Friday, March 6, 2020


कामगार योजना, शुल्काबाबत
खाजगी एजंटापासून सावध रहावे
-         सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद
नांदेड दि. 6 :-  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील कामगारांच्या विविध योजना, त्यांना लागणाऱ्या निश्चित शुल्काबाबत खाजगी एजंटापासून कामगारांनी सावध रहावे, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांनी केले आहे.
राज्य शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तीचे नियमन करणे व त्यांना सुरक्षा, आरोग्य व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ या मंडळाची स्थापना केली आहे. सद्यस्थितीत या मंडळाचे कामकाज सहायक कामगार आयुक्त यांच्यामार्फत चालविण्यात येत आहे.  
शासन अधिसुचनेद्वारे बांधकामाच्या व्याखेत समावेश करण्यात आलेल्या 21 बांधकाम व्यवसायाशी निगडीत व्यवसायात काम करणाऱ्या कामगाराचे वय 18 वर्षापासून ते 60 वर्षाच्या आतील कामगारांची नोंदणी करण्यात येते. नोंदणी व नुतनीकरण करण्यासाठी दर वर्षाला मागील 12 महिन्यात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र शासनाने वेळोवेळी प्राधिकृत केलेल्या यंत्रणेकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना मंडळाच्या विविध कल्यणकारी योजनांचे लाभ वाटप केले जाते.
जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना नोंदणी करताना मंडळाने नोंदणीसाठी निश्चित केलेले शुल्क 37 रुपये व त्यापुढील वर्षाच्या नुतनीकरणासाठी वार्षिक 12 रुपये इतके शुल्क भरणा करावा. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क कामागारास लागत नाही तसेच खाजगी एजंटपासून सावध रहावे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत सेफ्टी / इसेशियल कीट नि:शुल्क देण्यात येत आहे, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांनी केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...