Saturday, October 17, 2020

 

196 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

90 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 17 :- शनिवार 17 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 196 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 90 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 38 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 52 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 54 अहवालापैकी 924 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 17 हजार 987 एवढी झाली असून यातील  15  हजार 797 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 597 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 50 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात चार जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवार 15 ऑक्टोंबर रोजी हिमायतनगर तालुक्यातील कांडली येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा तर शनिवार 17 ऑक्टोंबर रोजी उज्वलनगर नांदेड येथील 61 वर्षाच्या एका पुरुषाचा, बेलानगर नांदेड येथील 66 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर अर्धापूर येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 480 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 4, बिलोली कोविड केंअर सेंटर 3, हदगाव कोविड केंअर सेंटर 4, किनवट कोविड केंअर सेंटर 4, लोहा कोविड केंअर सेंटर 4, मुखेड कोविड केंअर सेंटर 5,  मुदखेड कोविड केंअर सेंटर 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 11, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 1, कंधार कोविड केंअर सेंटर 4, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 120, माहूर कोविड केंअर सेंटर 5, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 2, खाजगी रुग्णालय 24 असे एकूण 196 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 90.81 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 26, अर्धापुर तालुक्यात 1,  बिलोली 1, किनवट 2, कंधार 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 2, देगलूर 1, लोहा 1, मुखेड 1, हिंगोली 1 असे एकुण 38 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 30, अर्धापूर तालुक्यात 1, हदगाव 1, माहूर 1, नायगाव 1, उमरी 5, नांदेड ग्रामीण 4, मुदखेड 1, किनवट 4, कंधार 2, धर्माबाद 2 असे एकूण 52 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 597 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 163, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित  903, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 41, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 42, हदगाव कोविड केअर सेंटर 9, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 27, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 29, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 21,  मांडवी कोविड केअर सेंटर 7, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 9, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, बारड कोविड केअर सेंटर 2, मुदखेड कोविड केअर सेटर 9, माहूर कोविड केअर सेंटर 20, किनवट कोविड केअर सेंटर येथे 33, धर्माबाद कोविड केअर सेंटर 16, उमरी कोविड केअर सेंटर 33, कंधार कोविड केअर सेंटर येथे 9, अर्धापूर कोविड केअर सेंटर 20, भोकर कोविड केअर सेंटर 15, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 174, लातूर येथे संदर्भित 1 झाले आहेत. 

शनिवार 17 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 60, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 82 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 98 हजार 497,

निगेटिव्ह स्वॅब- 77 हजार 324,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 17 हजार 987,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 15 हजार 797,

एकूण मृत्यू संख्या- 480,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 90.81

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-23,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 358, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 597,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 50, 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

 

 

संभाव्य पावसापासून पिकांचे संरक्षण करण्याचे

कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन


नांदेड (जिमाका) दि. 17 :-परतीच्या पावसाची शक्यता लक्षात घेता दि. 17 ते 21 ऑक्टोंबर या कालावधीत जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

सद्यस्थितीत सोयाबीन, ज्वारी पिकांची काढणी व कापूस पिकाची वेचणी चालू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची वेळेत काढणी करून सुरक्षित स्थळी साठवणूक करून ठेवावी . ज्वारी व सोयबीन या पिकाचा ढीग करून ठेवला असल्यास व्यवस्थित झाकून ठेवावे. शक्य असल्यास लवकरात लवकर मळणी करून घ्यावी. शेतकरी बंधूनी शक्य असेल सर्वतोपरी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आर बी चलवदे यांनी केले आहे.

00000

 

राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या

महिलांची नामांकने सादर करण्याचे आवाहन   

नांदेड (जिमाका) दि. 17 :- देशाच्या उभारणीत अमुल्य योग देणाऱ्या महिलांच्या कार्याविषयी माहिती ग्राफीक बुकस लघुकथा आणि पोस्टर्स यांच्या माध्यमातून तयार करण्यात येणार  आहे. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन ॲकडमी व राष्ट्रीय बुक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेतला जात आहे. या दृष्टिने जिल्ह्यातील कर्तृत्ववान असणाऱ्या व ज्यांनी देशाच्या उभारणीत अमुल्य योगदान राहिले आहे अशा महिलांना आपली माहिती पुढील पत्त्यावर पाठवावी. यात नाव, वय, शिक्षण, पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांक यासह इंग्रजीमध्ये माहिती येत्या मंगळवार 20 ऑक्टोंबर 2020 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय शास्त्रीनगर नांदेड (दूरध्वनी क्र. 02462-261242) येथे दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...