वृत्त क्रमांक
दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे
क्रीडा सवलतीचे गुण प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 2 मार्च :- फेब्रुवारी-मार्च 2026 च्या दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन बुधवार 15 एप्रिल 2026 पर्यंत सादर करण्याचे आवाहन लातूर विभागीय मंडळाने केले आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना व एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्यात येतात. यासाठीचा शासन निर्णय दिनांक 20 डिसेंबर 2018 रोजी निर्गमीत करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्
या शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून क्रीडा प्रस्ताव तसेच एन.सी.सी. स्काऊट गाईड इत्यादी प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडून दरवर्षी विभागीय मंडळाकडे सादर केले जातात. त्याअनुषंगाने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ.१० वी व इ. १२ परीक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे आपले सरकार पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने पाठवावयाचे आहेत. तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईडचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी विभागीय मंडळांकडे प्रचलित पध्दतीने दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत पाठवावयाचे आहेत.
सर्व जिल्हा कीडा अधिकारी, सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्
00000

