Thursday, November 22, 2018


आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

नांदेड दि. 22:-  जागतिक मधुमेह दिन व सप्ताहाच्या अनुषंगाने दि. 14 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2018 या कालावधीत श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय , नांदेडद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर व एनसीडी नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन, बस स्थानक, अशा विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून तीस वर्ष वयोगाटावरील एकूण 440 इतक्या रुग्णांची बी पी व शुगरसाठी तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक त्या रुग्णांस आरोग्यविषयक समुपदेशनपर सल्ला देण्यात आला. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, डॉ. कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रदीप बोरसे व समुपदेशक सुवर्णकार सदाशिव यांनी परिश्रम घेतले.  

0000

 

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...