दिव्यांगांनी
मतदानासाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी श्री.अरुण डोंगरे
दिनांक
03 डिसेंबर 2018 रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग
कर्मचारी संघटना व जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभाग यांचे संयुक्त
विद्ममाने, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे कार्यशाळा व मेळावा
आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक
मा.श्री.डी.पी.सावंत विधानसभा सदस्य उत्तर विभाग नांदेड व जिल्हा परिषद अध्यक्षा
मा.श्रीमती. शांताबाई पवार जवळगावकर या होत्या. व प्रमुख उपस्थिती मा.श्री. हेमंत
पाटील वि.स.स. नांदेड दक्षिण यांची होती. तसेच प्रशासनाच्या वतीने मा.श्री.अरुण
डोंगरे जिल्हाधिकारी नांदेड, मा.श्री. खुशालसिंह परदेशी अपर जिल्हाधिकारी नांदेड,
श्रीमती दिपाली मोतीयेळे, उपजिल्हा
निवडणूक अधिकारी, नांदेड श्री. प्रदीप
कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी नांदेड, श्री. किरण अंबेकर, तहसिलदार नांदेड, डॉ.वाय.ए.चव्हाण,
प्र.अधिष्ठाता, डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
नांदेड, श्री. राजेंद्र तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड,
श्री. सत्येंद्र आऊलवार, समाजकल्याण अधिकारी नांदेड तसेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांचे जिल्हा संघटना व
जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास मा.श्री.डी.पी.सावंत
आमदार उत्तर विभाग नांदेड व जिल्हा परिषद अध्यक्षा मा. श्रीमती. शांताबाई पवार
जवळगावकर व मा. श्री. हेमंत पाटील विधानसभा सदस्य दक्षिण विभाग नांदेड यांनी मार्गदर्शन केले.
या
कार्यक्रमाच्या प्रारंभी अंध विद्यालय वसरणी ता. जि. नांदेड येथील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. संघटनेचे
जिल्हा सचिव श्री.वसंत पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच या
कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणा-या दिव्यांग कर्मचारी व कर्मचा-यांचे गुणवंत
पाल्य यांचा मान्यवर अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्यांगांना
साहित्य वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा संघटनेचे
अध्यक्ष श्री. सुधाकर शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला.
जागतिक
अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मा. श्री. अरुण डोंगरे जिल्हाधिकारी नांदेड
यांनी सुलभ निवडणुकांच्या अनुषंगाने उपस्थितांना सविस्तर माहिती दिली व दिव्यांगांनी
आपले नाव मतदार यादीत ध्वजांकित करण्यासाठी सहकार्य करावे आणि मतदानासाठी देखील
पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. मा. श्रीमती दिपाली मोतीयेळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी भारत निवडणूक आयोगाकडील
शासन निर्णयानूसार दिव्यांगांना देण्यात येणा-या विविध सोयी-सुविधांबाबत सविस्तर
माहिती दिली. ईव्हीएम मशीनवर आता ब्रेल लिपीही उपलब्ध राहणार आहे. तसेच दिव्यांग
मतदारांची विशेष नोंदीची स्वतंत्र यादी व मतदानासाठीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध
करुन देण्याबाबतची सविस्तर माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिव्यांगांची
विशेष नोंद घेण्यासाठी कार्यक्रमस्थळी उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड व तहसिल कार्यालय नांदेड यांच्यातर्फे स्टॉल लावण्यात
आला होता.
या
कार्यक्रमात श्री. किशन केने जिल्हा संघटनेचे तालुका अध्यक्ष यांनी आपले मनोगत
व्यक्त केले. तसेच श्रीमती.लोणीकर यांनी गीत सादर केले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष श्री.गणेश रायेवार व श्री. दुधगोंडे
यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री. शेख यांनी केले.
सदर
कार्यक्रमासाठी श्री. मरळे नायब तहसिलदार श्री. नादंगावकर नायब तहसिलदार , श्रीमती
स्वामी नायब तहसिलदार, श्रीमती जगताप नायब तहसिलदार श्री. कुणाल जगताप अव्वल
कारकून, तहसिल कार्यालय नांदेड, दिव्यांग संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री
कोयलवाड रामगौंड, एम.बी.शेख, चांदू दूधगोंडे, बापूराव मोरे, पदमिनी कासेवाड, पंचफुला
जाधव, देविदास बस्वदे, बाबूराव वाभने, गणेश रायेवार, गणेश पाटील, अशोक सोळंके, सिध्देश्वर
मठपती, साहेबराव सुरेवाड आदींनी परिश्रम घेतले.
0000