Wednesday, November 27, 2019


अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांचे प्रशिक्षण योजनेतंर्गत
संस्थेची प्रलंबित फिबाबत 05 डिसेंबर, 2019 पर्यंत कागदपत्रे जमा करावे

नांदेड, दि. 27:- सन-2003-2004 ते 2005-2006 या वित्तीय वर्षात प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध प्रशिक्षण संस्थाना मंजूरी देण्यात आलेली आहे. सदर मंजूरीनुसार ज्या प्रशिक्षण संस्थेची फी प्रलंबिंत आहे. त्यांची फी अदा करण्याची कार्यवाही मुख्यालयामार्फत चालू आहे. प्रलंबीत फी बाबतचा प्रस्ताव मुख्यालयास मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही जुन्या प्रशिक्षण संस्थेची फी प्रलंबीत राहू नये, याबाबत तक्रारी उदभवू नये यासाठी प्रशिक्षण संस्थानी फी बाबतचे संपुर्ण कागदपत्रे संस्थेला असलेली प्रशिक्षण संस्थेची मान्यता प्रत , मुख्यालयाचे मंजूरी आदेश प्रत, जिल्हा कार्यालयाचे विद्यार्थी दिलेले पत्र , विद्यार्थ्यांचे परिक्षेस बसवलेले तसेच पास झालेले  प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांची हजेरी पत्र इत्यादी पुराव्यासह फी मागणीचा प्रस्ताव दिनांक 05 डिसेंबर, 2019 पर्यंत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात जमा करावे. दिनांक 05 डिसेंबर, 2019 नतंर आलेले प्रस्ताव / मागणी/तक्रारी इत्यादी स्वीकारल्या जाणार नाही, असे आव्हान जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामडळ मर्या. जिल्हा कार्यालय, नांदेड यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाचा पत्ता:-जिल्हा व्यवस्थापक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यान माता शाळे समोर हिंगोली रोड नांदेड दुरध्वनी क्रमांक 02462-220088 यांच्याशी संपर्क साधावा.
0000


शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी
महा-वॉकेथॉन-2019 चे  आयोजन
नांदेड, दि. 27:- रस्ता सुरक्षा विषय प्रबोधन होण्याच्या दृष्टीने परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सीएएसआय व सीएसआर डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30 नोव्हेंबर, 2019 रोजी सकाळी 8-00 वाजता रस्ता सुरक्षा वॉकेथॉन-2019 चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर महावॉकेथॉनचे उद्घाटन व आरंभ विसावा उद्यानपासून uकुसूम सभागृह-आय.टी.आय. कॉर्नर-शिवाजी नगर पोलीस ठाणे ते विसावा उद्यान या मार्गावर संपन्न होणार आहे.
महा वॉकेथॉनमधील सहभागी व्यक्ती दोन किमी अंतर चालतील. या महावॉकेथॉनद्वारे सुरक्षात्मक जबाबदार ड्रायव्हींगद्वारे रस्ता सुरक्षा, ध्वनीप्रदुषणावर निर्बंधाबाबत संदेश देवून जनजागृती करण्याबाबतचा प्रयत्न केला जाईल.                                                         
0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...