Thursday, November 22, 2018


जेष्ठ नागरिकांसाठी

मोफत सर्वांगीण भव्य आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर

नांदेड दि. 22:-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली मानवसेवा हिच सर्वश्रेष्ठ सेवा समजून तालुका विधी सेवा समिती भोकर व अभियोक्ता संघ भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिकांसाठी मोफत सर्वांगीण भव्य आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर शनिवार, दि. 24 नोव्हेंबर, 2018 रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय , भोकर येथे सकाळी 10-00 वाजता आयोजित केले आहे. या शिबीरास भोकर व नांदेड येथील अनेक मान्यवर डॉक्टर ज्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक मुंढे, आयुर्वेदीक कॉलेज नांदेड येथील डॉक्टर पथक डॉ. इनामदार , अध्यक्ष तालुका डॉक्टर संघ , भोकर , डॉ. मोईजोदीन , तालुका आरोग्य अधिकारी, भोकर प्रा. डॉ. व्यंकट माने, डॉ. ऋषिकेश मोकाशी , डॉ. पांचाळ , डॉ. विलास सर्जे, डॉ मारावार, डॉ. वागतकर, डॉ. मुजाहेद पठाण, डॉ. अब्दुल रहेमान , डॉ. मोनिका आचमवाड,  डॉ. कोळेकर , डॉ. राम नाईक , डॉ. हुलसुरे डॉ.रेखा पाटील, डॉ. यु. एल. जाधव , डॉ. वाघमारे, डॉ. पवार , डॉ. माने , ग्रामीण रुग्णालय , भोकर व तालुका आरोग्य अधिकारी , भोकर यांचे पथक हे आपली सेवा देणार आहेत.

या शिबीरामध्ये औषधी गोळ्या सुध्दा मोफत दिल्या जाणार आहेत. तसेच डोळ्याचे चष्मेसुध्दा अंत्यत गरीब परिस्थितीमधील रुग्णांना मोफत देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गरजु रुग्णांचा ई.सी. जी. सुध्दा मोफत काढला जाणार आहे. तसेच गरज पडल्यास धर्मादाय आयुक्त, मुंबई व महात्मा फुले आरोग्य योजनेतंर्गत गंभीर आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांचे उपचाराची सोय नांदेड, पुणे व मुंबई येथील खाजगी दवाखान्यामध्ये करण्यात येईल.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...