सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार
रोखण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन
नांदेड, (जिमाका) दि. 31 :- रा
पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे-
झाडाची वाढ खुंटते, पाने आखूड, लहान, जाडसर, सुरकुतलेली होतात व पानाच्या कडा खालच्या बाजून दुमडतात. सुरूवातीला पानवर पिवळ्या रंगाचे छोटे चट्टे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या चट्यांचा आकरमान वाढत जातो अणि संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरीतद्रव्याच्या ऱ्हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस करपट रंगाचे ठिपके दिसतात. झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. फुलोरा उशिरा येतो व शेंगा कमी लागतात तसेच दाने लहान भरतात किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत व पोचट उपजतात. प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते.
प्रसार-
रोगाचा प्राथमिक प्रसारक बियाणेमार्फत, दुय्यम प्रसार रसशोषक किडीमार्फत होतो. त्यात प्रामुख्याने पांढरी माशी व मावा किडीचा समावेश आहे.
एकात्मिक व्यवस्थापन-
रोगास बळी न पडणाऱ्या वाणांची लागवड करावी. नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटुन त्यांना जाळुन किंवा जमिनीत पुरुन नष्ट करावीतजेणेकरून निरोगी झाडावर होणारा रोगाचा प्रसार कमी करता येईल. आंतरपीक व मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास रोगाचे प्रमाण कमी करणे शक्य होते.
बिगर हंगामी सोयाबीन लागवड टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात अडथळे येऊन पुढील हंगामात होणारा प्रादुर्भाव कमी होईल. लागवडीनंतर सुरुवातीचे 45 दिवस पीक तण विहिरीत ठेवावे.
जैविक नियंत्रण - पिक पेरणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पिवळे चिकट सापळे प्रति एकरी 10 याप्रमाणे लावावेत. तज्ञांच्या सल्याने किटकनाशकाची फवारणी करावी असे कृषिविभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment