Friday, August 25, 2023

 महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना

कागदपत्रांसाठी अडवणूक करु नये 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित / विनाअनुदानीत / कायम विनाअनुदानीत महाविद्यालयीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती न मिळाल्याच्या कारणावरुन सर्व महाविद्यालयांनी त्यांचे मुळ कागदपत्रांची अडवणूक करण्यात येत असल्याबाबत निदर्शनास येत आहे. तरी महाविद्यालयांनी अडवणूक न करता विद्यार्थ्यांना त्यांचे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. 

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती योजना अंतर्गत महाविद्यालय सन 2021-22 व 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर झालेले आहेत. परंतु शासनाकडून शिष्यवृत्ती प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मुळ शैक्षणिक कागदपत्रे महाविद्यालयाकडून अडवणूक करण्यात येत  असल्याचे निदर्शनास आले आहे. शासन निर्णय 1 नोव्हेंबर 2003 व आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांचे पत्रानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे अडवणूक करण्यात येऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना आहेत. जे महाविद्यालय मागासवर्गीय विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी अडवणूक करीत असेल त्या महाविद्यालयावर शासन निर्णयाप्रमाणे योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000        

 मौजे पिंपळगाव निमजी येथील आरक्षित जागेवर कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 25 :-  जिल्ह्यातील नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे पिंपळगाव निमजी येथील दलित समाजासाठी आरक्षित मोकळया जागेवर शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 च्या मध्यरात्री पर्यंत घोषित केले आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन मौ. पिंपळगाव निमजी ता. जि. नांदेड येथील वादग्रस्त मोकळी जागा 25 ते 31 ऑगस्ट 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी घोषित केले आहे.  

 

पोलीस अधीक्षक नांदेड यांना मौ. पिंपळगाव निमजी ता.जि.नांदेड येथील वादग्रस्त जागेवरुन गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधितांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणिबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये हा एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...