Wednesday, November 27, 2019


शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी
महा-वॉकेथॉन-2019 चे  आयोजन
नांदेड, दि. 27:- रस्ता सुरक्षा विषय प्रबोधन होण्याच्या दृष्टीने परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सीएएसआय व सीएसआर डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 30 नोव्हेंबर, 2019 रोजी सकाळी 8-00 वाजता रस्ता सुरक्षा वॉकेथॉन-2019 चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर महावॉकेथॉनचे उद्घाटन व आरंभ विसावा उद्यानपासून uकुसूम सभागृह-आय.टी.आय. कॉर्नर-शिवाजी नगर पोलीस ठाणे ते विसावा उद्यान या मार्गावर संपन्न होणार आहे.
महा वॉकेथॉनमधील सहभागी व्यक्ती दोन किमी अंतर चालतील. या महावॉकेथॉनद्वारे सुरक्षात्मक जबाबदार ड्रायव्हींगद्वारे रस्ता सुरक्षा, ध्वनीप्रदुषणावर निर्बंधाबाबत संदेश देवून जनजागृती करण्याबाबतचा प्रयत्न केला जाईल.                                                         
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 704 वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता    हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना    प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 07 ...