Friday, March 6, 2020


उच्च दृष्टीकोन ठेवून जग जिंकण्याचे स्वप्न अभियंत्याने पाहावे
- सहाय्यक राज्यकर आयुक्त एकनाथ पावडे
नांदेड दि. 6 :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड याठिकाणी युवोत्सव- 2020 हा वार्षीक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.  या कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक राज्य कर आयुक्त एकनाथ पावडे तसेच डॉ. आनंद पवार उपसचिव तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे तर युवोत्सव- 2020 चे प्रभारी अधिकारी प्रा. आर. एम. सकळकळे हे होते.  
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री पावडे यांनी अभियंत्याचे महत्व विषद केले. ज्या ठिकाणी आव्हान आहे त्या ठिकाणी अभियंता गरजेचा आहे. सगळ्यांचे प्रयत्न थांबतात तेव्हा अभियंत्याचे सुरु होतात.  प्रत्येक क्षेत्रात अभियंता आज आपला ठसा उमटवत आहे. स्वतःला सिद्ध करून उच्च दृष्टीकोन ठेवून जग जिंकण्याचे स्वप्न अभियंत्याने पाहावे. यश तुमच्या पाठीशी असेल. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिस्थीतीचा बाऊ न करता प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ.आनंद पवार यांनी नवीन अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध  झालेली  आहे. अधिक कार्यक्षम अभियंता समाजाला उपलब्ध होत आहेत,  असे  सांगितले.  कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी विविध स्पर्धातून व वार्षिक कार्यक्रमातून बक्षीस विजेत्या विद्यार्थी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.  सन 2018-2019  2019 -2020 या वर्षातील विविध क्रीडा स्पर्धा  भित्तिचित्रे प्रदर्शनी, पेपर वाचन, विविध शाखेत प्रथम आलेल्या  विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.
       युवोत्सव 2020 अंतर्गत रांगोळी स्पर्धा विविध गुणदर्शन स्पर्धा  शेला पागोटे  सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन असे विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  उपप्राचार्य  पी. डी. पोपळे, जीमखाना उपाध्यक्ष प्रा. डी. एम. लोकमनवार, प्रा.एस.पी.  कुलकर्णी  प्रा.व्ही. व्ही. सर्वज्ञ , प्रा. बी. व्ही. यादव , डॉ एस. एस. चौधरी, प्रा एस. एम.  कंधारे, प्रा. . बी. दमकोंडवार, प्रा. एस. जी. दुटाळ, प्रदीप शेवलीकर विद्यार्थी सचिव सूरज सोनकांबळे व क्षितीज कदम विद्यार्थीनी प्रतिनीधी प्रिती गावंडे व इतर विद्यार्थी प्रतिनीधी यांनी प्रयत्न केले.
         कार्यक्रमाचे प्रास्तावीक व प्रमुख पाहूण्यांची ओळख स्नेह संमेलन प्रभारी प्रा. आर.एम.सकळकळे यांनी केले तर आभार प्रा .एस. . कुलकर्णी यांनी मानले.  
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...