Monday, April 6, 2026

वृत्त क्रमांक  

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

नांदेड दि. 6 एप्रिल :- महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अंदाज समिती 7 ते 10 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ही समिती नांदेड जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांना भेट देऊन पाहणी करणार आहे. महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अंदाज समितीचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

मंगळवार 7 एप्रिल 2026 रोजी रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. 

बुधवार 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथील संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.  

सकाळी 9.30 ते 10 वाजेपर्यंत समितीची अंतर्गत बैठक- विविध विभागाचे प्रकल्प, कामे, योजना कार्यालयांना भेटी पाहणी व बैठकी संदर्भात नियोजन करणे. 

सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगर विकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषि विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी.

दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. 

दुपारी 3 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगरविकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषि विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी.

रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. 

गुरूवार 9 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगर विकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी.

 दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव.  

दुपारी 3 ते सायं. 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगरविकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषि विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी करतील.

रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. 

शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगर विकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी करतील.

दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. 

दुपारी 3 ते सायं. 5 वाजेपर्यंत संबंधित विभागाच्या प्रकल्प, कामांना, कार्यालयांना दिलेल्या भेटी व पाहणीच्या वेळी आढळून आलेल्या बाबीच्यासंदर्भात व लेखी स्वरूपात झालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबधित आधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. 

00000

वृत्त क्रमांक  

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड दि. 6 एप्रिल:-   एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी एमबीए /एमएमएस-सीईटी-2026 आणि अभियांत्रिक, औषधनिर्माणशास्त्र, बी प्लॅनिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएच-सीईटी परीक्षा-2026 दोन टप्प्यात नांदेड शहरात 6 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत सकाळी 7.30 ते सायं. 6.45 वाजेपर्यत व 9 ते 19 मे 2026 या कालावधीत सकाळी 7.30 ते सायं 6.45 या वेळेत 3 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. 

परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी काढले आहेत. 

ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ पंचशिलनगर, तिरुमला हॉस्पीटल, छत्रपती चौक, नांदेड, शासकीय तंत्रनिकेतन वीर सावरकर मार्ग बाबानगर, नांदेड, श्री. संभाजी कॉलेज ऑफ प्रायमरी, शामल एज्युकेशन कॅम्प देगाव रोङ पो. नांदला डिग्रस खडकुत या 3 या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात दिनांक 6 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत सकाळी 7.30 ते 6.45 वाजेपर्यत व 9 ते 19 मे 2026 पर्यत सकाळी 7.30 ते सायं. 6.45वाजेपर्यतच्या कालावधीत  सकाळी 6 ते रात्री 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला कॅलक्युलेटर, ट्रान्झिस्टर, रेडिओ, लॅपटॉप इ. तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 100 मीटरपर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रास नेण्यास, त्याचप्रमाणे परीक्षा कालावधीत या परिसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

00000

वृत्त क्रमांक  

8 एप्रिल रोजी दुसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

नांदेड दि. 6 एप्रिल:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत अभियान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान” बाबत कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिल 2026 मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात येणार आहेत. यामध्ये पहिली डिजिटल शेतीशाळा 1 एप्रिल रोजी संपन्न झाली असून दुसरी डिजिटल शेतीशाळा बुधवार 8 एप्रिल रोजी आयोजित केली असून, या डिजिटल शेती शाळांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा.  तसेच प्रत्येक गावातील शेतक-यांनी डिजिटल शेतीशाळेसाठी आपल्या घरातून ऑनलाईन उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

पाणी फाउंडेशन द्वारे संचलित डिजिटल शेती शाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. जिथे तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीक निहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम आणि युट्युबच्या माध्यमातून दिले जाते.

दिनांक १ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल शेतीशाळेच्या पहिल्या सत्रात शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता पुढील सत्र भाग 2 मध्ये जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन- बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, लींबोळी अर्क, दशपर्णी अर्क उत्पादन बाबत नियोजित बुधवार ८ एप्रिल २०२६ रोजी मार्गदर्शन मिळणार आहे. या सत्रात शेतकऱ्यांना घरच्या घरी विविध उपयुक्त निविष्ठा तयार करण्याचे प्रगत तंत्रज्ञान शिकायला मिळेल जसे की, बिजामृत, जिवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क. तसेच, या निविष्ठांचे फायदे आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाईल.

तरी शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी गट, FPOs आणि महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. चला, तर मग हवामान बदलाला सामोरे जात, आपल्या शेतीला अधिक शाश्वत आणि समृद्ध बनवूया! 

 सदरील शेतीशाळेस कृषि विभाग अंतर्गत उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई व कृषी सखी तसेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुसंवर्धन विकास अधिकारी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक व पशुसखी हे उपस्थित राहतील. तसेच प्रत्येक गावात एका मध्यवर्ती ठिकाणी  शेतकरी एकत्रित उपस्थित राहतील असे नियोजित आहे.

शेती शाळा नियोजित दिनांक दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सदर डिजिटल शेतीशाळा खाली दिलेल्या यु ट्यूब चॅनेल द्वारे आपण डिजिटल शेती शाळा बघू शकता- 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- https://www.youtube.com/live/mEgTBeO_yP8?si=0M2ezKHv6OmCUOWf

कृषी विभाग महाराष्ट्र शासन- https://www.youtube.com/live/2JKciiYL0I?si=l21CrYi7oyDEk3Xu  

पाणी फाउंडेशन- https://www.youtube.com/live/nF-20hUunAo?si=iE-MYbPJ21SCCWiH 

00000

वृत्त क्रमांक  

7 एप्रिल रोजी जिल्ह्यात 'जागतिक आरोग्य दिन' होणार साजरा - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख 

“एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी!” 

या घोषवाक्यासह आरोग्य जनजागृतीवर भर

नांदेड दि. 6 एप्रिल:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ७ एप्रिल हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून संपूर्ण नांदेड जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी जागतिक आरोग्य दिनासाठी "Together for health. Stand with science" आणि मराठीत "एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी!" हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात "माझे गाव आरोग्य संपन्न गाव" या संकल्पनेवर आधारित विविध आरोग्य कार्यक्रम आणि शिक्षण उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

जिल्ह्यात राबविले जाणारे प्रमुख उपक्रम:

जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनामार्फत खालील उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आरोग्य प्रभात फेरी व आरोग्य दिंडी: गावागावातून आरोग्याचा संदेश देण्यासाठी प्रभात फेऱ्या काढण्यात येतील.

चर्चासत्रे व जनजागृती: आरोग्य विषयावर तज्ज्ञांची चर्चासत्रे आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातील.

आरोग्य शिबिरे: नागरिकांच्या तपासणीसाठी विविध ठिकाणी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येईल.

 ग्रामपातळीवर उपक्रम : ग्रामपंचायतींमध्ये 'आरोग्य सभा' घेऊन समुदाय आधारित गटचर्चा व समुपदेशनावर भर दिला जाईल.

 प्रचार-प्रसिद्धी: सोशल मीडिया, स्थानिक माध्यमे, वृत्तपत्र लेख आणि यशोगाथांच्या माध्यमातून आरोग्य योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येईल.

उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, जिल्ह्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांचे जिल्ह्यात प्रभावी नियोजन करण्यात येत आहॆ.. "माझे गाव आरोग्य संपन्न गाव" ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके  यांनी केले आहे.

0000000

वृत्त क्रमांक   महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम नांदेड दि. 6 एप्रिल :- महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अंदाज समित...