Monday, February 26, 2024

वृत्त क्रमांक 166

 व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना

वसतिगृहात प्रवेशासाठी 10 मार्च पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :-  इयत्ता 12 वी नंतरच्या उच्चशिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याना वसतिगृहामध्ये विनामुल्य प्रवेश ऑफलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे.  गरजु विद्यार्थी व विद्यार्थीनीनी वसतिगृहातील प्रवेशाबाबतचे अर्ज सहाय्यक संचालकइतर मागास बहुजन कल्याणनांदेड   डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनजाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचे वरील बाजुस, नांदेड या ठिकाणी संपर्क साधून विनामूल्य अर्ज प्राप्त करुन घ्यावेत. सदरचे अर्ज 10 मार्च 2024 पुर्वी कार्यालयात सादर करावेतअसे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालकशिवानंद मिनगीरे यांनी केले आहे. 

 

एकविसावे शतक हे स्पर्धात्मक युग असून त्यामध्ये इतर मागासप्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्याना टिकूण राहणेइतर प्रवर्गातील विद्यार्थ्याशी स्पर्धा करणे तसेच आवश्यक ते कौशल्य व गुणवत्ताधारण करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी, विद्यार्थीनीना आर्थिकसामाजिक व शैक्षणिक दृष्टया विविध क्षेत्रात स्पर्धेला तोंड देता यावे आणि शैक्षणिकद्ष्टया उन्नती होण्याच्य यादृष्टीकोणातून व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जिल्हयाच्या ठिकाणी वसतिगृहाची सुविधा नसल्याने शासनाने मुलांसाठी-व मुलींसाठी-अशी दोन वसतिगृहे नांदेड जिल्हयासाठी मंजुर केलेली आहेत.

 

राज्यातील इतर मागास प्रवर्गविमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जिल्हानिहाय दोन याप्रमाणे शासकीय वसतिगृह सुरु करण्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय 29 नोव्हेबर 2022 अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये नांदेड जिल्हयात  मुलांसाठी- व मुलींसाठी-अशा दोन वसतिगृहाचा समावेश आहे. हे वसतिगृहे तातडीने सुरु करावीत. त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागसप्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानी प्रवेश घ्यावा असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे असे इतर मागास बहुजन कल्याण नांदेड विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 00000 

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...