Monday, May 29, 2017

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 29  :- जिल्ह्यात शनिवार 10 जून 2017  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील निवडणुका, राष्ट्रीय सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 28 मे ते शनिवार 10 जून 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

000000
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम
पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
                नांदेड,  दि. 29 :- महात्मा  गांधी  तंटामुक्त  गाव  मोहिमेअतंर्गत  मोहिमेला  वस्तुनिष्ठ  प्रसिध्दी  देऊन ही  योजना  जनसामान्यांपर्यंत  प्रभावीपणे  पोहोचविणाऱ्या  पत्रकारांसाठी  शासनाने  जिल्हाविभाग  व  राज्य  स्तरावर  पुरस्कार  देण्याची  योजना  जाहीर केली आहे. नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी या पुरस्कारासाठी  आपल्या  प्रवेशिका  गुरुवार 15 जून 2017 पर्यंत पाठवाव्यात , असे आवाहन महात्मा गांधी तंटामुक्त  गाव  मोहीम  पत्रकार  पुरस्कार  जिल्हास्तरीय  समितीच्यावतीने  करण्यात  आले  आहे. 
            जिल्हास्तरीय  प्रथम  पुरस्कार  रुपये  25 हजार, द्वितीय पुरस्कार रुपये 15 हजार आणि तृतीय पुरस्कार रुपये 10 हजार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिध्दीसाठी 2 मे 2016 ते 1 मे 2017 या कालावधीमध्ये प्रसिध्द केलेले लिखाण पुरस्कार पात्रतेकरिता मल्यमापनासाठी ग्राह्य धरण्यात येईल. नमूद कालावधीत वृत्तपत्रे / नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटोफिचर्स अशा साहित्याचा विचार करण्यात येईल. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तभंलेखक, मुक्तपत्रकार  पात्र  असतील.  पारितोषिकांसाठी  मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा विचार करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या  अ, , क  वर्गवारीतील  वृत्तपत्रे / नियतकालिके  यामधून  प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच  या  पारितोषिकांसाठी  विचार  करण्यात  येईल.
         एका वर्तमानपत्राच्या  प्रत्येक आवृत्तीतील एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल.  जिल्ह्यातून  प्रथम  क्रमांक  मिळविलेल्या  पत्रकारांचे  विभागीय  स्तरावरील  पुरस्कारासाठी  आपोआप नामनिर्देशन होईल तर विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी आपोआप नामनिर्देशन  होईल. 
नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पत्रकार पुरस्कार जिल्हास्तरीय समिती, विसावानगर, नांदेड-431602 (दूरध्वनी क्र. 02462-250137)  यांचेकडे  गुरुवार 15 जून  2017  पर्यंत  पाठवाव्यात.
0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...