विधानसभा निवडणूक २०२४
Tuesday, November 5, 2024
वृत्त क्र. 1037
नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह
मानवनिर्मित वस्तू उडविण्यास मनाई
नांदेड दि. 5 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यात व शहरात तसेच श्री गुरुगोविंदसिंहजी विमानतळ परिसर, गुरुद्वारा परिसर व मोदी ग्राऊंड मामा चौक या परिसरात ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यावर 7 ते 9 नोव्हेंबर 2024 या कालावधीत प्रतिबंध मनाई करण्यात आले आहे. याबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी हे आदेश निर्गमीत केले आहेत.
हा आदेश 7 नोव्हेंबर रोजीचे 00.00 ते 9 नोव्हेंबर
2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंतच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात व शहरात तसेच
श्री गुरुगोविंदसिंहजी विमानतळ परिसर, गुरुद्वारा परिसर, मोदी ग्राउंड मामा चौक या परिसरात
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे
कलम 163 (1) नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत
उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्याकरीता या आदेशाद्वारे प्रतिबंध
करण्यात आले आहे. संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा
अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे
कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश 5 नोव्हेंबर रोजी निर्गमीत करण्यात
आले आहेत.
00000
वृत्त क्र. 1036
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 5 लाख रुपयांचे मद्य जप्त
वृत्त क्र. 1035
आचारसंहितेच्या प्रभावी
अंमलबजावणीसाठी विविध पर्यायांचा उपयोग करावा
-निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ
नांदेड, दि. 5 नोव्हेंबर: निवडणूक आयोगाच्यावतीने मतदान प्रक्रिया अधिक सक्षम,प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी विविध चार पर्याय निवडणूक आयोगाने दिले असून, त्याचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ यांनी केले आहे.
त्या चार पर्यायांची माहिती पुढील प्रमाणे आहे.
आचारसंहिता नियंत्रण कक्ष
हा कक्ष तहसील कार्यालय, नांदेड येथे पहिल्या मजल्यावर स्थित असून पंचायत समितीच्या सभागृहात चोवीस तास या कक्षाचे कार्य अविरतपणे चालू आहे.
आचारसंहितेचे काही उल्लंघन
आढळल्यास अथवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी या कक्षात प्रत्यक्ष येवून आपली तक्रार
नोंदवू शकतात. प्रत्यक्ष येणे अशक्य असल्यास modelcodeofconductofficer@gmail.com या
मेल आयडीवर सुध्दा आँनलाईन आपली तक्रार नोंदवू शकतात.
सिव्हिजील सिटिझन अँप
सदरील अँप प्ले-स्टोरवरुन डाऊनलोड करुन यावर आपली आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार नोंदवू शकतात. अत्यंत जलदगतीने व तत्काळ तक्रारीचे निराकरण केले जाते.
एस.एस.टी.स्थिर पथक
सदरील पथक नांदेड दक्षिण
मतदारसंघात तीन ठिकाणी चोवीस तास नेमून दिलेल्या स्थळी चौकसपणे कार्यरत आहे. डेरला
पाटी, नांदेड लोहा रोड,बोंढार तर्फे हवेली-नांदेड-मुदखेड
रोड,काकांडी-नांदेड-नायगाव रोड अशा तीन स्थानी हे पथक कार्यरत आहे. दक्षिण
नांदेड मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची हे पथक अत्यंत बारकाईने तपासणी
करतात. प्रमाणापेक्षा जास्त रोकड,मौल्यवान वस्तू आणि
आचारसंहिता कायद्याने प्रतिबंधित बाबींची काटेकोरपणे तपासणी केल्या जात आहे.
आक्षेपार्ह बाबी जप्त केल्या जातात.
एफ.एस.टी.फिरते पथक
सदरील पथक चोवीस तास नांदेड
दक्षिण मतदार क्षेत्रात फिरत असून यावेळी आचारसंहिता भंग होत असलेल्या बाबींवर
कटाक्षाने लक्ष ठेवते. अशा बाबी आढळल्यास त्यावर तात्काळ आचारसंहिता कायद्यानुसार
कार्यवाही केली जाते. निवडणूका निरपेक्षपणे व आचारसंहितेचा भंग न होवू देता पार
पाडण्याची मोलाची जबाबदारी या चार मार्गाने केली जात आहे. सर्वांनी या चार
मार्गांचा योग्य उपयोग करुन आचारसंहिता भंग न होवू देण्यासाठी सहकार्य करण्याचे
आवाहननिवडणूक अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ यांनी केले.
०००००
वृत्त क्र. 1034
स्वीप अंतर्गत भोकर येथे तृतीयपंथी मतदारासाठी विशेष कार्यक्रम
नांदेड दि. 5 नोव्हेंबर:- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम घेतले जात आहेत. भोकरमध्ये स्वीप अंतर्गत तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या उपक्रमात मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली आणि मतदानासाठी स्वाक्षरी मोहीम तसेच सेल्फी काढून या उपक्रमात सहभाग नोंदवला.
भोकरमध्ये मतदार जागृतीच्या दृष्टीने आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात तृतीयपंथी मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. त्यांनी स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घेतला आणि मतदान करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाद्वारे तृतीयपंथी मतदारांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांनी मतदानाच्या प्रक्रियेतील पारदर्शकता व जबाबदारी या विषयी माहिती दिली. यावेळी सुमन गोणारकर यांनी मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती दिली आणि त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाने तृतीयपंथी मतदारामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला. या कार्यक्रमामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जकियोद्यीन शेख, मिलिंद जाधव, सुधांशु कांबळे आदींची उपस्थिती होती.
०००००
वृत्त क्र. 1033
लोकसभा पोट निवडणूक अनुषंगाने
7 नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी
नांदेड दि. 5 नोव्हेंबर : लोकसभा पोट निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 16- नांदेड मतदारसंघातील उमेदवारांची खर्च निरीक्षकासमोर प्रथम तपासणी गुरुवार 7 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे आयोजित केली आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: ती स्वत: किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
तपासणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 1032
नांदेड दक्षिण मतदार संघासाठी टोल फ्री क्रमांक
नांदेड दि. 5 नोव्हेंबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 87 नांदेड दक्षिण मतदार संघासाठी नागरिकांना आचारसंहिता भंग न होण्याच्या संदर्भात किंवा इतर तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०१२९ दिला आहे.
तरी नागरिकांनी आचारसंहिता भंग न होण्याच्या संदर्भात काही तक्रार असल्यास 24 तास या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 1031
देगलूर मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची 7, 11, 15 नोव्हेंबरला प्रथम, द्वितीय, तृतीय तपासणी
नांदेड दि. 5 नोव्हेंबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 90-देगलूर मतदार संघातील उमेदवारांची खर्च निरीक्षक यांच्या समोर निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी गुरुवार 7 नोव्हेंबरला, द्वितीय तपासणी सोमवार 11 नोव्हेंबरला तर तृतीय तपासणी शुक्रवार 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत पंचायत समिती सभागृह, देगलूर येथे होणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार ही तपासणी होईल. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे.
अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल, याची नोंद घ्यावी.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वतः /ती स्वतः किंवा त्याच्या / तिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्यांला / तिला नामनिर्देशित करण्यात आले आहे, त्या दिनांकापासून निवडणुकीचा निकाल लागण्याच्या दिनांकापर्यंत दोन्ही दिनांक धरून, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे, असे असे निवडणूक निर्णय अधिकारी 90-देगलूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
वृत्त क्र. 1030
शुक्रवारी मुखेड मतदारसंघ
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी
नांदेड दि. 5 नोव्हेंबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 91-मुखेड मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी शुक्रवारी 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत आयोजित केली आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे.
तहसील कार्यालय, मुखेड पहिला मजला येथे खर्च निरिक्षकांसमोर उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
या तपासणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी असे 91-मुखेड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
वृत्त 1029
गुरुवारी नायगाव मतदारसंघातील
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी
नांदेड दि. 5 नोव्हेंबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने 89-नायगांव मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी गुरुवार 7 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत आयोजित केली आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे.
तहसील कार्यालय, नायगाव येथे खर्च निरिक्षकांसमोर उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
या तपासणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी असे ८९-नायगांव विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
वृत्त 1028
उमेदवारांनी गुन्हेगारी
पार्श्वभूमीची माहिती मतदारांना देणे अनिवार्य
प्रसार माध्यमातून तीन वेळा जाहिरात करणे गरजेचे
नांदेड, दि. 5 नोव्हेंबर :-भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे सर्व उमेदवारांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास कोणते गुन्हे दाखल आहेत याबाबतची सविस्तर माहिती माध्यमामध्ये निवडणूक उमेदवारी जाहिर झाल्यापासून तर मतदान होईपर्यत जाहिर करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे अशा पार्श्वभूमीच्या उमेदवारांनी मतदारांना माहिती होईल अशा प्रकारे माध्यमामधून एकूण तीन वेळा जाहिराती देवून जनतेला माहिती द्यावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
यासंदर्भात आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकामध्ये यासंदर्भातील निर्देश विस्तृतपणे प्रसिध्द केले आहे. नांदेड जिल्ह्यातील उमेदवारी जाहिर केलेल्या सर्वानी याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी प्रचाराच्या काळात तीन वेळा वृत्तपत्रांतून आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भातील माहिती प्रकाशित करणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार उभे करणाऱ्या राजकीय पक्षाने सुध्दा गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती संकेतस्थळ, वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन तीन वेळा प्रसिद्ध करणे देखील आवश्यक आहे.
यासंदर्भात निवडणूक आयोगाने त्यांचे पत्र क्रमांक ३/४/२०१९/SDR/खंड. IV दिनांक 16 सप्टेंबर, 2020 अन्वये निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार आयोगाने निर्दिष्ट केलेल्या कालावधीमध्ये पुढीलप्रमाणे तीन कालावधी निश्चित केले आहेत. ज्यामुळे मतदारांना अशा उमेदवारांच्या पार्श्वभूमी बद्दल पुरेसा वेळ मिळेल.
A. नामांकन
मागे घेतल्यानंतर पहिल्या ४ दिवसात. 05 ते 08 नोव्हेंबर, 2024
B. त्यानंतर
पुढील 5 ते 8 दिवसांच्या दरम्यान. 09 ते 12 नोव्हेंबर, 2024
C. 9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच 18 नोव्हेंबर, 2024 पर्यंत
सर्वोच्च न्यायालयाच्या २०१५
च्या रिट याचिका (C)
क्रमांक ७८४ (लोकप्रहारी विरुध्द युनियन ऑफ इंडिया आणि इतर) आणि २०११
च्या रिट याचिका (सिव्हिल) क्र. ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फाऊंडेशन आणि इतर विरुध्द
युनियन ऑफ इंडिया व अन्य ) मधील निकालाच्या अनुषंगाने ही प्रसिध्दी आवश्यक आहे.
०००००
वृत्त क्र. 1027
माध्यमांनी सर्व उमेदवारांना
समतोल न्याय द्यावा
राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीनी व्यक्त केली अपेक्षा
निरीक्षकांच्या उपस्थितीत राजकीय प्रतिनिधीची बैठक संपन्न
नांदेड, दि. 5 नोव्हेंबर :- लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मुद्रीत व अन्य सर्व माध्यमामध्ये सर्व उमेदवारांना प्रसिध्दीचा समतोल न्याय मिळावा, अशी अपेक्षा काही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीनी आज झालेल्या बैठकीमध्ये व्यक्त केली. या संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी माध्यमांना सर्व उमेदवारांना समतोल न्याय देण्याचे आवाहन केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला सामान्य, खर्च आणि पोलीस निरीक्षकांची उपस्थिती होती. यात श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे), शेलेंद्रकुमार (भाप्रसे), श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे), रण विजय यादव (भाप्रसे), कालु राम रावत (भापोसे), मृणालकुमार दास (आयआरएस), मयंक पांडे (आयआरएस), ए. गोविंदराज (आयआरएस) त्यांच्यासोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार याशिवाय या निवडणुकीमध्ये जबाबदारी सोपविण्यात आलेले प्रत्येक विभागाचे नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी लोकसभा पोटनिवडणूकीत सहभागी असणाऱ्या विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थिती होते.
या प्रतिनिधीनी यावेळी वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांमध्ये काही पक्षाच्या उमेदवाराना अधिक महत्व दिले तर जात नाही ना ! कोणत्याही बातम्या पेडन्युज म्हणून येत नाही ना याबाबतची शंका उपस्थित केली. यासंदर्भात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कार्यरत असून या समितीमार्फत जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांची तपासणी केली जाते. तसेच सर्व वाहिन्या व समाज माध्यमांवर या समितीचे लक्ष असून कोणावरही अन्याय होणार नाही तसेच प्रत्येक गोष्टीचा हिशेब खर्च विभागाला दिला जाईल असे स्पष्ट केले. तसेच पेडन्युज संदर्भात अशा पध्दतीचे काही लक्षात आल्यास एमसीएमसी समितीला कळविण्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील प्रकाशित होणारे सर्व वृत्तपत्र या काळात एमसीएमसी कक्षाला उपलब्ध केले जातात. तसेच सर्व प्रिंटर, प्रकाशक, संपादक यांनी देखील आपले वृत्तपत्र सनियंत्रित होईल याची दक्षता घ्यावी. तसेच निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही. प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाने निवडणूक काळामध्ये करावयाच्या वृत्तांकनाचे चौकटीचे पालन करावे, असेही यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यामध्ये एकूण मतदार
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 लाख 8 हजार 546 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 9 लाख 78 हजार 234 पुरूष तर 9 लाख 30 हजार 158 महिला व 154 तृतीयपंथीय मतदार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. ज्या सहा विधानसभा क्षेत्रात ही निवडणूक होणार आहे त्याची मतदार संख्याही त्यांनी यावेळी सांगितली. लोकसभेमध्ये भोकर विधानसभा क्षेत्रात 3 लाख 3 हजार 103, नांदेड उत्तर 3 लाख 58 हजार 918, नांदेड दक्षिणमध्ये 3 लाख 16 हजार 821, नायगावमध्ये 3 लाख 10 हजार 375, देगलूरमध्ये 3 लाख 12 हजार 237, मुखेडमध्ये 3 लाख 7 हजार 92 एवढे मतदार आहेत. त्यामुळे एकूण 19 लाख 8 हजार 546 मतदार मतदान करणार आहेत.
तर विधानसभेसाठी आणखी तीन
तालुके यामध्ये वाढले असून किनवटमध्ये 2 लाख 78 हजार 65,
हदगावमध्ये 2 लाख 99
हजार 86, लोहामध्ये 3 लाख 1 हजार 650 मतदार मतदान करणार आहेत. एकूण 9 विधानसभा क्षेत्रामध्ये 27 लाख 87 हजार 947 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत याबाबत
त्यांनी माहिती दिली. याशिवाय मतदान यंत्र व उपलब्ध मनुष्यबळाची माहीती देण्यात
आली.
यावेळी वेगवेगळ्या ठिकाणावरुन
आलेल्या निवडणूक निरिक्षकांनी प्रतिनिधीशी संवाद साधला. उमेदवारांना कोणतीही अडचण
असेल, कोणताही दबाव येत असेल तर थेट संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रतिनिधीना यावेळी निवडणूक निरीक्षकांचे मोबाईल क्रमांक पुन्हा देण्यात आले.
यामध्ये सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (किनवट व हदगाव- ७४९९१२७२६५), नांदेड उत्तर मतदार संघासाठी
श्रीमती बी. बाला मायादेवी (संपर्क क्रमांक ८४८३९९०३८०), नांदेड
दक्षिण व लोहा मतदार क्षेत्रासाठी श्रीमती पल्लवी आकृती (संपर्क क्रमांक ८२३७९६०९५५),
नायगांव व देगलूर व मुखेड मतदार संघासाठी रण विजय यादव (संपर्क
क्रमांक ७३८५८४२०८४), भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी
कालुराम रावत (संपर्क क्रमांक ८१८०८३०६९९) किनवट, हदगाव,
भोकर, नांदेड उत्तर, नांदेड
दक्षिण मतदार संघासाठी खर्च निरीक्षक मयंक पांडे (संपर्क क्रमांक ८४८३८४५२२० ),
लोहा, नायगाव, देगलूर,
मुखेड साठीचे खर्च निरीक्षक ए.गोविंदराज (संपर्क क्रमांक
७२४९०४८०४०) लोकसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक मृणालकुमार दास यांचा संपर्क
क्रमांक ८६२६०९५९२२ असा आहे.
००००
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...