हावा म्हणून 350 वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचाउत्सव मराठी भाषा गौरव दिनाचा या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचेसाहित्याचे अभिवाचन व्याख्यानपरिसंवादचर्चासत्र अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा गौरव दिन साजरा करताना मराठी भाषेचा प्रचार व्हावा हा उद्देश आहे. या धोरणाची अमंलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केली जाणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी सर्व कार्यालयात मराठी भाषा प्रतिज्ञा  घेतली जाईल. यासाठी स्थानिक प्रशासनाव्दारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...