Tuesday, December 4, 2018


कापूस, तूर पिकाचा कृषि संदेश 
            नांदेड, दि. 4 :- नांदेड जिल्हयात  कापुस, तुर पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे किडी पासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
कापूस पिकावर कामगंध सापळयातील लुर बदलावे आणि सायपरमेथ्रीन 3 टक्के प्लस इंडोक्झाकार्ब 10 टक्के एस. सी 5 मिली प्रति 10 पाण्यात फवारावे.
 तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत. तसेच इमामेक्टीन बेंझोएट 5 एस.जी 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. गुंडाळलेली पाने अळीसहीत नष्ट करावीत, असे आवाहन उप विभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमीच्या कामांना गती प्रत्येक ग्रामपंचायतीत दर १५ दिवसांनी रोजगार मा...