वृत्त क्रमांक 165
नांदेड डाकघर विभागाच्यावतीने जिल्ह्यात
आधार शिला 2.0 विशेष मोहिमेचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेड शहरातील सर्व नागरिकांना आधार संबधी सर्व सुविधा देण्यासाठी नांदेड डाक विभाग मार्फत 14 मार्च 2024 पर्यत आधार शिला 2.0 नावाची विशेष मोहिम सुरु केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड शहरातील पुढील टपाल कार्यालयात आधार नोंदणी व आधार अद्यातीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
ही सुविधा नांदेड प्रधान डाक घर, शिवाजीनगर उप डाक घर, सिडको उप डाकघर, इतवारा उप डाक घर, तरोडा रोड उप डाक घर या व्यतिरिक्त नांदेड जिल्ह्यात तालुकास्तरावरील पुढील कार्यालायात आधार नोंदणी व आधार अद्यातीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात किनवट उप डाकघर, माहूर उप डाकघर, भोकर उप डाकघर, हदगाव उप डाकघर, देगलूर उप डाकघर, कंधार उप डाकघर, बिलोली उप डाकघर, लोहा उप डाकघर, धर्माबाद उप डाकघर, मुखेड उप डाकघर व नायगाव उप डाकघर समावेश आहे.
सर्व नागरिकांनी या निमित्ताने या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त संख्येने आधार नोंदणी व अद्यातीकरण करून या संधीचा लाभ घ्यावा. तसेच ज्यांना कुणाला आपल्या प्रभागामध्ये विशेष आधार कॅम्पचे आयोजन करावयाचे असेल त्यांनी अधीक्षक डाकघर नांदेड कार्यालय नांदेड मो. 8668633396 येथे संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड विभाग नांदेडचे अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरीकासाठी अत्यंत आवश्यक असलेले ओळखपत्र आहे. या दस्तऐवजामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेणे शक्य होते. शिवाय पेंशन, बँक खाते, डीजिटल नोंदणी अशा अनेक सुविधा मिळतात. जर एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्या व्यक्तीला शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार नाही. तो व्यक्ती या योजनेपासून वंचित राहतो. अशा या महत्वाच्या दस्तऐवजामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, लिंग, जन्म तारीख आदी माहितीमध्ये काही कारणास्तव बऱ्याच वेळा बदल करावा लागतो व त्यासाठी तासान तास आधार केंद्रावर रांगेत थांबावे लागते. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment