Wednesday, June 7, 2023

 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांनी

 ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन 

 नांदेड (जिमाका) दि. 7 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत चौदाव्या हप्त्याच्या वितरण नियोजनासाठी राज्यात गाव पातळीवर व सर्वत्र मोहीम राबवून ई-केवायसी  व बँक खाते आधार संलग्न  करण्याचे निर्देश आहेत. ई-केवायसी प्रमाणीकरण अभावी कोणताही  पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी सर्व प्रलंबित शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषि  सहाय्यकांचे मदतीने प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण  व आधार संलग्न काम करून घ्यावेअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.  

केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नरमध्ये ओटीपी आधारे तसेच सामायिक सुविधा केंद्राद्वारे लाभार्थ्याची ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम किसान ॲप अँड्रॉइड मोबाईलवर फेस ऑथेंटीकेशनद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाही केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच इतर 50 लाभार्थ्यांचे सुद्धा ई-केवायसी प्रमाणीकरण करता येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रीय अधिकारी, कृषी सहाय्यक, कर्मचाऱ्यामार्फत गाव पातळीवरील सर्व  प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण  व आधार संलग्न  करुन घ्यावे. कमी वेळ शिल्लक असल्याने शनिवार रविवार यादिवशी काम सुरू ठेवण्यात येणार आहे. ॲपच्या माध्यमातून तात्काळ प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावेअसे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.  

00000     

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...