Friday, September 1, 2023

 जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह

पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता

 

·   नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 2, 3 व 4 सप्टेंबर 2023 हे तीन दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 2, 3 व 4 सप्टेंबर 2023 या तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.  

 

या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका: आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. याबाबत सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असेही, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

00000

 विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी 

विजयकुमार जोशी यांची बिनविरोध निवड 

          लातूर, दि.01 (विमाका) :  लातूर विभागीय अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज लातुरच्या शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार विजयकुमार जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लातूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

          या बैठकीस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लातूर विभागाच्या उपसंचालक डॉ.सुरेखा मुळे, विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य सर्वश्री अमोल अंबेकर, अझरोद्दीन रमजान शेख, नरसिंह घोणे, प्रल्हाद उमाटे, यांच्यासह नांदेड जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, उस्मानाबाद जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी अरूण सूर्यवंशी, लातूर विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. श्याम टरके, माहिती अधिकारी तानाजी घोलप, उपसंपादक रेखा गायकवाड आदी उपस्थित होते.

          उपसंचालक डॉ. मुळे यांनी नवनियुक्त अध्यक्ष श्री. जोशी व समिती सदस्यांचे शाल, पुष्पगुच्छ, ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. अधिस्वीकृती समितीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. जोशी यांनी शासकीय अधिकारी व समिती सदस्यांच्या समन्वयातून अधिकाधिक पत्रकारांना न्याय देऊ. विभागीय अधिस्वीकृती समितीवर माझी पहिल्यांदाच निवड झाली. सर्व समिती सदस्यांच्या परस्पर सहकार्यातून सकारात्मकदृष्टीने काम करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. पात्र असलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी समिती सदैव तत्पर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. समितीचे सदस्य श्री. उमाटे, श्री. शेख यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

                                                          ***




जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- नांदेड जिल्ह्यात 10 सप्टेंबर 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 10 सप्टेंबर 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आयोजित शिबिरात आतापर्यत 413 बस चालकांच्या आरोग्याची तपासणी

 प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आयोजित

शिबिरात आतापर्यत 413 बस चालकांच्या आरोग्याची तपासणी

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्हयातील बस चालकांसाठी जुलै 2023 पासून मोफत नेत्र  आरोग्य तपासणी शिबीर सुरु करण्यात आले आहे. या शिबिरात आतापर्यंत 413 बस चालकांची नेत्र  आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बस चालकांनी अशा प्रकारच्या शिबीरात सहभाग घेवून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

तपासणी शिबिराच्या अनुषंगाने 31 ऑगस्ट रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालकांची नेत्र  आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर लायसन्स क्लब मिड टाऊन नांदेड तथा सिडकोच्या वतीने संपन्न झाले. या शिबीरात एका दिवसात सुमारे 200 वाहन चालकांची नेत्र  आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रस्ते सुरक्षेबाबत समुपदेशन करण्यात आले. संबंधित वाहनचालकांना प्रमाणपत्र देण्यात  आले.  या तपासणीमध्ये दृष्टीदोष आढळलेल्या वाहन चालकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. या शिबीरास लायन्स क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष लॉ.अमरसिंह चौहानकोषाध्यक्ष लॉ.शिवाजी इबितवारलॉ.शिरिष गितेलॉ.ज्ञानेश्वर महाजन तथा लॉ.डॉ.सुरेंद्र कदमप्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामतउप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊतसहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसेवाहतुक नियंत्रक यासीन अहमद खानराज्य परिवहन महामंडळाचे वैभव डूब्बेवारसहा.मोवानिस्वप्नील राजूकरसहा.मोवानि  इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हयातील रस्ते अपघाताचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहनचालक कारणीभूत असतात. वाहनचालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दृष्टीदोष असेल तर वाहन चालविताना त्याला अडचण येत असतात. परिणामी अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अशा विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे असे परिवहन कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन

                                                     सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार

 रोखण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 31 :- राज्यात कापूस पिका खालोखाल सोयाबीन पीक घेतले जाते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक (केवढा) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. रोगाच्या जास्त प्रादुर्भावामुळे काही भागात संपूर्ण पिक उपटून टाकण्याची वेळ आली होतीसध्या सोयाबीन पिकाची लागवड होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. काही ठिकाणी यंदाही या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव ओळखून शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात, जेणेकरून उत्पादनात होणारी घट टाळली जाईल, असे आवाहन कृषि विभागाच्यावीने करण्यात आले आहे.  

 

पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे-


झाडाची वाढ खुंटतेपाने आखूडलहानजाडसरसुरकुतलेली होतात व पानाच्या कडा खालच्या बाजून दुमडतात. सुरूवातीला पानवर पिवळ्या रंगाचे छोटे चट्टे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या चट्यांचा आकरमान वाढत जातो अणि संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरीतद्रव्याच्या ऱ्हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस करपट रंगाचे ठिपके दिसतात. झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. फुलोरा उशिरा येतो व शेंगा कमी लागतात तसेच दाने लहान भरतात किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत व पोचट उपजतात. प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते.


प्रसार-


रोगाचा प्राथमिक प्रसारक बियाणेमार्फत, दुय्यम प्रसार रसशोषक किडीमार्फत होतो. त्यात प्रामुख्याने पांढरी माशी व मावा किडीचा समावेश आहे.


एकात्मिक व्यवस्थापन-


रोगास बळी न पडणाऱ्या वाणांची लागवड करावी. नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटुन त्यांना जाळुन किंवा जमिनीत पुरुन नष्ट करावीतजेणेकरून निरोगी झाडावर होणारा रोगाचा प्रसार कमी करता येईल. आंतरपीक व मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास रोगाचे प्रमाण कमी करणे शक्य होते.

बिगर हंगामी सोयाबीन लागवड टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात अडथळे येऊन पुढील हंगामात होणारा प्रादुर्भाव कमी होईल. लागवडीनंतर सुरुवातीचे 45 दिवस पीक तण विहिरीत ठेवावे.

जैविक नियंत्रण - पिक पेरणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पिवळे चिकट सापळे प्रति एकरी 10 याप्रमाणे लावावेत. तज्ञांच्या सल्याने किटकनाशकाची फवारणी करावी असे कृषिविभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

 वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा 

नांदेड, (जिमाका) दि. 31 :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्त्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे शनिवार सप्टेंबर 2023 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

 

शनिवार 2 सप्टेंबर 2023 रोजी नागपूर येथून विमानाने सकाळी 9 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.15 वा. मोटारीने नांदेडहून औंढा नागनाथ, जि. हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 1 वा. मोटारीने औंढा नागनाथ हुन नांदेड कडे प्रयाण. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. नांदेड जिल्हा भाजपा पदाधिकारी बैठकीस उपस्थिती. स्थळ-नांदेड. सायं. 4.30 वा. पत्रकार परिषद. स्थळ-नांदेड. सायं.5.15 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं.5.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...