Wednesday, July 25, 2018


स्वभावासाठी औषध
                         आरोग्यम धनसंपदाकिंवाहेल्थ इज वेल्थया सुविचारांची आपल्याला लहाणपणापासुन ओळख असते.पण खरोखरचं आपण ते सुविचार समजून घेऊन आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आत्मसात करतो का,याचा विचार करण्याची गरज आहे. कारण आधुनिक काळात अनेक प्रकारच्या वाढलेल्या स्पर्धा विविध विवंचनांमुळे आपले मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे .तसेच धावपळ , ताण  , सतत कामाचा दाब यामुळे शरीर मनावर विपरीत परिणाम होतात . सतत चिंता लागणे , खिन्नता वाटणे , विनाकारण चिडचिड होणे , राग येणे किंवा संताप होणे , मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी कितीही प्रयत्न केला तरी मनातुन जाणे , काळजी  इत्यादी मानसिक लक्षणे आपल्या आसपासच्या लोकांमध्ये बरेचदा बघायला मिळतात . हि लक्षणे काही गंभीर मानसिक आजार दर्शवितात किंवा  अशा मानसिक आजारांची सुरूवात असू शकतात . कधीकधी  अशी लक्षणे त्यांच्या आयुष्याचा भागच बनुन जातात  - त्यांच्याही नकळत आणि मग अशा वेळी त्यावर उपाय करणे तर सोडाच त्याची जाणिवही त्या व्यक्तीला होत  नाही . एखाद्या गोष्टी बद्दल अतिशय चीड /राग  / संताप येणे , सतत चिंता करणे , भुतकाळात अति रममाण होणे , अकारण भिती वाटणे , आत्मविश्वास कमी असाणे , व्यसनी बनणे , विनाकारण संशय घेणे , कुठलेही नविन काम सुरू करण्यापूर्वी साशंक होऊन ते पुढे ढकलणे , एकलकोंडेपणा तसेच कधीकधी दुसऱ्या वर प्रमाणाबाहेर अवलंबून राहणे , इतरांपासून लपवाछपवी करण्याची प्रव्रुत्ती इत्यादी लक्षणे मानसिक आरोग्य बिघडल्याची निर्देर्शक आहेत .
            वरिल काही लक्षणे सामान्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग झाला असल्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या परिवारातील लोकांच्या लक्षातही येत नाही .जेव्हा  कधी घरातील सदस्य / मित्र परिवार त्यांच्या अशा वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त करतात, तेव्हा त्या व्यक्ती म्हणतात कि मलाही कळतं, सगळं पण वळतं नाही  किंवा काय करू स्वभावाला औषध नाही . पण आता जर खरोखरच एखाद्याची ईच्छा असेल तर त्याला त्याच्या स्वभावावरुन औषध देता येईल त्याच्या स्वभावातील नकारात्मक गोष्टी काढून योग्य तो सकारात्मक बदल त्याच्या स्वभावात करणे शक्य आहे . कसे ???  बाख फ्लॉवर रेमिडीज म्हणजे पुष्पौषधीं द्वारे , डॉ एडवर्ड बाख , लंडन येथील सुक्षम जिवशास्त्रञ यांनी 1930  साली बाख फ्लावर रेमिडीज म्हणून एक औषध पद्धती सुरू केली.
            डॉ बाख हे उच्चविद्याविभुषित होते . MBBS केल्यानंतर त्यांनी त्या काळातील  MRCS , LRCP तसेच DPH ( केंब्रिज) या पदव्या  मिळवल्या . परंतु ते संशोधक वृत्तीचे असल्याने त्यांनी त्यांची ॲलोपॅथिक वैद्यकाची प्रॅक्टिस सोडून दिली 1930 साली वनस्पतींच्या फुलांपासुन औषधे वापरण्याची पद्धत सुरू केली. यालाच बाख फ्लॉवर रेमिडीज किंवा पुष्पौषधी म्हणतात.                  
            डॉ बाख यांच्या औषधींची संख्या 38 असुन यामध्ये रानफुले , झुडपे , वृक्षांची फुले यांचा समावेश होतो.  यापैकी कोणतेही औषध अपायकारक नसून त्यांची सवयही लागत नाही . मानसिक शारीरिक अशा दोन्हीही रोगप्रकारांवर त्यांचा चांगला उपयोग होतो ,असा डॉ बाख यांचा प्रयोगसिद्ध अनुभवसिद्ध दावा आहे. डॉ बाख यांनी त्यांच्या "बारा गुणकारी औषधे इतर औषधे " या पुस्तकात 38 पुष्पौषधींच्या गुणधर्मांची माहिती देऊन मनाच्या सात अवस्थांचे वर्णन केले आहे .मनाच्या या सात अवस्था  खालील प्रमाणे आहेत.
1.भिती,
 2.अनिश्चितता,
3.सद्यस्थितीत रस वाटणे, 
 4.एकटेपणा/एकाकीपणा                                    
  5.कल्पना जास्त करणे आजुबाजुच्या परिस्थितीस जास्त संवेदनशील असणे             
  6.नैराश्य अथवा विषण्ण मनस्थिती  
 7.दुसऱ्याचे भले होण्याविषयी  जादा  काळजी करण्याचा स्वभाव                          
              डॉ  बाख यांनी भितीच्या प्रकारांवर 5 औषधे वर्णन केली आहेत - धास्ती वाटणे , अकल्पित भीती द्यात भीती , मानसिक भीतीने तोल सुटणे , घराबाहेरील लोकांची भिती वाटणे हे भीतीचे 5 प्रकार असून यासाठी 5 पुष्पौषधी देऊन भीती घालवता येते . इतर औषधी सोबतच (ॲलोपॅथिक / होमियोपॅथिक/आयुर्वेदीक/ युनानी ) ही औषधे घेतले तरी चालेल. आत्मविश्वास कमी असल्याने कुणी निर्णय घेउ शकत नाही  किंवा मनाच्या चलबिचल अवस्थेला कंटाळून जर निर्णय घेणे जमत नसेल तर अशा लोकांना बाख फ्लॉवर रेमिडीजने फायदा होतो .                                      
            स्वतः साठी बाख यांची औषधे घेण्याने तर विशेष फायदा होतो , कारण आपल्या मानसिक शारीरिक अवस्थांची आपल्याला जास्त जाणीव असते. अतिशय थकवा आल्यास कसे वाटते ? मनासारखे झाल्यास कशी  चिडचिड  होते किंवा तसे व्हायला उशिर झाल्यावर आपण कसे अधीर होतो  ? तातडीच्या गंभीर प्रसंगी मनःस्थिती कशी असते ? हवेत बिघाड  झाल्यास मन कसे उदास वाटते ,वगैरेची जाणीव आपल्याला लगेच होते. आपल्या मनाच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये योग्य त्या बाख फ्लॉवर रेमिडीजचा वापर करुन बिघडलेल्या मानसिक स्थितीला लवकरच पुर्ववत करण्यासाठी ही औषधे खुप उपयोगी पडतात. स्वतःच्या मनःस्थितीचे निरीक्षण करुन तज्ञांच्या सल्ल्याने औषध सुरु करुन काही आठवडे / गरजेनुसार  औषध घेतल्यास नक्कीच फायदा होतो .                                             
            रोग होऊ नये म्हणून बाख फ्लॉवर रेमिडीजचा प्रतिबंधक औषध म्हणूनही उपयोग होतो . प्रतिबंधक औषधांचा वापर करताना व्यक्तीच्या मनाची अवस्था हाच केंद्रबिंदू लक्षात घेऊन औषधांची निवड करावी असे डॉ बाख यांनी सांगितले .व्यक्तीचा भावनात्मक समतोल बिघडला की शारीरिक लक्षणे त्यानंतर निर्माण होतात . तेव्हा नेहमीच मानसिक अवस्थांचा समतोल राखल्यास नंतरचा शारीरिक आजार होणारच नाही , असे डॉ बाख यांचे मत आहे .दुर्दैवाने मनाच्या अवस्थांकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही  असे दुर्लक्ष केल्याने शारीरिक त्रास सुरू होतात आणि त्यावर औषधे घेतली जातात . आपल्यातील दोष आपल्याला माहिती असतात , त्यांचे आपण जतन करतो परंतु प्रक्रुती  निरोगी ठेवणारी डॉ बाख यांची औषधे  त्यांच्यावर दिली पाहिजे हे अनेकांना माहित नसते. भीती , राग , मत्सर , ईर्ष्या  वगैरे मनोवृत्ती लहान वयापासूनच असतात  तेव्हा प्रथम पासूनच ही औषधे दिल्यास व्यक्ती  निरोगी सशक्त होईल . मला काही होत नाही  असे म्हणणारे अनेकजण असतात . ते मानसिक दडपणाखाली असल्याचे आढळते  त्यांच्या मनोवेदना शारीरिक वेदनांपेक्षाही अधिक तीव्रतेच्या असतात , कारण वैचारिक वेदना या शारीरिक वेदनेपेक्षा नेहमीच जास्त त्रासदायक / वेदनादायक असतात . कामाचे  दडपण   घेऊन जर कोणी काम करत असेल किंवा आपल्याला आवडणारे काम करावे लागले तर त्यामुळे थकवा येणे , निरुत्साही होणे किंवा चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून येतात .तेव्हा कुठल्याही प्रकारचा ताण घेता / लाज बाळगता योग्य त्या बाख फ्लॉवर रेमिडीजचे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सेवन करावे आपल्या जीवनातील समस्या / प्रश्न यांना  आत्मविश्वासाने सामोरे जावे .....पटतंय ना ? प्रथम  आपल्याला काही तरी समस्या आहे हे आपल्याला पटलं तर त्यानंतरच ती समस्या सोडवण्याच्या दिशेने योग्य त्या उपायापर्यंत आपण पोहचु शकतो.योग्य त्या उपायांमुळे अमूल्य असलेले आपले जीवन अधिक आनंदी ,समाधानीपणे जगतं आपल्यासह इतरांना ही आनंदी ठेवू शकतो.त्यामुळे चला स्वतःला वेळ देऊ या, आरोग्यसंपन्न जीवनशैली आत्मसात करु या आवश्यक तेथे बाख फ्लॉवर रेमिडीज तुमच्या सहाय्यासाठी आहेच.
-         डॉ.हेमा थोरात,(होमिओ तज्ञ)
      औरंगाबाद.

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...