Friday, September 1, 2023

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आयोजित शिबिरात आतापर्यत 413 बस चालकांच्या आरोग्याची तपासणी

 प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आयोजित

शिबिरात आतापर्यत 413 बस चालकांच्या आरोग्याची तपासणी

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्हयातील बस चालकांसाठी जुलै 2023 पासून मोफत नेत्र  आरोग्य तपासणी शिबीर सुरु करण्यात आले आहे. या शिबिरात आतापर्यंत 413 बस चालकांची नेत्र  आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बस चालकांनी अशा प्रकारच्या शिबीरात सहभाग घेवून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

तपासणी शिबिराच्या अनुषंगाने 31 ऑगस्ट रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालकांची नेत्र  आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर लायसन्स क्लब मिड टाऊन नांदेड तथा सिडकोच्या वतीने संपन्न झाले. या शिबीरात एका दिवसात सुमारे 200 वाहन चालकांची नेत्र  आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रस्ते सुरक्षेबाबत समुपदेशन करण्यात आले. संबंधित वाहनचालकांना प्रमाणपत्र देण्यात  आले.  या तपासणीमध्ये दृष्टीदोष आढळलेल्या वाहन चालकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. या शिबीरास लायन्स क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष लॉ.अमरसिंह चौहानकोषाध्यक्ष लॉ.शिवाजी इबितवारलॉ.शिरिष गितेलॉ.ज्ञानेश्वर महाजन तथा लॉ.डॉ.सुरेंद्र कदमप्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामतउप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊतसहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसेवाहतुक नियंत्रक यासीन अहमद खानराज्य परिवहन महामंडळाचे वैभव डूब्बेवारसहा.मोवानिस्वप्नील राजूकरसहा.मोवानि  इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हयातील रस्ते अपघाताचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहनचालक कारणीभूत असतात. वाहनचालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दृष्टीदोष असेल तर वाहन चालविताना त्याला अडचण येत असतात. परिणामी अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अशा विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे असे परिवहन कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...