जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या उपस्थितीत
चार एकर क्षेत्रावर वृक्षारोपण
कार्ला फाटा येथील नूतन प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ चार एकर क्षेत्रावर काटेरी झुडपांचे जंगल तयार झाले होते. तेलंगाना सिमेवरील
नांदेड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले हे ठिकाण विद्रूप दिसत होते. संस्कृती
संवर्धन मंडळ संस्थेच्या लक्षात येताच संस्थेने जागेची सफाई व वृक्ष लागवड करून
सुशोभीकरण करण्याचे ठरविले होते त्यानुसार कदंब, महागणी,
तबेबिया, टेकुमा, बोगनवेलिया
आदी चारशे सुशोभित वृक्षांची लागवड करण्यात आली. संस्थेच्या शिवाजी हायस्कूल मधील
राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीत सहभाग घेतला होता.
संस्थेचे माजी
विद्यार्थी आत्माराम चिगळे व गुरुद्वारा बोर्डाने झाडे उपलब्ध करून दिली. काटेरी
झुडपे काढणे, जागेचे
सपाटीकरण व खड्डे आदी कामे संस्थेने केली आहेत. कार्ला खुर्द ग्रामपंचायतीने पुढील
तीन वर्ष वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेण्याचे मान्य केले आहे.
संस्कृती संवर्धन
मंडळातर्फे घेण्यात आलेला हा
उपक्रम कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी
सांगितले. संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी परिसरातील
नागरिकांनी हा उपक्रम स्वतःच्या गावचा समजून वृक्ष संगोपनाची जबाबदारी घ्यावी असे
आवाहन केले.
यावेळी उपवनसंरक्षक
आशिष ठाकरे,
नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेश धुर्वे, प्रादेशिक
परिवहन अधिकारी दिनकर मनवर, उपविभागिय अधिकारी कोळी, तहसिलदार श्रीकांत गायकवाड, जि.प.सदस्य प्रतिनिधी
गणेश पाटिल शिंपाळकर, पंचायत समितीचे .उपसभापती दत्तराम
बोधने, बिलोलीचे उपनगराध्य पटाईत, महावितरणचे अभियंता बोधनकर, उपविभागीय कृषी अधिकारी माधव सोनटक्के, कार्यकारी अभियंता जि.प.रायबोगे, तालुका कृषी
अधिकारी घुगे, गटविकास अधिकारी यु.डी.रहाटीकर, नायब तहसीलदार संजय नागमवाड, ओमप्रकाश गौंड, लागवड अधिकारी जाधव, वनपरिक्षेञ अधिकारी एस.बि.कोळी,
पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, किरण देशमुख,
राजेंद्र पाटील कार्लेकर, व्यंकट सिध्दनोड आदी
उपस्थित होते.
000000