Thursday, November 22, 2018


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे
                                 उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे यांचा दौरा  

नांदेड दि. 22:-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे (राज्यमंत्री दर्जा) हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

सोमवार, 26 नोव्हेंबर, 2018 रोजी दुपारी 2.45 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व स्थानिक कार्यकर्त्यासमवेत बैठक (वेळ राखीव). सांयकाळी 5.00 वाजता विश्रामगृह नांदेड येथून शासकीय वाहनाने पानभुशी ता. कंधार जि. नांदेडकडे प्रयाण. 5.30 वा. पानभुशी ता. कंधार येथे आगमन व स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा. 7.30 वाजता पानभुशी येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण. 8.00 वाजता विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार, दि. 27 नोव्हेंबर, 2018 रोजी विश्रामगृह , नांदेड येथून शासकीय वाहनाने उस्मानाबादकडे प्रयाण करतील.

0000

दुष्काळी परिस्थितीत जलाशयाखाली / तलावाखालील जमिनीचा विनियोग
                                         फक्त चारा पीके घेण्याबाबतची बैठक संपन्न   

 
नांदेड दि. 22:-  सन २०१८-१९ च्‍या दुष्‍काळी परिस्थितीत जलाशयाखाली/तलावाखालील जमीनीचा विनियोग फक्‍त चारा पीके घेण्‍याबाबत आज दिनांक २२ नोव्‍हेंबर २०१८ रोजी जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्‍यक्षतेखाली बैठक सपन्‍नं झाली .

या बैठकीत अधिक्षक अभियंता नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड, कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण नांदेड, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड, जिल्‍हा पशुसंवर्धन उप आयुक्‍त, नांदेड जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प नांदेड सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे उपस्थित होते.

         कृषि व पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विभाग यांचे शासन निर्णय क्रं एफडीआर-२०१७/ प्र.क्र.१६७/ पदुम-४ दि. १५ नोव्हेंबर, २०१८ अन्‍वये महाराष्‍ट्राच्‍या बहुतांश भागात अत्‍यल्‍प पर्जन्‍यमानामुळे दुष्‍काळी परिस्थिती निर्माण झाली असुन, संभाव्‍य चारा टंचाई विचारात घेता, गाळपेर क्षेत्रावर चारा पीकांचे उत्‍पादन  करुन जनावरांसाठी चारा उत्‍पादन करण्‍याच्‍या दृष्‍टीने शासनाने निर्देश दिलेले आहेत. तसेच चारा टंचाई निवारण्‍याकरीता लाभार्थी निवड, समन्‍वय व संनियंत्रण करण्‍यासाठी समिती गठीत करण्‍यात आली आले आहे.

जलसंपदा, मृद व जलसंधारण विभागाकडील जलाशयाखाली / तलावाखालील जमीन प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे बुडीताखालील जमीन मोकळ्या , उघड्या पडलेल्या आहेत. अशा जमिनीवर  शेतकऱ्यांना चारा पिके उत्‍पादनाकरीता वर्ष २०१८-१९ रब्‍बी व उन्‍हाळी  हंगामासाठी नाममात्र रु.1 दराने भाडेपट्टयावर देण्‍यात येणार आहे. या गाळपेरा जमिनीवर चारा पिकांचे मका, ज्‍वारी, बाजरी व न्‍युट्रिफिड बियाणे पशुसंवर्धन विभागामार्फत विनामुल्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत.

या योजनेचे अर्ज प्रत्‍येक तालुक्‍यात पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती विस्‍तार यांचे स्‍तरावरुन स्विकारण्‍यात येतील व अर्ज स्किारण्‍याचा कालावधी २६ नोव्हेंबर,2018 ते ०४ डिसेंबर, २०१८ पर्यंत राहणार आहे. या योजनेत पशुधन पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

0000  

चार लाख पन्नास हजार रुपये किमंतीचा वजीर गुटखा
                                      व बुलोरो पिकअप वाहन किमंत रुपये सात लाख जप्त 

              नांदेड दि. 22:-  भोकर पोलीस स्टेशन व अन्न व औषध प्रशासन, नांदेड यांच्या संयुक्त कारवाईमध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्रीसाठी वाहतुक करणारे वाहन चालक बालाजी विठ्ठल करंडेकर यांच्या ताब्यातून वाहन क्रमांक एमएच-26-बीई 0925 व गुटखा जप्त करुन ताब्यात घेतलेले आहे.

           महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला इत्यादी तत्सम अन्न पदार्थावर बंदी असून या पदार्थ्याच्या सेवनाने कर्करोग , पोटाचे विकार इत्यादी दुर्धर आजार होतात. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिध्द झालेले आहे. तथापि, गुटखा पानमसाला इत्यादी तत्सम अन्न पदार्थाच्या व्यसनांच्या आहारी पडलेल्या व्यक्तींना छुप्या प्रकारे चोरुन व जाणूनबुजून विक्री करणारे समाजकंटक त्यांचा पुरवठा करीत आहेत. त्या अनुषंगाने कारवाईचा भाग म्हणून अन्न व औषध प्रशासन , नांदेड व पोलीस प्रशासन भोकर यांनी वाहन चालक बालाजी विठ्ठल करडेंकर यांच्याकडून उपरोक्त नमूद साठा जप्त करुन, वाहन मालक गुलाम यझदानी गुलाम जिलानी रा. बाजार चौक, हिमायतनगर व या गुटख्याचे विक्रीसाठीचे संबंधित जबाबदार व्यक्ती सईद सौदागर व अस्लम मांजरेकर दोघेही रा. भोकर जि . नांदेड या चौघाविरुध्द ( वाहन चालक, वाहन मालक, जबाबदार व्यक्ती) भोकर पोलीस स्टेशन येथे श्री. सु.द. जिंतुरकर, अन्न सुरक्षा अधिकारी, नांदेड यांनी फिर्याद दाखल केलेली आहे. सदर फिर्यादीमध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायदा व भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हा मा. न्यायालयात सिध्द झाल्यास संबंधित आरोपीस दहा वर्षापर्यंत कारावास व रुपये पाच लाखापर्यंत दंड होऊ शकतो .

           तरी गुटखा, पानमसाला , तत्सम पदार्थ अन्न पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तीस आवाहन करण्यात येते की, या प्रतिबंधित अन्न पदार्थाचे सेवन करु नये, तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा , विक्री वाहतूकीस कोणत्याही व्यक्तीने करु नये, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास विषयांकित कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

          सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतुरकर , अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे, संतोष कनकावाड व भोकर पोलीसांच्या सहकार्याने सहाय्यक आयुक्त (अन्न) टी.सी. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे.

*****

संविधान दिनानिमित्त संविधान दिन रॅलीचे आयोजन

              नांदेड दि. 22:-  दिनांक 26 नोव्हेंबर,2018 हा दिवस संविधान दिन म्हणून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा करावायाचा आहे . त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण , नांदेड यांच्याकडून 26 नोव्हेंबर, 2018 रोजी संविधान दिनानिमित्त संविधान दिन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

           संविधान दिन रॅलीचे दिनांक 26 नोव्हेंबर, 2018 रोजी सकाळी 8-00 वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन प्रारंभ होईल. या रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते शिवाजी नगर , कलामंदिर , मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन होवून रॅलीचा समारोप होईल. या रॅलीत सर्व विद्यालयीन / महाविद्यालयीन विद्यार्थी , अधिकारी, कर्मचारी, एनसीसी, स्कॉऊट विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, समता दुत इत्यादींचा सहभाग राहणार आहे.

        संविधान रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे , असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.

0000

आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

नांदेड दि. 22:-  जागतिक मधुमेह दिन व सप्ताहाच्या अनुषंगाने दि. 14 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2018 या कालावधीत श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय , नांदेडद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर व एनसीडी नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन, बस स्थानक, अशा विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून तीस वर्ष वयोगाटावरील एकूण 440 इतक्या रुग्णांची बी पी व शुगरसाठी तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक त्या रुग्णांस आरोग्यविषयक समुपदेशनपर सल्ला देण्यात आला. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, डॉ. कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे व समुपदेशक सुवर्णकार सदाशिव यांनी परिश्रम घेतले.  

0000

 

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या रॅलीस  

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दाखविली हिरवी झेंडी   

नांदेड दि. 22:-  गोवर - रुबेला लसीकरण मोहिम दि. 27 नोव्हेंबर, 2018 पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्याची संपूर्ण तयारी झाली असून जनजागृती रॅलीचे आयोजन आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महिला बाल कल्याण, शिक्षण तसेच गुरुगोविंदसिंघजी सिव्हील मेमोरियल हॉस्पीटल, मनपा, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापौर श्रीमती शिलाताई भवरे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव , मनपा आयुक्त लहुराज माळी व आरोग्य सभापती माधवरावजी मिसाळे यांच्या शुभहस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करुन रॅलीस हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ करण्यात आली.


ही रॅली महात्मा फुले पुतळा-आय.टी.आय येथून सुरुवात होऊन शिवाजी नगर - पोलीस अधीक्षक कार्यालय-शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गस्थ झाली  आणि जिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड येथे या रॅलीची सांगता झाली.  

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, जिल्हा शल्य चिकित्सक बी.पी.कदम, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन, डॉ. बदीयोद्दीन , डॉ. वाघमारे, डॉ.दुर्गादास रोडे , डॉ. बालाजी मुरकूटे, एनसीसी समादेशक आदिंची यावेळी उपस्थिती होती.


या रॅलीचा उद्देश शंभर टक्के गोवर - रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा मानस आहे. यांनी याकामी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे.  

या रॅलीस इंडियन मेडिकल असोशिएशनचे डॉ. कदम, आयपीएचए डॉ. श्रीरामे, निमाचे सचिव कैलास भाडेकर व शहरी, ग्रामीण आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थींनी, खाजगी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थींनी, एनसीसीचे विद्यार्थी, रोटरी क्लबचे अध्यक्ष, लायन्स क्लबचे अध्यक्ष, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फुर्त सहभाग घेवून रॅली यशस्वी केली.


0000

जेष्ठ नागरिकांसाठी

मोफत सर्वांगीण भव्य आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर

नांदेड दि. 22:-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली मानवसेवा हिच सर्वश्रेष्ठ सेवा समजून तालुका विधी सेवा समिती भोकर व अभियोक्ता संघ भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिकांसाठी मोफत सर्वांगीण भव्य आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर शनिवार, दि. 24 नोव्हेंबर, 2018 रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय , भोकर येथे सकाळी 10-00 वाजता आयोजित केले आहे. या शिबीरास भोकर व नांदेड येथील अनेक मान्यवर डॉक्टर ज्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक मुंढे, आयुर्वेदीक कॉलेज नांदेड येथील डॉक्टर पथक डॉ. इनामदार , अध्यक्ष तालुका डॉक्टर संघ , भोकर , डॉ. मोईजोदीन , तालुका आरोग्य अधिकारी, भोकर प्रा. डॉ. व्यंकट माने, डॉ. ऋषिकेश मोकाशी , डॉ. पांचाळ , डॉ. विलास सर्जे, डॉ मारावार, डॉ. वागतकर, डॉ. मुजाहेद पठाण, डॉ. अब्दुल रहेमान , डॉ. मोनिका आचमवाड,  डॉ. कोळेकर , डॉ. राम नाईक , डॉ. हुलसुरे डॉ.रेखा पाटील, डॉ. यु. एल. जाधव , डॉ. वाघमारे, डॉ. पवार , डॉ. माने , ग्रामीण रुग्णालय , भोकर व तालुका आरोग्य अधिकारी , भोकर यांचे पथक हे आपली सेवा देणार आहेत.

या शिबीरामध्ये औषधी गोळ्या सुध्दा मोफत दिल्या जाणार आहेत. तसेच डोळ्याचे चष्मेसुध्दा अंत्यत गरीब परिस्थितीमधील रुग्णांना मोफत देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गरजु रुग्णांचा ई.सी. जी. सुध्दा मोफत काढला जाणार आहे. तसेच गरज पडल्यास धर्मादाय आयुक्त, मुंबई व महात्मा फुले आरोग्य योजनेतंर्गत गंभीर आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांचे उपचाराची सोय नांदेड, पुणे व मुंबई येथील खाजगी दवाखान्यामध्ये करण्यात येईल.

0000
 किनवट व गोकुंदा मध्ये 17 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
16 हजार 350 रुपयाचा दंड आकारला  
नांदेड दि. 22:- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने किनवट व गोकुंदा येथेेआजजअचानक धाडी टाकून कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार या पथकामार्फतत17 तंबाखू विक्रेत्यांकडून 16 हजार 350 रुपये दंडडआकारण्यात आला आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम व नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकररयांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना तिवारी, कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे,ेसामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, गणेश गाडेकर,रश्रीकांत बोटलावररतथा सटवाजी वाघमारेेतसेच उप-जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील डॉ. विकास केंद्रे, कृष्णा निरडे, शिवकन्या आदमवाड तसेचचस्थानिक पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. प्रकाश पवार, जि. आर. केंद्रे व एस.के.खाजा आदी होते.
जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष,षजिल्हा रुग्णालय,यनांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...