Tuesday, December 31, 2024

 वृत्त क्र. 1245

ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी केल्यास होणार कारवाई : आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार

#ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
#नांदेड दि. 31 डिसेंबर :- ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी चालू गाळप हंगामात येणार नाही याची कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पुणे येथील आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
या परिपत्रकानुसार नांदेड जिल्ह्यातील ऊस तोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांचेकडून ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास जिल्ह्यातील साखर कारखान्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्या आहेत. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी केल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक साखर विश्वास देशमुख यांनी केले आहे.
भाऊराव चव्हाण ससाका लि. लक्मींअनगर, देगाव-येळेगाव, ता. अर्धापूर साठी शेतकी अधिकारी आर.टी. हरकळ मो. 9881066017, सुभाष शुगर प्रा. लि. हडसनी, ता. हदगावसाठी मुख्य शेतकी अधिकारी के.बी.वानखेडे मो. 94223436621 , एम.व्ही.के.ॲग्रो फुडस प्राडक्टस लि. वाघलवाडा, ता. उमरी, तज्ञ संचालक प्रतिनिधी पी.डी.पुयड यांचा मो. क्र. 9922012751, शिवाजी सर्व्हीस स्टेशन मांजरी-बाऱ्हाळी , ता. मुखेडसाठी शेतकी अधिकारी एस.जी.माळेगावे यांचा मो. क्र. 9359164388, कुटूंरकर शुगर ॲन्ड ॲग्रो प्रा.ली. कुंटूर, ता. नायगांव, मुख्य शेतकी अधिकारी एस.डी. देशमुख यांचा मो. क्र. 9423508437, ट्वेंटीवन शुगर्स लि.पो.शिवणी, ता. लोहा मुख्य शेतकी अधिकारी एस. एस. शिंदे मो. क्र. 7588062873 यांचेशी संपर्क साधावा.
ऊस तोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणी करताना, ऊस पिक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख पैशांची व अन्य वस्तू / सेवा यांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते / ऊस योग्य प्रकारे तोडला गेला नाही अशा प्रकारच्या आर्थिक पिळवणूकीच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहेत.
राज्यात चालू 2024-25 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता वाढली असल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा याकरिता अनुचित मार्गाचा अवलंब करू नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाचे स्तरावरही ऊस गाळपाच्या संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार असून कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही याचे नियोजन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
अशा स्वरुपाच्या प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणुक करुन तक्रारनिवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल नंबर याची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये कारखान्याच्या गटऑफिसवर व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. याबाबतची व्यापक प्रसिद्धी सर्व प्रसिद्धी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याकडे परिशिष्ट-अ मधील नमुन्यात घटना घडल्यावर लगेच करावी व त्याची पोहच घ्यावी. या कामाकरिता नेमलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीचे निवारण सात दिवसात करावे.
तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर यांनी सदरची रक्कम मजूर, मुकादम, वाहतुक कंत्राटदार यांचे बिलातून वसूल करून संबंधित शेतकऱ्यांना अदा करावी. सदर तक्रारीचे निवारण कारखान्याकडून न झाल्यास नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड यांचा rjdsnanded@rediffmail.com ईमेलवर तक्रार करावी व प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सत्यता पडताळून प्राप्त तक्रारीचे निवारण करावे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
00000

 वृत्त क्र. 1244

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठीप्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड दि. 31 डिसेंबर:  क्रीडाव युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फतनांदेड जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. यापुरस्कारासाठी जिल्ह्यातील खेळाडू, मार्गदर्शक यांच्याकडून सन 2020-21, 2021-22,2022-23 व 2023-24 (4 वर्षे) या वर्षातील पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी इच्छूक खेळाडू व मार्गदर्शकांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज 12 जानेवारी 2025पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी व अर्जप्राप्त करण्यासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांचा मो. क्र. 7517536227या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरेयांनी केले आहे. 

जिल्ह्यातील गुणवंतक्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग यांनी केलेल्या कार्याचे/योगदानाचेमुल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणाघ्यावी या हेतूने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार प्राप्त करण्यासाठीकेलेली कामगिरी ही त्या-त्या वर्षातील 1 जुलै ते 30 जून दरम्यानच्या कालावधी गृहीतधरण्यात येणार आहे. पुरस्कार संख्या गुणवंत क्रीडा मार्गदर्शक-1, गुणवंत खेळाडू-1(पुरुष-1, महिला-1, दिव्यांग-1) पुरस्काराचे स्वरुप हे प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह वरोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मार्गदर्शक हा मागील 10 वर्षातकिमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते  तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया)  मधील राष्ट्रीयस्तरापर्यतचे पदक विजेते खेळाडूतयार केले असतील असा क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासपात्र राहील. गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी मागील 5 वर्षातील उत्कृष्ट ठरणारी 3 वर्षाचीकामगिरी ग्राह्य धरण्यात येईल. क्रीडा मार्गदर्शनासाठी सांघीक अथवा वैयक्तीक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्वकेलेला खेळाडू अथवा राज्य, जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यत यश मिळविणारेकिमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक तसेच क्रीडा मार्गदर्शकांनी खेळाडू किती वर्षेप्रशिक्षण दिले याचेही तुलनात्मक मुल्यमापन करण्यात येणार आहे. अर्जदाराने मार्गदर्शनकेलेल्या खेळाडूचे विहित नमुन्यातील हमीपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

खेळाडू पुरस्कारासाठीपात्र क्रीडा प्रकार-ॲथेलेटिक्स, बॅडमिंटन, आर्चरी, बास्केटबॉल, कयाकिंग/कनोईंग,सायकलिंग, क्रिकेट, तलवारबाजी, हॉकी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॅन्डबॉल, बॉक्सिंग,गोल्फ, पॉवरलिफ्टींग, हॉर्स रायडींग, लॉनटेनिस, नेमबाजी, स्विमींग (जलतरण)डायव्हीग, वॉटर पोलो, ट्रायथलॉन, बॉडीबिल्डिंग, ज्युदो मॉर्डन, पेंटॅथलॉन, रग्बी,रोईंग, स्पोर्ट्स क्लाइंबिंग, स्क्वॅश, टेबल टेनिस, तायक्वाँदो, व्हॉलीबॉल, वेटलिफटींग,कुस्ती, स्केटींग, वुशू, कॅरम, सॉफ्टबॉल, बेसबॉल,कबड्डी, खो-खो, मल्लखांब, आट्यापाट्या,बुध्दीबळ, बिलियर्डस ॲन्डस्नुकर, याटींग इत्यादी खेळाचा समावेश करण्यात आला आहे. 

000000

वृत्त क्रमांक 19 माळेगावात पारंपारिक लोककला महोत्‍सवात कलाकारांनी जिंकली रसिकांची मने लोककला महोत्सवाचे  आ. प्रतापरावरा पाटील चिखलीकर यांचे ...