Wednesday, June 7, 2023

 पर्यावरण दिनानिमीत्त जिल्हा व सत्र न्यायालय

नूतन इमारतीच्या प्रांगणात वृक्षारोपण संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 7 : प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश व्ही. न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वनपरिक्षेत्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारत कौठा नांदेडच्या प्रांगणात जून 2023 रोजी वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.


यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज यांची प्रमुख उपस्थीती होती. यावेळी त्यांनी उपस्थितांना पर्यावरणासंबंधी मार्गदर्शन केले. जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावावे व त्याचे संगोपण करावे जेणेकरुन पर्यावरणाचा समतोल राखता येईल असेही त्यांनी सांगितले.


याप्रसंगी मुख्य विधी सहाय्य संरक्षण सल्लागार लोकाभिरक्षक अॅड. स्वप्निल कुलकर्णी उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण सल्लागार लोकाभिरक्षक अॅड. नय्यूम खान पठाणविधी सहाय्य संरक्षण सल्लागार लोकाभिरक्षक अॅड. सुरेश कुरोलू रिटेनर लॉयर अॅड. मंगेश वाघमारेअॅड.सचिन मगरअॅड. मनिषा गायकवाड व वनपरीक्षेत्र अधिकारी संदीप शिंदेउप वनसंरक्षक केशव वाबळेसहाय्यक वनसंरक्षक भिमसींग ठाकुर व न्यायालयीन कर्मचारी के.जे. भोळेसुनील चव्हाण आदीची उपस्थिती होती. वृक्षारोपणानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

0000




 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांनी

 ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन 

 नांदेड (जिमाका) दि. 7 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत चौदाव्या हप्त्याच्या वितरण नियोजनासाठी राज्यात गाव पातळीवर व सर्वत्र मोहीम राबवून ई-केवायसी  व बँक खाते आधार संलग्न  करण्याचे निर्देश आहेत. ई-केवायसी प्रमाणीकरण अभावी कोणताही  पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी सर्व प्रलंबित शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषि  सहाय्यकांचे मदतीने प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण  व आधार संलग्न काम करून घ्यावेअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.  

केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नरमध्ये ओटीपी आधारे तसेच सामायिक सुविधा केंद्राद्वारे लाभार्थ्याची ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम किसान ॲप अँड्रॉइड मोबाईलवर फेस ऑथेंटीकेशनद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाही केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच इतर 50 लाभार्थ्यांचे सुद्धा ई-केवायसी प्रमाणीकरण करता येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रीय अधिकारी, कृषी सहाय्यक, कर्मचाऱ्यामार्फत गाव पातळीवरील सर्व  प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण  व आधार संलग्न  करुन घ्यावे. कमी वेळ शिल्लक असल्याने शनिवार रविवार यादिवशी काम सुरू ठेवण्यात येणार आहे. ॲपच्या माध्यमातून तात्काळ प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावेअसे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.  

00000     

 शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये

-         जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- कपाशीला जो बाजार भाव मिळतो तो वाण पाहून मिळत नसून धाग्याची लांबी पाहून मिळतो. त्यामूळे शेतकऱ्यांनी एका विशिष्ट वाणांचा आग्रह न धरता इतर उत्पादन वाढीचे सूत्र लक्षात घ्यावे. जसे की एकात्मिक कीड व्यवस्थापन, खत व्यवस्थापनकामगंध सापळे, सापळा पिके वापरणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट वाणाचा आग्रह धरु नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

नांदेड जिल्ह्यामध्ये मागील वर्षी 882000 कापुस सर्व वाणांचे बियाणे पाकिटांचा पुरवठा झाला होता. यावर्षी कापुस सर्व वाणांचे बियाणे पाकिटांचा मिळवून तेवढाच पुरवठा होणार आहे. कंपन्यांनी व विक्रेत्यांनी बियाणे विक्रीबाबत सविस्तर नियोजन करावे. तसेच याबाबतची माहिती लिखित स्वरूपात कृषी विभाग व कृषि विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक आहे. काही ठराविक वाणांची मागणी शेतकऱ्यांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या शेतकऱ्यांना कापुस उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. जसे उत्पादन वाढीच्या ज्या काही बाबी आहेत, त्यामध्ये एकात्मिक कीड व खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. याबाबत शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही होणार नाही यांची काळजी घ्यावी, असेही कृषी विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

 

शेतकऱ्यांनी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या 35 ते 40 व्या दिवशी एकरी चार कामगंध सापळे वापरुन कमी खर्चात बोंड अळीचे नियंत्रण करणे शक्य आहे. एकाच वाणाला महत्व दिल्याचे निदर्शनास आले तर संपूर्ण साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद कापूस बियाणे उत्पादक कंपन्यानी घ्यावी शेतकऱ्यांना वाणाच्या निवडीसाठी जमिनीचा प्रकारबागायत व कोरडवाहू क्षेत्र इत्यादी बाबत योग्य मार्गदर्शन व्हावे असेही जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

00000

 उद्योग मंत्री उदय सामंत यांचा नांदेड दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे दि. 8 जून 2023 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

गुरुवार 8 जून 2023 रोजी सकाळी मुंबई येथून विमानाने सकाळी 10 वा. श्री गुरु गोबिंदसिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन व पाहणी. सकाळी 10.30 वा. श्री. गुरु गोबिंदसिंगजी विमानतळ नांदेड आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड. सकाळी 11.30 वा. म.औ.वि.म.नांदेड जिल्हा औद्योगिक क्षेत्र तसेच जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी व ग्रामोद्योग विभाग आढावा बैठकीस उपस्थित. स्थळ – उद्योग भवन, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड. दुपारी 12.30 वा. नांदेड जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधी समवेत बैठकीस उपस्थिती. स्थळ- उद्योग भवन, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड, दुपारी 1.30 वा. पत्रकार परिषद, स्थळ- उद्योग भवन, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड. दुपारी 2 ते 2.30 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा, स्थळ – शासकीय विश्रामगृह, नांदेड. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. श्री गुरु गोबिंद सिंगजी विमानतळ, नांदेड येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...