Friday, March 6, 2020

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडण
 नामनिर्देशन पत्रासोबत
जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक
नांदेड दि. 6 :- राज्‍य निवडणुक आयोगाकडील निर्देशानुसार महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्‍या कलम 10- 1अ मधील तरतुदीनुसार राखीव जागेसाठी निवडणक लढविण्‍यास इच्‍छुक असलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीला नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.  याबाबत सर्व संबधित निवडणुक निर्णय अधिकारी व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
00000

दारु दुकाने मंगळवारी बंद
नांदेड, दि. 6 :- जिल्ह्यात येत्या 10 मार्च रोजी धुलिवंदन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मंगळवार 10 मार्च रोजी दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केले आहेत.  
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी मंगळवार 10 मार्च 2020 रोजी धुलिवंदन निमित्त जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, (परवाना कक्ष) एफएल/बीआर-2 व ताडी दुकाने टी डी-1 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000

यशवंतराव चव्हाण जन्मदिनानिमित्त
गुरुवार 12 मार्च रोजी समता दिन
नांदेड दि. 6 :- भारताचे उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवगंत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म दिनानिमित्त 12 मार्च हा दिवस "समता दिन" म्हणून साजरा करण्यात येतो.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुवार 12 मार्च 2020 रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन परित्रकात दिलेल्या सुचनेनुसार कार्यवाही करुन त्याबाबत अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.  
00000

कामगार योजना, शुल्काबाबत
खाजगी एजंटापासून सावध रहावे
-         सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद
नांदेड दि. 6 :-  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील कामगारांच्या विविध योजना, त्यांना लागणाऱ्या निश्चित शुल्काबाबत खाजगी एजंटापासून कामगारांनी सावध रहावे, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांनी केले आहे.
राज्य शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तीचे नियमन करणे व त्यांना सुरक्षा, आरोग्य व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ या मंडळाची स्थापना केली आहे. सद्यस्थितीत या मंडळाचे कामकाज सहायक कामगार आयुक्त यांच्यामार्फत चालविण्यात येत आहे.  
शासन अधिसुचनेद्वारे बांधकामाच्या व्याखेत समावेश करण्यात आलेल्या 21 बांधकाम व्यवसायाशी निगडीत व्यवसायात काम करणाऱ्या कामगाराचे वय 18 वर्षापासून ते 60 वर्षाच्या आतील कामगारांची नोंदणी करण्यात येते. नोंदणी व नुतनीकरण करण्यासाठी दर वर्षाला मागील 12 महिन्यात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र शासनाने वेळोवेळी प्राधिकृत केलेल्या यंत्रणेकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना मंडळाच्या विविध कल्यणकारी योजनांचे लाभ वाटप केले जाते.
जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना नोंदणी करताना मंडळाने नोंदणीसाठी निश्चित केलेले शुल्क 37 रुपये व त्यापुढील वर्षाच्या नुतनीकरणासाठी वार्षिक 12 रुपये इतके शुल्क भरणा करावा. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क कामागारास लागत नाही तसेच खाजगी एजंटपासून सावध रहावे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत सेफ्टी / इसेशियल कीट नि:शुल्क देण्यात येत आहे, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांनी केले आहे.  

उच्च दृष्टीकोन ठेवून जग जिंकण्याचे स्वप्न अभियंत्याने पाहावे
- सहाय्यक राज्यकर आयुक्त एकनाथ पावडे
नांदेड दि. 6 :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड याठिकाणी युवोत्सव- 2020 हा वार्षीक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.  या कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक राज्य कर आयुक्त एकनाथ पावडे तसेच डॉ. आनंद पवार उपसचिव तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे तर युवोत्सव- 2020 चे प्रभारी अधिकारी प्रा. आर. एम. सकळकळे हे होते.  
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री पावडे यांनी अभियंत्याचे महत्व विषद केले. ज्या ठिकाणी आव्हान आहे त्या ठिकाणी अभियंता गरजेचा आहे. सगळ्यांचे प्रयत्न थांबतात तेव्हा अभियंत्याचे सुरु होतात.  प्रत्येक क्षेत्रात अभियंता आज आपला ठसा उमटवत आहे. स्वतःला सिद्ध करून उच्च दृष्टीकोन ठेवून जग जिंकण्याचे स्वप्न अभियंत्याने पाहावे. यश तुमच्या पाठीशी असेल. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिस्थीतीचा बाऊ न करता प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ.आनंद पवार यांनी नवीन अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध  झालेली  आहे. अधिक कार्यक्षम अभियंता समाजाला उपलब्ध होत आहेत,  असे  सांगितले.  कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी विविध स्पर्धातून व वार्षिक कार्यक्रमातून बक्षीस विजेत्या विद्यार्थी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.  सन 2018-2019  2019 -2020 या वर्षातील विविध क्रीडा स्पर्धा  भित्तिचित्रे प्रदर्शनी, पेपर वाचन, विविध शाखेत प्रथम आलेल्या  विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.
       युवोत्सव 2020 अंतर्गत रांगोळी स्पर्धा विविध गुणदर्शन स्पर्धा  शेला पागोटे  सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन असे विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  उपप्राचार्य  पी. डी. पोपळे, जीमखाना उपाध्यक्ष प्रा. डी. एम. लोकमनवार, प्रा.एस.पी.  कुलकर्णी  प्रा.व्ही. व्ही. सर्वज्ञ , प्रा. बी. व्ही. यादव , डॉ एस. एस. चौधरी, प्रा एस. एम.  कंधारे, प्रा. . बी. दमकोंडवार, प्रा. एस. जी. दुटाळ, प्रदीप शेवलीकर विद्यार्थी सचिव सूरज सोनकांबळे व क्षितीज कदम विद्यार्थीनी प्रतिनीधी प्रिती गावंडे व इतर विद्यार्थी प्रतिनीधी यांनी प्रयत्न केले.
         कार्यक्रमाचे प्रास्तावीक व प्रमुख पाहूण्यांची ओळख स्नेह संमेलन प्रभारी प्रा. आर.एम.सकळकळे यांनी केले तर आभार प्रा .एस. . कुलकर्णी यांनी मानले.  
000000

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान  अंतर्गत
कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
           
नांदेड दि. 6 :- जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी नांदेड आयोजित राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान सन 2019-20 अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका अभियान या विषयांवरील कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेकरिता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
       या प्रशिक्षण वर्गामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड रविशंकर चलवदे  यांनी मागील खरीप हंगामामध्ये राबवलेल्या उपक्रमामुळे व शेतकऱ्यामध्ये जमीन आरोग्य पत्रिकेबाबत केलेल्या जाणीवजागृतीमुळे रासायनिक खतांचा वापर कमी होत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कृषी सहायक यांनी गावनिहाय जमीन आरोग्य पत्रिकेचे सुपीकता नकाशे बनवून गावामध्ये शेतकऱ्यांना समजावून सांगावेत असे प्रतिपादन केले.
            वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञा श्रीमती गजभिये बी.आर.यांनी जमिनीमध्ये शाश्वतता टिकविणे काळाची गरज असून त्यासाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.तसेच सेंद्रीय शेती चा वापर वाढवावा असे सुचविले.
कंधार तालुका कृषी अधिकारी देशमुख आर. एम.यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार हळद लागवड कशी करावी व उत्पादकतेत कशी वाढ करावी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांना आलेले अनुभव कथन केले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी श्रीमती गुंजकर यांनी जिल्ह्यामध्ये राबवित असलेल्या अभियानाबाबत माहिती दिली. अभियान यशस्वीपणे राबविण्याबाबत कर्मचारी यांना आवाहन केले.
    या  प्रशिक्षण कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी किनवट कदम बी.पी., देगलूर सोनटक्के एम.जी., कृषी उपसंचालक घुगे वाय. व्ही., तालुका कृषी अधिकारी किनवट -गायकवाड, देगलूर-शिंदे एस.आर., नांदेड-शिंगाडे, यांचेसह जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक यांची उपस्थिती लाभली.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक जारीकोटे वसंत यांनी केले तर चिंतावार दत्तात्रय यांचे आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सहायक अमित राठोड, पालेपवाड , चव्हाण, घुमनवाड,पाटील, सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.
000000

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...