Thursday, November 22, 2018


गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या रॅलीस  

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दाखविली हिरवी झेंडी   

नांदेड दि. 22:-  गोवर - रुबेला लसीकरण मोहिम दि. 27 नोव्हेंबर, 2018 पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्याची संपूर्ण तयारी झाली असून जनजागृती रॅलीचे आयोजन आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महिला बाल कल्याण, शिक्षण तसेच गुरुगोविंदसिंघजी सिव्हील मेमोरियल हॉस्पीटल, मनपा, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापौर श्रीमती शिलाताई भवरे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव , मनपा आयुक्त लहुराज माळी व आरोग्य सभापती माधवरावजी मिसाळे यांच्या शुभहस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करुन रॅलीस हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ करण्यात आली.


ही रॅली महात्मा फुले पुतळा-आय.टी.आय येथून सुरुवात होऊन शिवाजी नगर - पोलीस अधीक्षक कार्यालय-शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गस्थ झाली  आणि जिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड येथे या रॅलीची सांगता झाली.  

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, जिल्हा शल्य चिकित्सक बी.पी.कदम, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन, डॉ. बदीयोद्दीन , डॉ. वाघमारे, डॉ.दुर्गादास रोडे , डॉ. बालाजी मुरकूटे, एनसीसी समादेशक आदिंची यावेळी उपस्थिती होती.


या रॅलीचा उद्देश शंभर टक्के गोवर - रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा मानस आहे. यांनी याकामी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे.  

या रॅलीस इंडियन मेडिकल असोशिएशनचे डॉ. कदम, आयपीएचए डॉ. श्रीरामे, निमाचे सचिव कैलास भाडेकर व शहरी, ग्रामीण आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थींनी, खाजगी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थींनी, एनसीसीचे विद्यार्थी, रोटरी क्लबचे अध्यक्ष, लायन्स क्लबचे अध्यक्ष, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फुर्त सहभाग घेवून रॅली यशस्वी केली.


0000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...